Natural color : केसांना केमिकलशिवाय कलर करायचंय, तर करा मेथीचा वापर; जाणून घ्या, नैसर्गिक कलर तयार करण्याची पद्धत!
केसांना कलरिंग : रासायनिक कलर केल्याने, केस खराब होतात. त्यामुळे अनेकजण घरगुती उपायांनी केसांना नैसर्गिक कलर करतात. जाणून घ्या, मेथीच्या पानांनी केसांचा रंग कसा बनवायचा आणि त्याचा वापर कसा करायचा.
स्टायलिश लुक मिळवण्यात केसांचा सर्वांत महत्त्वाचा वाटा (most important part) असतो. स्त्रिया आणि पुरुष त्यांचे केस स्टायलिश बनवण्यासाठी सरळ करतात किंवा रंग देतात. केसांना वेगवेगळ्या स्टाईल देण्यासाठी हीटिंग टूल्सचा वापर केला जातो. त्याच वेळी, केसांना रंग देण्यासाठी बाजारात भरपूर उत्पादने आली आहेत. हा केसांचा रंग आकर्षक लूक (Attractive look) मिळविण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. परंतु, त्यात मिसळलेले रसायन केस कोरडे आणि निर्जीव बनवू शकते. त्यांचा जास्त वापर केल्याने तुमच्या केसांची नैसर्गिक चमक (Natural glow) नाहीशी होते. याशिवाय केसांमध्ये कोरडेपणाही दिसू लागतो. केसांची काळजी घेताना हेअर कलरिंग ला अनेकांची पसंती असते. परंतु, केसांना रासायनिक कलर करणे महागात पडू शकते. केस कलर केल्यावर काहीवेळ दिसणारी चमक नंतर महागात पडू शकते. परंतु, नैसर्गिक कलर करूनही केसांना रंग देता येतो. यात मेथीच्या पानांचा वापर फार उपयुक्त ठरतो.
मेथीच्या पानांचा रंग असा करा
मेथीच्या पानांचा केसांचा रंग बनवण्यासाठी तुम्हाला हिना पावडर आणि इंडिगो पावडर देखील लागेल. यासाठी एक भांडे घेऊन मेथीची पाने बारीक करून पेस्ट बनवा. ही पेस्ट भिजवलेल्या मेंदीमध्ये घालून मिक्स करा. ही पेस्ट दोन तास भिजत राहू द्या. दरम्यान केसांना कंडिशनर आणि खोबरेल तेल लावून ठेवा.
अशाप्रकारे करा वापर
मेथीच्या पानांपासून बनवलेले हेअर कलर लावण्यापूर्वी हेअर कॉम्बिंग करा. आता ब्रशच्या मदतीने केसांना हेअर कलर लावा आणि कोरडे होऊ द्या. सुमारे 2 तासांनंतर केस धुवा.
नैसर्गिक रंग साठवण्याची पद्धत
मेथीच्या पानांचा केसांचा रंग लावायचा असेल तर मेथी वाळवून त्याची पावडर बनवा आणि घट्ट झाकण असलेल्या बॉक्समध्ये ठेवा. उन्हाळ्यात मेथीच्या पानांपासून बनवलेल्या या पावडरचा वापर करून तुम्ही केसांना सहज रंग देऊ शकता. विशेष म्हणजे ही पावडर उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात सहज वापरता येते. जेव्हा ती लावायचे असेल तेव्हा त्यात हिना पावडर आणि इंडिगो पावडर मिसळा आणि केसांना रंग लावा.