Indian Railway | पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी रेल्वेचे खास ‘व्हिस्टाडोम कोच’, पाहा याची वैशिष्ट्ये…
या वर्षाच्या अखेरीस रेल्वेने असा कोच तयार केला आहे, ज्यात बसून तुम्हाला खूप वेगळे आणि अनोखे वाटणार आहे.
मुंबई : भारतीय रेल्वेने सरत्या वर्षात आणखी एक कामगिरी केली आहे. मंगळवारी (29 डिसेंबर) रेल्वे खात्यात नवा कोच सामील झाला आहे. 2020 हे वर्ष संपायला आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. या वर्षाच्या अखेरीस रेल्वेने असा कोच तयार केला आहे, ज्यात बसून तुम्हाला खूप वेगळे आणि अनोखे वाटणार आहे. या कोचमध्ये बसल्यानंतर आपण निसर्गाच्या सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटू शकाल. वास्तविक, भारतीय रेल्वेने 44 सीट्सचा ‘व्हिस्टाडोम कोच’ (Vistadome coach) तयार केला आहे. हा कोच पर्यटकांना रेल्वेकडे अधिकाधिक आकर्षित करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. भारतीय रेल्वेने मंगळवारी या नव्या कोचची चाचणी केली आहे (Indian Railway design Vistadome coach for attract tourists).
भारतीय रेल्वेचा हा नवीन डिझाइन केलेला ‘व्हिस्टाडोम कोच’ 180 किमी प्रतितास वेगाने धावणार आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी स्वत: ट्विट करत याबाबत ‘व्हिस्टाडोम कोच’ची माहिती दिली आहे. या नवीन कोचची छायाचित्रे ट्विटरवर शेअर करताना त्याने लिहिले की, ‘हे वर्ष एक मोठी कामगिरी करुन संपत आहे. भारतीय रेल्वेने नवीन डिझाइन केलेले ‘व्हिस्टाडोम टुरिस्ट कोच’ची ताशी 180 किमी वेगाने चाचणी घेतली आहे. हा कोच प्रवाश्यांसाठी रेल्वे प्रवास संस्मरणीय बनवेल आणि पर्यटन क्षेत्रात रेल्वेला आणखी चालना देईल.’
Ending the Year on a Great Note: Indian Railways’ ? successfully completed 180 kmph speed trial of new design Vistadome tourist coach
These coaches will make train journeys memorable for the passengers ?️ & give further boost to tourism ? pic.twitter.com/3JxeVbQClg
— Piyush Goyal (@PiyushGoyal) December 29, 2020
काय आहेत या कोचची वैशिष्ट्य?
या नवीन व्हिस्टाडोम कोचमध्ये (Vistadome Coach) मोठ्या काचा लावण्यात आल्या आहेत. ज्यातून प्रवासी त्यांच्या प्रवासादरम्यान बाहेरील दृश्य अर्थात निसर्गाचा आनंद घेऊ शकतील. या एका कोचमध्ये 44 जणांच्या बसण्याची व्यवस्था केली गेली आहे. पर्यटकांच्या आरामदायी प्रवासासाठी सीटमध्ये एअर स्प्रिंग सस्पेंशन बसवण्यात आले आहेत. या सगळ्या व्यतिरिक्त प्रवासी निळ्याशार आभाळाचे दर्शनही घेऊ शकणार आहेत. यासाठी खास इलेक्ट्रॉनिक नियंत्रित काचेच्या छप्परांचा उपयोग करण्यात आला आहे. या प्रत्येक कोचमध्ये ‘लाँग विंडो लाऊंज’ देखील असेल.
रेल्वेमंत्र्यांचं ट्विट
It is rightly said, “Journey is best measured in terms of memories rather than miles.”
Take a look at the new Vistadome coaches of Indian Railways that will give an unforgettable travel experience to passengers & will ensure that they truly have a journey to remember. pic.twitter.com/o2Srs0xR4B
— Piyush Goyal (@PiyushGoyal) December 30, 2020
भारताच्या सर्वात वेगवान रेल्वेला तगडी टक्कर!
भारतीय रेल्वेच्या या नव्या कोचने ताशी 180 किलोमीटर वेगाचा टप्पा गाठला आहे. यामुळे आता या ‘व्हिस्टाडोम कोच’ ट्रेनने वंदे भारत ट्रेनच्या गतीला आव्हान दिले आहे. ‘व्हिस्टाडोम कोच’पूर्वी ‘वंदे भारत’ ट्रेन ताशी 180 किमी वेगाने रुळांवर धावत होती.
(Indian Railway design Vistadome coach for attract tourists)