कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात या 4 गोष्टींचा करा समावेश
कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. जास्त कोलेस्ट्रॉलमुळे नसा ब्लॉक होतात. ज्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा होत नाही. अशा वेळी हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढू नये म्हणून वेळीच काळजी घेतली पाहिजे.
मुंबई : धावपळीच्या जीवनशैलीमुळे अरोग्याकडे प्रत्येकाचं दुर्लक्ष होत आहे. व्यायाम करायला देखील वेळ मिळत नाहीये. वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो. वयानुसार हे आजार देखील वाढत जातात. आता तर तरुण वयात देखील हृदयविकाराचा झटका, मधुमेह आणि कमी रक्तदाब अशा समस्य़ा पुढे येत आहेत. चुकीच्या आहारामुळे वाढणारे कोलेस्ट्रॉल हे यामागचे एक कारण आहे. तुम्ही देखील वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे त्रस्त असाल तर आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत जे तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू देणार नाहीत.
ओट्स
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तुम्ही आहारात ओट्सचा समावेश केला पाहिजे. ओट्ससोबत केळी आणि स्ट्रॉबेरीही खाऊ शकता.
नट्स
वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी नट्स देखील मदत करतात. बदाम, पिस्ता आणि काजू यांसारखे नट केवळ कोलेस्ट्रॉल कमी करत नाहीत तर हृदयासाठीही चांगले असतात.
सोया
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सोयाबीन किंवा सोया मिल्कचा तुमच्या आहारात समावेश करु शकता. एका आठवड्यासाठी दररोज किमान 25 ग्रॅम सोया प्रोटीनचे सेवन केल्यास कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते.
लाल मसूर
मसूर आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. कारण त्यात फायबर मुबलक प्रमाणात आढळते. ज्याचे प्रमाण 7.8 ग्रॅम आहे. हे कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी प्रभावी आहे.
अस्वीकरण: ही बातमी फक्त सामान्य माहितीच्या आधारावर देण्यात आली आहे. कोणतीही समस्या असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.