नव्या वर्षात गोवा-मसुरी फिरायला जायचा विचार करताय? मग रेल्वेची ‘ही’ खास योजना वाचा…

भारतीय रेल्वेने पर्यटकांसाठी एक खास योजना आणली आहे. ज्यात तुम्ही बेंगळुरू, बांदीपूर, म्हैसूर, चिकमगलूर, हम्पी, बदामी आणि गोवा यासारख्या उत्तम ठिकाणांना भेट देऊ शकता.

नव्या वर्षात गोवा-मसुरी फिरायला जायचा विचार करताय? मग रेल्वेची ‘ही’ खास योजना वाचा...
Follow us
| Updated on: Dec 28, 2020 | 3:44 PM

मुंबई : 2020 वर्ष संपायला आता केवळ 3 दिवस शिल्लक राहिले आहेत. यापूर्वी प्रत्येकाला जुन्या वर्षाने खूप काही दिले आता नव्या वर्षाचे आनंदाने स्वागत करू, असे वाटायचे. मात्र, यांदाचे 2020 हे वर्ष लवकरात लवकर संपावे असे प्रत्येकाची इच्छा आहे. कोरोना महामारीचा प्रत्येकाच्या जीवनावर खोल परिणाम झाला आहे. यामुळे 2021ची एक सुंदर सुरुवात करण्यासाठी प्रत्येकजण सुट्टी साजरा करण्यासाठी कुठेतरी बाहेर जाण्याची योजना करत आहेत. कोणी डोंगर-दऱ्यांमध्ये जात आहे, तर कोणी समुद्रकिनार्‍याकडे जात आहे. रेल्वे आणि बसचे आरक्षण अक्षरशः पूर्णपणे भरले आहे. अशा परिस्थितीत भारतीय रेल्वेनेही ग्राहकांसाठी खास योजना आणली आहे (Indian railway new scheme and packages for goa to masuri trip).

आपण जेव्हाही बाहेर फिरायला जाण्याचा विचार करतो, तेव्हा सोयीस्कर असे एखादे खास पॅकेज शोधत असतो. ज्यामध्ये आपला प्रवास, भोजन आणि प्रवासाची व्यवस्था या सगळ्यांचा समावेश असतो. याशिवाय कुठे आणि किती दिवस मुक्काम करायचा या विचारात देखील असतो. अशा परिस्थितीत भारतीय रेल्वेने पर्यटकांसाठी एक खास योजना आणली आहे. ज्यात तुम्ही बेंगळुरू, बांदीपूर, म्हैसूर, चिकमगलूर, हम्पी, बदामी आणि गोवा यासारख्या उत्तम ठिकाणांना भेट देऊ शकता.

कुठे-कुठे जाऊ शकता?

यामधील पहिला दौरा म्हणजे ‘प्राईड ऑफ कर्नाटक विथ गोवा’, ज्यामध्ये तुम्हाला 6 रात्री आणि 7 दिवसांचे पॅकेज मिळते. यात तुम्ही बेंगळुरूपासून प्रवासाला सुरुवात करून नंतर बांदीपूर, म्हैसूर, चिकमगलूर, हम्पी, बदामी आणि गोवा मार्गे बंगळुरूला परत याल. जर, आपण या पॅकेजच्या नियमित किंमतीबद्दल बोलत असू तर ते 3 लाख 20 हजार रुपये इतके आहे. परंतु, या विशेष ऑफरमध्ये आपण ते फक्त 2 लाख 80 हजार रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. याची सुरुवात 14 जानेवारी, 14 फेब्रुवारी आणि 14 मार्चपासून होणार आहे.

यादीतील दुसरा दौरा आहे ‘ज्वेल्स ऑफ साऊथ’. जिथे आपण बंगळुरूपासून दौरा प्रारंभ करून, म्हैसूर, हम्पी, महाबलीपुरम, कोचीनमार्गे परत बंगळुरुला येता. 6 रात्री आणि 7 दिवसांच्या या पॅकेजची किंमत 3 लाख 20 हजार रुपये इतकी आहे. परंतु आपण ऑफरच्या किंमतीमध्ये, केवळ 2 लाख 80 हजार रुपयांमध्ये हे पॅकेज मिळवू शकता. यासाठी आपण 21 जानेवारी, 21 फेब्रुवारी आणि 21 मार्चसाठी आपली जागा आरक्षित करू शकता (Indian railway new scheme and packages for goa to masuri trip).

शॉर्ट ट्रिपवरही मोठी ऑफर

जर, तुम्ही छोट्या 6 ते 7 दिवसांऐवजी छोट्या ट्रीपचा विचार करत असला तर, तुम्हाला ‘प्राईड ऑफ कर्नाटक’मध्ये 2 रात्री आणि 3 दिवसांचे पॅकेज मिळेल. ज्याची किंमत 59,999 रुपये इतकी आहे. त्याची सुरुवात 14 जानेवारी, 14 फेब्रुवारी आणि 14 मार्च रोजी होणार आहे. त्याच वेळी, ‘ज्वेल्स ऑफ साऊथ’मध्ये देखील आपल्याला 2 रात्री आणि 3 दिवसांचे पॅकेज मिळेल. ज्याची किंमत 59,999 रुपये इतकी असून, 21 जानेवारी, 21 फेब्रुवारी आणि 21 मार्चपासून सुरू होईल.

कुटुंबासमवेत मिळतील ‘हे’ आणखी फायदे!

तुम्ही गोव्याला जात असाल तर तुम्हाला, ट्रेनमध्ये गेल्यावर पहिल्यांदा न्याहारी व इतर अत्यावश्यक सेवा दिल्या जातील. यानंतर, पुढचा थांबा जिथे असेल, तिथल्या अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळांवर फिरवले जाईल आणि त्यानंतर दुपारचे जेवण देखील दिले जाईल. यानंतर कॉफी चहाची व्यवस्था देखील असेल. गोव्यात, आपल्याला संग्रहालय, चर्चमध्ये फिरवले जाईल. तसेच, रात्रीच्या जेवणा वेळी तेथील सर्वात प्रसिद्ध डिश चाखण्यास दिली जाईल. अशाप्रकारे, आपल्याला दररोज काहीतरी नवीन मिळेल. अशाप्रकारे ही ट्रीप 2021मधील सर्वात उत्कृष ट्रीप ठरेल.

(Indian railway new scheme and packages for goa to masuri trip)

हेही वाचा :

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.