‘हे’ पदार्थ खाल, तर कोरोनाला हरवाल; एकदा वाचाच !
दिवसेंदिवस देशामध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही वाढतच चालेली आहे. यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेणे आता खूप महत्वाचे झाले आहे.
मुंबई : देशामध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही वाढतच चालेली आहे. यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेणे आता खूप महत्वाचे झाले आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमध्ये अनेकांना कोरोनाचा संसर्ग देखील झाला. मात्र, कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर आहारात नेमके काय घेतले पाहिजे. ज्यामुळे आपण कोरोनावर लवकर मात करू शकतो. हे अनेकांना माहिती नसते, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कोरोनामुक्त होण्यासाठी आपण आहारात नेमके काय घेतले पाहिजे. (Include this in your diet to get rid of corona)
जर आपल्याला कोरोनामुक्त व्हायचे असेल तर आपण आहारात मासांचा समावेश केला पाहिजे. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा पोषक तत्व आहे. त्यात असलेले व्हिटॅमिन-सी केवळ आपल्या प्रतिकारशक्तीसाठी चांगले नाही तर पुनरुत्पादक प्रक्रिया आणि डोळ्यांसाठी देखील फायदेशीर आहे. मासे लोहाचेही उत्तम स्रोत मानले जाते, जे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. लोह आपल्या फुफ्फुसातून इतर ऊतकांमध्ये ऑक्सिजन पोहोचवण्याचे कार्य करते.
अंडी आपल्या शरीरासाठी खूप लाभदायी आहेत. तसेच, त्यात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. अंडी उच्च गुणवत्तेच्या प्रथिनांचा (High Quality Protine) चांगला स्रोत आहे. अंडी आपल्या स्नायूंच्या तंदुरुस्तीसाठी देखील खूप उपयुक्त आहेत. याव्यतिरिक्त आपल्या रक्तातील साखर नियंत्रित करण्यात, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यात आणि वजन कमी करण्यास अंडी खूप प्रभावी आहेत. यामुळे कोरोनाच्या काळामध्ये तर आपल्या आहारात अंडी घेतली पाहिजेत.
पनीर खाणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप महत्वाचे आहे. पनीरमध्ये पोटॅशियम, सेलेनियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि झिंक इत्यादी अनेक पोषक घटक असतात. पनीर आपल्याला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी ठेवते. आरोग्याच्या अनेक समस्यांवर मात करण्यासाठी पनीर मदत करते. हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शियम आवश्यक आहे. पनीरमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस मोठ्या प्रमाणात असते.
सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने, मॉलिव्डेनम, ट्रिप्टोफॅन, मँगनीज, लोह, ओमेगा-३, फॅटी अॅसिड्स, फॉस्फरस, फायबर, मॅग्नेशियम, तांबे, ‘ब’ व ‘क’ जीवनसत्त्व आणि काही प्रमाणात पोटॅशियम असते. सोयाबीनमध्ये स्निग्ध पदार्थ भरपूर प्रमाणात असतात आणि काबरेहायड्रेट्स कमी असतात. कोणत्याही कडधान्यापेक्षा किंवा तृणधान्यापेक्षा सोयाबीनमध्ये प्रथिनांचे प्रमाण काही पटीने जास्त असते. यातील आयसो फ्लेव्हन संयुगांमुळे शरीरातील चरबीच्या पेशींचे उत्पादन कमी होते.
‘शेंगदाणे’ आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या स्वयंपाक घरात हमखास असतातच. शेंगदाण्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात. त्यामुळेच शेंगदाणे प्रोटीनसाठी सर्वात स्वस्त वनस्पती स्रोत मानले जातात. मुठभर शेंगदाण्यामध्ये शरीराला पुरेशा प्रमाणात कॅलरीज, कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन असतात. तसेच शेंगदाण्यापासून व्हिटामिन इ, के, आणि बी6 भरपूर प्रमाणात मिळतात. अनेक आजारांपासून बचाव करण्याऱ्या शेंगदाण्यांचे शरीराला होणारे फायदेही अधिक आहेत.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायकhttps://t.co/y89Pxceis3#VitaminD #FoodSupplement
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 20, 2020
(Include this in your diet to get rid of corona)