Homemade Chandan Face Pack : फ्रेश चमकदार त्वचासाठी घरच्या घरी बनवा चंदनाचा फेस पॅक, चेहरा उजळून निघेल!
Homemade Chandan Face Pack : चंदन पावडरच्या अंगी एक्सफोलिएटिंग गुणधर्म असतात यामुळे आपल्या त्वचावरील मृतपेशी दूर होतात. त्वचा वर जमा झालेली घाण सुद्धा चंदनामुळे त्वरित निघून जाते.
मुंबईः आयुर्वेदिक शास्त्रामध्ये चंदनाचे (Sandalwood) खूप महत्त्व आहे. अनेक धार्मिक कार्यामध्ये चंदनाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.चंदनाचा सुगंध सगळीकडे दरवळत वातावरण मंत्रमुग्ध होऊन जाते.या चंदनाचे अनेक अध्यात्मिक फायदे तर आहेत त्याचबरोबर आपल्या शरीरासाठी सुद्धा अनेक फायदे आहेत. चंदनाचा उपयोग करून प्रामुख्याने आपण आपली त्वचा सुंदर बनवू शकतो. चंदनामध्ये अँटीबॅक्टरियल गुणधर्म असतात. जर तुम्हाला त्वचा संदर्भातील कोणतीही समस्या असेल जसे की काळे डाग, पिंपल, वांग,त्वचेवर कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन झाले असेल, त्वचा कोरडी झाली असेल, तेलकटपणा वाढला असेल तर या सर्व समस्या मुळापासून नष्ट करण्यासाठी चंदन उपयुक्त ठरते.
वेगवेगळ्या प्रकारच्या ब्युटी प्रॉडक्ट( beauty product) मध्ये चंदनाचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. चंदना द्वारे वेगवेगळे फेसपॅक (Homemade Chandan Face Pack) देखील बनवले जातात. आपली त्वचा उजळवण्याचे काम चंदन करते.चला तर मग जाणून घेऊया चंदनाच्या मदतीने आपण कोणकोणत्या प्रकारचे फेसपॅक घरच्या घरी बनवू शकतो त्याबद्दल..
चंदन आणि गुलाब जल फेस पॅक
हा फेस पॅक बनवण्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये एक ते दोन चमचा चंदन पावडर घ्यायची आहे यामध्ये योग्य प्रमाणात गुलाबजल मिसळायचे. हे दोन्ही मिश्रण एकजीव करून आपल्याला पेस्ट बनवायची आहे. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावायची. काही वेळ पेस्ट तशीच ठेवून त्यानंतर हलका मसाज करायचा आहे. पेस्ट पूर्णपणे सुकल्यावर थंड स्वच्छ पाण्याने आपल्याला चेहरा धुवायचा आहे.अशा प्रकारे आपल्याला हा उपाय आठवड्यातून 2 वेळा करायचा आहे.
चंदन आणि मध फेसपॅक
हा फेस पॅक बनवण्यासाठी एक चमचा चंदन पावडर घ्यायची आहे त्यात योग्य प्रमाणामध्ये मध मिसळून व्यवस्थित पेस्ट बनवायची आहे.ही पेस्ट आपला चेहरा आणि मानेवर लावायची यानंतर त्वचेवर हलक्या हाताने मसाज करून काही वेळ मिश्रण तसेच चेहर्यावर ठेवायचे आहे.15 ते 20 मिनिटे नंतर आपल्या चेहरा थंड पाण्याने धुवायचा आहे.
हळद आणि चंदन फेस पॅक
हा फेस पॅक बनवण्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये एक चमचा चंदन पावडर घ्यायची व त्यानंतर चिमूटभर हळद मिक्स करून थोडेसे पाणी मिसळून व्यवस्थित पेस्ट बनवायची. ही पेस्ट आपल्याला मान आणि त्वचेवर लावायची आहे. 15 ते 20 मिनिटानंतर ही पेस्ट व्यवस्थित रित्या सुकल्यानंतर साध्या पाण्याने आपल्याला आपला चेहरा धुवायचा आहे. या फेसपॅकमुळे तुमचा चेहरा स्वच्छ होईल तसेच चेहर्यावरील मृतपेशी देखील दूर होऊन जातील. हा उपाय आपल्याला आठवड्यातून 2 ते 3 वेळा करायचा आहे.
चंदन आणि कच्च्या दूधाचे फेसपॅक
यासाठी आपल्याला एक चमचा चंदन पावडर घेऊन त्यामध्ये थोडे कच्चे दूध मिसळायचं आहे.व्यवस्थित पेस्ट तयार झाल्यानंतर ही पेस्ट आपल्याला चेहरा आणि मानेवर लावायची आहे. पेस्ट चेहऱ्यावर लावल्यानंतर 15 ते 20 मिनिटं तसेच ठेवून हलका मसाज करायचा आहे. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुऊन काही वेळ पंख्याखाली तसेच बसा. चेहरा टवटवीत व चमकदार बनवण्यासाठी आठवड्यातून 2 ते 3 वेळा या फेसपॅक चा अवश्य वापर करा.
चंदन आणि नारळ पाण्याचा फेसपॅक
या फेस पॅक साठी एक ते दोन चमचा चंदनाची पावडर आपल्याला घ्यायची आहे. या पावडर मध्ये आवश्यकतेनुसार नारळाचे पाणी मिसळा. हे मिश्रण एकजीव करून व्यवस्थितरीत्या पेस्ट बनवल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर ही पेस्ट लावायची आहे. 15 ते 20 मिनिटं तसेच ठेवल्या नंतर थंड पाण्याने आपल्याला चेहरा धुवायचा आहे, अशाप्रकारे तुम्ही या फेस पॅकचा वापर आठवड्यातून 2 ते 3 वेळा सहजरीत्या करू शकता.
टिप्स: ही माहिती सर्व साधारणपणे सांगण्यात आलेली आहे. टीव्ही 9 मराठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा सल्ला देत नाही. कोणतेही लक्षण जाणवत असल्यास घरच्या घरी उपाय करण्या ऐवजी तज्ञ मंडळींचा सल्ला अवश्य घ्या.
संबंधित बातम्या
अत्यंत धक्कादायक…! लठ्ठपणामुळे ‘हे’ गंभीर आजार होऊ शकतात, वाचा सविस्तर वजन वाढल्यामुळे काय होऊ शकते!
डिनर पार्टीसाठी जात आहात? मग आलिया भट्टचे हे सिल्व्हर साडीवरील फोटो नक्की पाहा!