Home Remedies | मासिक पाळी टाळण्याऱ्या औषधांचे आरोग्यावर गंभीर परिणाम, गोळ्यांऐवजी वापरा ‘हे’ घरगुती उपाय!

लग्नसोहळे, पार्टी आणि पिकनिक अशा काही खास प्रसंगी अनेकदा महिला पीरियड्स टाळण्यासाठी औषधांचा वापर करतात, ज्याचा आरोग्यावर अतिशय गंभीर परिणाम होतो.

Home Remedies | मासिक पाळी टाळण्याऱ्या औषधांचे आरोग्यावर गंभीर परिणाम, गोळ्यांऐवजी वापरा ‘हे’ घरगुती उपाय!
Follow us
| Updated on: Jan 19, 2021 | 3:47 PM

मुंबई : स्त्रियांना दर महिन्याला मासिक पाळी येणे आवश्यक आहे. यामुळे, त्यांच्या शरीरात तयार होणारी हार्मोन्स संतुलित राहतात आणि वेळोवेळी रक्त फिल्टर केले जाते. परंतु, दरमहा होणार्‍या मासिक पाळी दरम्यान स्त्रियांना पोटदुखी, कंबर आणि पाय दुखी अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. याशिवाय या कालावधीत ताप, मूड स्विंग्स सारख्या त्रासालाही सामोरे जावे लागते (Home Remedies For delay periods in natural ways).

लग्नसोहळे, पार्टी आणि पिकनिक अशा काही खास प्रसंगी अनेकदा महिला पीरियड्स टाळण्यासाठी औषधांचा वापर करतात, ज्याचा आरोग्यावर अतिशय गंभीर परिणाम होतो. या व्यतिरिक्त आपल्या प्रजनन क्षमतेवरही याचा वाईट परिणाम होतो. म्हणूनच गोळ्यांऐवजी असे काही घरगुती उपचारांचा वापर करून, आपण नैसर्गिक मार्गाने मासिक पाळी लांबणीवर टाकू शकता. चला तर जाणून घेऊया या उपायांबद्दल…

अॅपल सायडर व्हिनेगर

अॅपल सायडर व्हिनेगर शरीरास डिटॉक्स करून वजन कमी करण्यास मदत करते. या व्यतिरिक्त हे मासिक पाळी पुढे ढकलण्याचे काम देखील करते. यासाठी एका ग्लास पाण्यात 3 ते 4 चमचे अॅपल सायडर व्हिनेगर मिसळा आणि दिवसातून दोन ते तीन वेळा प्या. बर्‍याच अभ्यासांमध्ये असा दावा केला गेला आहे की, अॅपल सायडर व्हिनेगर पिण्यामुळे मासिक पाळी उशिरा येते. अनेकांना त्याची चव आवडत नाही. पण हा एक प्रभावी उपाय आहे.

चण्याची डाळ

मासिक पाळी लांबणीवर टाकण्यासाठी तुम्ही चण्याची डाळ वापरू शकता. ही डाळ आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असते. यासाठी चण्याची डाळ चांगली भाजून त्याची पावडर बनवून, त्याचे सेवन करू शकता. मात्र, अधिक प्रमाणता सेवन केल्याने त्याचे काही दुष्परिणाम देखील होतात. बेसन जास्त खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू शकते (Home Remedies For delay periods in natural ways).

जिलेटिन

आपण कोणत्याही प्रकारच्या घाईच्या वेळी जिलेटिनचा वापर करू शकता. जर आपल्याला केवळ काही तासांसाठी पाळी टाळायची असेल, तर एका कप पाण्यात जिलेटिनचे एक लहान पॅकेट मिक्स करा आणि ते लगेच प्या.

लिंबाचा रस

लिंबाचा रस, अॅपल सायडर व्हिनेगरप्रमाणे काम करतो. त्यात व्हिटामिन सी मुबलक प्रमाणात आहे. याच्या सेवनाने आपल्याला मासिक पाळी उशिरा येऊ शकते. याशिवाय पोटाच्या दुखण्यापासूनही आराम मिळतो. खाण्या-पिण्याव्यतिरिक्त आपण व्यायाम आणि मसाजद्वारे देखील मासिक पाळी लांबणीवर टाकू शकतो.

व्यायाम

असे काही व्यायाम देखील आहेत ज्याद्वारे आपण मासिक पाळी लांबणीवर टाकू शकता. इतर दिवशीही व्यायाम केल्याने आराम मिळतो. यासाठी आपण एरोबिक्स, सायकलिंग, जॉगिंग सारखे व्यायाम करू शकता.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Home Remedies For delay periods in natural ways)

हेही वाचा :

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.