Beauty Tips | गालांवर नैसर्गिक लाली हवीय? मग घरच्या घरी बनवा नैसर्गिक ‘जेली ब्लश’

तीव्र उष्णता आपल्या चेहर्‍याचा नैसर्गिक ओलवा देखील नष्ट करते आणि आपल्या गालांवरचा गुलाबीपणा नाहीसा होतो. म्हणून आपण मेकअपचा करताना ब्लशचा वापर करतो.

Beauty Tips | गालांवर नैसर्गिक लाली हवीय? मग घरच्या घरी बनवा नैसर्गिक ‘जेली ब्लश’
जेल ब्लश
Follow us
| Updated on: Feb 08, 2021 | 12:08 PM

मुंबई : सध्या हिवाळ्याचा हंगाम सुरू आहे. परंतु, लवकरच उन्हाळ्याचा हंगाम येणार आहे. उन्हाळ्याचा हंगाम जवळ येताच, जोरदार गरम वारे वाहू लागतात. तीव्र उष्णता आपल्या चेहर्‍याचा नैसर्गिक ओलवा देखील नष्ट करते आणि आपल्या गालांवरचा गुलाबीपणा नाहीसा होतो. म्हणून आपण मेकअपचा करताना ब्लशचा वापर करतो. बाजारपेठेत बरीच महागडी मेकअप उत्पादने विकली जात आहेत, जी खरेदी करणे सामान्य माणसाला परवडणार नाही (How to make natural jelly blush at home).

तथापि, काही स्त्रिया बाजारात मिळणारी ही उत्पादने वापरतात, परंतु आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपचार सांगणार आहोत, जेणेकरून आपण आपल्या घरच्या घरीच जेल ब्लश बनवू शकाल. हे आपल्या त्वचेसाठी फायदेशीर ठरेल. तसेच यामुळे तुमचे गालही गुलाबी होतील. चला तर, मग जाणून घेऊया आपण घरच्या घरी हे जेल कसे बनवू शकता, तेही अगदी सोप्या आणि कमी वेळात..

घरीच बनवल्या जाणाऱ्या ब्लशमध्ये भुकटी किंवा क्रीम वापरली जात नाही. हे पूर्णपणे नवीन फॉर्म्युला जेल ब्लश आहे. हे जेल अशा लोकांसाठी हा एक चांगला पर्याय आहे, ज्यांची त्वचा खूप तेलकट आहे. जर क्रीम ब्लश आपल्या त्वचेला मऊ रंग देत असेल, तर जेल आपल्या त्वचेला हायड्रेटिंग रंग देते, जे अधिक नैसर्गिक दिसते. याव्यतिरिक्त, हा जेल फॉर्मूला अधिक हलका आहे. जेल ब्लश बाजारात सहज उपलब्ध आहेत, परंतु आपण ते स्वतः घरी देखील बनवू शकता.

साहित्य :

1 टीस्पून बीट पावडर

1 टीस्पून कोरफड जेल

अर्धा टीस्पून कोको पावडर

अर्धा टीस्पून हळद

1 काचेचा कंटेनर

(How to make natural jelly blush at home)

कृती :

कोरफडांच्या पानांमधून गर / जेल काढा आणि एका भांड्यात ठेवा. आता त्यात बीटरुट पावडर घाला आणि चांगली मिसळा. तयार जेल चेहर्‍यावर किंचित लावा आणि रंग कसा येत आहे हे पाहण्यासाठी पॅचची चाचणी घ्या. रंग हलका वाटत असल्यास त्यात आणखी थोडी बीट पावडर घाला. आपल्याला या ब्लशचा रंग थोडा अधिक सुंदर बनवायचा असेल, तर त्यात अर्धा चमचा कोको पावडर घाला. हा आपल्या जेलचा रंग हलका तपकिरी करेल. आता त्यात अर्धा चमचा हळद घाला. हे ब्लशचा रंग बदलण्यासाठी कार्य करेल. हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करा आणि कंटेनरमध्ये ठेवून रेफ्रिजरेट करा.

वापरण्याचा योग्य मार्ग

आपला चेहरा साफ केल्यावर आणि त्यावर स्कीन केअर प्रोडक्ट लावल्यानंतर, आपल्या गालांच्या फुगवट्यावर हा जेली ब्लश लावा. कोरफड जेल एक नैसर्गिक प्रायमर आहे. नैसर्गिक ब्लशी लूक तयार करण्यासाठी आपण ब्लशच्या शीर्षस्थानी लाईट फाउंडेशन किंवा स्किन टिंट लावू शकता.

(टीप : सौंदर्य तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(How to make natural jelly blush at home)

हेही वाचा :

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.