Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eye care: वाढत्या वयातही ‘या’ चार पध्दतीने डोळ्यांची कार्यक्षमता सुधारा

गेल्या अडीच वर्षांच्या कोरोना काळात लोक घरातच बसून होते. त्यामुळे या काळात त्याचा टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप आदींशी अधिक संपर्क आला. त्यामुळे साहजिकच याचा परिणाम डोळ्याच्या दिसण्याच्या क्षमतेवर झाला. त्यासोबत वृध्दापकाळात डोळ्यांच्या अनेक तक्रारी असतात. त्यावर योग्य वेळी उपचार घेणे आवश्‍यक असते.

Eye care: वाढत्या वयातही ‘या’ चार पध्दतीने डोळ्यांची कार्यक्षमता सुधारा
वाढत्या वयातही ‘या’ चार पध्दतीने डोळ्यांची कार्यक्षमता सुधारा..Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 10:31 AM

डोळे (Eye) हा आपल्या शरीराचा सर्वाधिक नाजूक अवयव आहे. डोळ्यांमुळे आपण या जगाचा आनंद घेत असतो. परंतु अनेकदा डोळ्यांच्या समस्यांकडे आपण दुर्लक्ष करीत असतो. कोरोना काळात सर्व घरात असताना अनेकांनी घरुनच काम केले. शाळा, महाविद्यालय बंद असल्याने मुलांचाही टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप आदींशी अधिक संपर्क आला. या सर्वांमुळे डोळ्यांवर गंभीर परिणाम झाला. याशिवाय वाढत्या वयातदेखील (Aging) डोळ्यांच्या अनेक समस्या निर्माण होत असतात. वयाच्या चाळीशीनंतर, अस्पष्ट दिसणे, डोळ्यांमधून पाणी येणे, डोळे लाल होणे आदी विविध समस्या निर्माण होतात. त्यामुळे आपण डोळ्यांची अधिक काळजी घेणे गरजेचे असताना आपण मात्र याकडे सामान्य समस्या म्हणून दुर्लक्ष करीत असतो. या लेखात आपण तज्ज्ञांच्या मदतीने वाढत्या वयात डोळ्यांची काळजी (Eye care) कशी घ्यावी, याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

हैदराबादेतील श्री शंकर नेत्रालय आय रुग्णालयातील ग्लूकोमा कंसल्टंट डॉ. रोमा जोहरी यांच्या मते, वाढत्या वयात डोळ्यांशी संबंधित समस्या दिसून येत असतात. अशी एक समस्या म्हणजे ‘प्रेसबायोपिया’ असून ज्यात, वस्तूला जवळून, लांबून पाहण्यात अडचण निर्माण होत असते. डोळ्यांना सूज आल्यावरदेखील दिसण्यास अडचण निर्माण होउ शकते. ‘द ओकूलर सरफेस’नुसार, कोरड्या डोळ्यांच्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या जवळपास 1.9 दशलक्ष इतकी आहे. एका अभ्यासानुसार कोरड्या डोळ्यांची समस्या असलेल्यांची संख्या 2030 पर्यंत शहरी भागात साधारणत: 40 टक्क्यांपर्यंत असेल. परंतु डोळ्यांची काळजी घेतल्यावर या समस्यांमधून तुम्हाला आराम मिळू शकतो.

1) डोळ्यांची नियमित तपासणी करावी

रोजच्या जीवनात तुम्हाला डोळ्यांची कुठलीही तक्रार नसली तरीही वर्षातून दोन वेळा डोळ्यांची तपासणी करुन घेणे योग्य असते. यातून आपल्याला माहिती नसलेल्या समस्या तपासणीतून समजू शकतात. त्यामुळे डोळ्यांची नियमित तपासणी करणे आवश्‍यक आहे. जर तुमचे वय 60 किंवा त्याहून अधिक आहे तर, तुम्ही नियमित डोळ्यांची तपासणी केलीच पाहिजे. वाढत्या वयामुळे डोळ्यांचे अनेक आजार निर्माण होण्याची शक्यता असते.

2) स्क्रीनचा कमीत कमी वापर करावा

आधुनिक युगात मोबाईल, संगणक आदींचा वापर करणे आवश्‍यक असले तरी, शक्य तेवढा या गोष्टींचा वापर कमी करावा. गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना काळात या साधनांचा अतिरेकी वापर झाल्याने अनेकांना डोळ्यांच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. यात लहान मुलांचाही समावेश आहे. डिजिटल साधनांपासून निघणारे निल किरणे आपल्या डोळ्यांना हानी पोहचवू शकतात. काम करीत असताना स्क्रीनपासून 20 ते 24 इंचाचे अंतर ठेवावे. सोबत त्याचा ब्राइटनेस कमी करावा. वारंवार पापण्या उघडबंद कराव्यात. तासात 10 ते 15 मिनिटांचा ब्रेक घ्यावा.

3) सकस आहार घ्यावा

डोळ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी रोज सकस आहार घेणे आवश्‍यक आहे. त्यात ‘अ’ जीवनसत्वाचा समावेश करावा. पपई, पालक आदींमध्ये मुबलक प्रमाणात ‘अ’ जीवनसत्व व ल्यूटिन असते. त्यासोबत हिरव्या पालेभाज्या तसेच माशांचाही आपल्या आहारात समावेश करावा. एका अभ्यासानुसार द्राक्ष डोळ्यांसाठी फायदेशीर ठरत असतात.

4) पुरेशी झोप घ्यावी

रोज पुरेशी झोप घेतल्याने आपले डोळे ‘हायड्रेड’ राहतात. अपूर्ण झोपेमुळे डोळे कोरडे व लाल होण्याचा धोका असतो. त्यामुळे पुरेशी झोप आवश्‍यक आहे. सोबतच आपण झोपतो त्या वेळी आपले संपूर्ण शरीर, अवयव यांना ‘रिकव्हर’ होण्यास पुरेसा वेळ मिळत असतो. त्यामुळे डोळ्यांची कार्यक्षमता अधिक सुधारत असते. डोळ्यांमधील लुब्रिकेशनसोबतच पेशी, आणि नसांची कार्यप्रणालीमध्ये सुधार होतो.

हेही वाचा:

उन्हाळ्याच्या हंगामात निरोगी राहून वजन कमी करायचे आहे? मग हे काकडीचे पराठे नक्की ट्राय करा!

Health care : या 5 पदार्थांमुळे आतड्यातील अल्सरचा धोका वाढतो, जाणून घ्या या पदार्थांबद्दल!

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.