चेहऱ्यावरील नकोशा केसांपासून हवी आहे मुक्ती ? 3 सोपे उपाय करून तर पहा, स्किन दिसेल तरूण व चमकदार
आपल्या चेहऱ्यावर नको असलेल्या काही केसांमुळे सौंदर्यात बाधा येऊ शकते. तुमच्या चेहऱ्यावर बेबी हेअर असतील व ते काढण्यासाठी तुम्हाला वॅक्स करायची इच्छा नसेल तर तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता.
नवी दिल्ली : प्रत्येकाच्या त्वचेवर काही ठिकाणी छोटे-छोटे केस (hair on face) असतात. काही स्त्रियांच्या चेहऱ्यावर ते केस दिसत नाही पण काहींच्या चेहऱ्यावर ते केस लगेचच दिसून येतात. अशा परिस्थितीत महिला त्यांना दूर करण्यासाठी विविध उपाय करतात. हे केस काढण्यासाठी महिला पार्लरमध्ये जाऊन थ्रेडिंग (threading) किंवा वॅक्सिंगची (waxing) या प्रक्रियांची मदत घेतात. चेहऱ्यावरील ते केस काढण्यासाठी अनेक उत्पादने बाजारातही उपलब्ध आहेत. मात्र, अशा उत्पादनांमध्ये काही रसायने असतात जी त्वचेसाठी घातक असतात व त्याचा वापर केल्यामुळे चेहऱ्याच्या नाजूक त्वचेला हानी पोहोचण्याची शक्यता असते. अशा वेळी तुम्हाला चेहऱ्यावरील केस नैसर्गिकरित्या दूर (natural remedies) करायचे असतील तर काही घरगुती उपायांचा वापर करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरते.
किचनमध्ये असलेल्या कोणत्या पदार्थांच्या मदतीने चेहऱ्यावरील केस काढता येतात, ते जाणून घेऊया.
केळं व ओटमील
एका भांड्यात दोन चमचे ओट्सचे जाडसर पीठ घ्या आणि त्यात एक पिकलेले केळे मॅश करून मिश्रण तयार करा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. ते थोडे वाळल्यानंतर चेहऱ्याला 10 मिनिटे मसाज करा. असे केल्याने केस हळूहळू निघून जातील. हा पॅक वाल्यावर आणखी दुसरा कोट लावा. तो कोरडा झाल्यावर उलट दिशेने खेचून घ्या. नियमित वापराने चेहऱ्यावरील केसांचे प्रमाण हळूहळू कमी होऊ शकेल.
मध व साखरेचे वॅक्स
यासाठी एका भांड्यात 2 चमचे साखर, एक चमचा मध आणि एक चमचा पाणी मिसळा आणि 30 सेकंद गरम करा. ते पूर्णपणे वितळल्यावर चेहऱ्यावर वॅक्सप्रमाणे लावा. आता कॉटन स्ट्रिपच्या मदतीने चेहऱ्यावरील नको असलेले केस काढा. यामुळे चेहऱ्यावरील सर्वात बारीक केसही सहज निघतील. बाजारातील वॅक्समध्ये अनेक हानिकारक रसायने असू शकतात, त्याऐवजी घरी सोप्या व सुरक्षित पद्धतीने तयार केलेल्या या वॅक्समुळे त्वचेचे काही नुकसानही होणार नाही आणि अपेक्षित परिणामही दिसून येईल.
पपई व केळं
एका भांड्यात पपईचा दोन चमचे गर, अर्धा चमचा हळद आणि तीन चमचे कोरफडीचे जेल घ्या आणि मिक्स करून पेस्ट बनवा. आता ते चेहऱ्यावर केस असलेल्या प्रभावित भागावर लावा आणि वाळू द्या. हा पॅक नीट वाळल्यावनंतर केसांच्या वाढीच्या विरुद्ध दिशेने घासून काढून टाका. यामुळे चेहऱ्यावरील नकोसे केस कमी होतील.
( डिस्क्लेमर-कोणताही उपचार करण्याआधी संबंधित तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)