AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पचनाची समस्या आहे तर कोकमचे सेवन करेल तुमची मदत, जाणून घ्या त्याचे अप्रतिम फायदे

kokam benefits : कोकमचे सेवन करण्याचे अनेक फायदे होतात. आपण वरणात किंवा भाजींमध्ये कोकम टाकून त्याचे सेवन करतो. कोकमचा वेगवेगळ्या प्रकारे आपण आपल्या आहारात समावेश करु शकतो. कोकम हा पचनासाठी खूप फायदेशीर मानला जातो. कोकमच्या सेवनाने त्वेचेचे आरोग्य देखील सुधारते.

पचनाची समस्या आहे तर कोकमचे सेवन करेल तुमची मदत, जाणून घ्या त्याचे अप्रतिम फायदे
Follow us
| Updated on: Feb 12, 2024 | 6:50 PM

Kokum Benefits : कोकम हे असे फळ आहे ज्याचे आपण आपल्या आहारात समावेश करतो. कोकमचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशी आहे. त्वचेच्या आरोग्यासाठी देखील कोकमचे फायदे आहेत. कोकममध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ई आणि इतर पोषक घटक आढळतात जे आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहेत. कोकम आपली त्वचा पोषित आणि मुलायम ठेवण्यास मदत करते. कोकम त्वचेच्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते. कोकम आपली त्वचा चमकदार ठेवते. कोकम तेल चेहऱ्यावर लावल्यास मुरुम आणि सुरकुत्या कमी होण्यासही मदत होते. कोकम आपण आपल्या आहारात वेगवेगळ्या प्रकारे सेवन करु शकतो. कोकमचा ज्युस, कोकमचे सरबत तुम्ही तुमच्या आहारात घेऊ शकतात.

पचनासाठी फायदेशीर

कोकममध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते जे आपल्या पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे. फायबर आतड्यांमध्ये जमा झालेले विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतो. कोकमच्या सेवनाने बद्धकोष्ठता, पोट फुगणे आणि आम्लपित्त यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. हे आपली पचनसंस्था निरोगी ठेवून अन्न पचवण्याची प्रक्रिया सुलभ करते. कोकमचे नियमित सेवन केल्याने पचनाच्या समस्या दूर होतात.

त्वचेसाठी फायदेशीर

कोकममध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. ते पेशींना मुक्त रॅडिकल्स आणि प्रदूषणाच्या नुकसानीपासून वाचवतात. कोकममध्ये असलेले व्हिटॅमिन ई आपल्या त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवते आणि त्वचा मऊ आणि चमकदार ठेवण्यास मदत करते.

कोकमचे सेवन कसे करावे

कोकम रस : कोकमचा रस काढून तुम्ही त्याचे सेवन करु शकता. यामध्ये साखर किंवा मीठ घालून प्यायल्याने त्याची चव आणखी वाढते.

कोकमची चटणी बनवण्यासाठी कोकम उकळून मॅश करून त्यात मसाले आणि मीठ आणि मिरपूड टाकली जाते.

कोकम ज्यूस: ताज्या कोकमपासून ज्यूस देखील बनवता येतो आणि त्याचा सेवनही करता येते.

पाकचा मोठा हल्ला, राजौरीमधील घरांची अवस्था बघा, विदारक VIDEO पाहून...
पाकचा मोठा हल्ला, राजौरीमधील घरांची अवस्था बघा, विदारक VIDEO पाहून....
पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक.
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य.
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं.
आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?
मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?.
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड.
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र.
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?.
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?.