सकाळी उठल्यावर ही लक्षणे दिसत असेल तर समजा तुम्हाला बीपीचा त्रास सुरु झालाय

high blood pressure signs : सकाळी उठल्यानंतर खालील संकेत जर तुम्हाला मिळत असेल तर तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या असू शकते. उच्च रक्तदाब असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नये. अशा रुग्णांनी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. असे कोणती लक्षणे आहेत जी उच्च रक्तदाबाचे संकेत देतात जाणून घ्या.

सकाळी उठल्यावर ही लक्षणे दिसत असेल तर समजा तुम्हाला बीपीचा त्रास सुरु झालाय
Follow us
| Updated on: Nov 29, 2023 | 6:23 PM

High blood Pressure : उच्च रक्तदाबाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. आधी हा आजार फक्त वृद्ध लोकांमध्ये दिसून येत होता. पण आता तरुण वयातही उच्च रक्तदाबाची समस्या दिसून येत आहे. बहुतांश तरुणांना बीपीचा त्रास आहे. चुकीची जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयी, मिठाचे जास्त सेवन, तणाव यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या होऊ शकते. रक्तदाब नियंत्रणात न राहिल्यास तो प्राणघातक ठरू शकतो. उच्च रक्तदाबाच्या रुग्णामध्ये हृदयविकाराचा धोका वाढतो. अनेक वेळा लोकांना उच्च रक्तदाबाची लक्षणे देखील माहीत नसतात, जी खूप धोकादायक असते.

सकाळी उठल्यानंतर तुम्हाला खालील लक्षणे दिसली तर तुम्हाला बीपीची समस्या असू शकते. त्यामुळे तुमचा रक्तदाब तुम्ही तपासला पाहिजे आणि डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

चक्कर येणे

सकाळी उठल्याबरोबर चक्कर येत असेल तर हे उच्च रक्तदाबाचे लक्षणे आहे. चुकूनही त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. तुमचा बीपी तपासून पाहा.

खूप तहान लागणे

सकाळी उठल्यावर तुम्हाला खूप तहान लागत असेल किंवा घसा कोरडा पडत असेल तर तुम्हाला उच्च रक्तदाब असू शकते.

थकवा जाणवणे

सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला पुरेशी झोप घेऊनही थकवा जाणवत असेल आणि अशक्तपणा जाणवत असेल तर त्याचे कारण उच्च रक्तदाब असू शकते.

अंधुक दृष्टी

सकाळी उठल्यानंतर तुम्हाला अंधुक दिसत असेल तर हे उच्च रक्तदाबामुळे देखील होऊ शकते.

उच्च रक्तदाब कसे नियंत्रित करावे

  • सकाळी उठल्यानंतर 30 मिनिटे व्यायाम करा.
  • खाण्याच्या सवयींमध्ये संतुलन राखा
  • मिठाचे प्रमाण मर्यादित ठेवा
  • दारू आणि धूम्रपान टाळा
  • तणावापासून दूर राहा
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.