काकडी खा, वजन कमी करा; जाणून घ्या इतर फायदे
उन्हाळ्यामध्ये स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करतो. आहारात लिंबू पाणी आणि कलिंगडचा समावेश करतो.
मुंबई : उन्हाळ्यामध्ये स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करतो. उन्हाळ्यात हायड्रेटेड ठेवण्यासाठी आपण अनेक फळांचा आहारात समावेश करतो. यामुळे आपले वजन वाढण्याची शक्यता असते. शरीर हायड्रेटेड ठेवत वजनही नियंत्रणात ठेवण्यासाठी काकडी अत्यंत फायदेशीर आहे. काकडी खाल्ल्याने आपले वजनही नियंत्रणात राहते आणि आपले शरीरही हायड्रेटेड राहण्यास मदत होते. (Include cucumber in the diet and loss weight)
वजन कमी करण्यासाठी आपण कॅलरीकडे लक्ष दिले पाहिजे. दिवसभर शक्य आहे तेवढी जास्त कॅलरी बर्न करा. 350 ग्रॅम काकडीमध्ये केवळ 2.30 ग्रॅम प्रथिने आणि 0.4 ग्रॅम चरबी असते. इतकेच नाही तर 1 कप काकडीमध्ये केवळ 14 कॅलरीज आढळतात. जर आपल्याला परत परत भूक लागत असले तर आपण काकडीचा रस घेतला पाहिजे. काकडीमध्ये 80 टक्के पाणी आढळते, ज्यामुळे काकडी खाल्ल्याने आपल्या शरीराला पुरेसे पाणी मिळते. याशिवाय काकडीमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्वे आढळतात.
काकडीमध्ये असलेल्या पोषण घटकांमुळे आपल्या शरीरावरील चरबी बर्न होण्यास मदत होते. काकडीमुळे शरीरातील रक्तामध्ये साखरेचे पातळी नियंत्रण राहते. काकडी खाणे जरी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी देखील काकडी खाल्ल्यानंतर आपण पाणी चुकूनही पिले नाही पाहिजे. काकडी खाल्ल्यानंतर अर्धा तास पाणी पिणे टाळा. कोणत्याही अन्नाचे पचन करण्यासाठी आतड्यातील पीएच पातळी आवश्यक असते, परंतु काकडी खाऊन किंवा त्यावर पाणी पिलेतर, पीएच पातळी कमकुवत होते आणि पचनसाठी बनविलेले अॅसिड पुरेसे प्रमाणात तयार होऊ शकत नाही.
उन्हाळ्यात सर्वांचीच त्वचा कोरडी होते. काकडीमध्ये सिलिकॉन, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचे प्रमाण भरपूर आहे. हे तीन पौष्टिक घटक त्वचेसाठी आवश्यक आहेत. काकडी खाल्ल्याने त्वचा स्वच्छ होते. काकडीमध्ये व्हिटॅमिन सी, बीटा कॅरोटीन सारख्या अँटी-ऑक्सिडंट असतात. ते आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करतात. काकडी, पुदिना आणि लिंबू आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. पाण्यात काकडी, लिंबू, पुदिना टाकून प्यायल्याने आपले शरीर तंदुरुस्त राहते.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Eczema Myth | ‘एक्झिमा’ आजाराबद्दल लोकांमध्ये संभ्रमाची स्थिती, जाणून घ्या या मागचं पूर्ण सत्य…#eczema | #Health | #skincare | #skincareproducts https://t.co/azKyegZj0a
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 26, 2021
(Include cucumber in the diet and loss weight)