IRCTC : चला हिमाचल, दार्जिलिंग, कश्मीर-लडाख वा चारधाम फिरायला, उन्हाळी सहलींचे विमान प्रवासासह पॅकेज जारी
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (आयआरसीटीसी) च्या पश्चिम विभागाच्या मुंबई कार्यालयाने मुंबईहून उन्हाळी सुट्टीतील विशेष देशांतर्गत हवाई पॅकेजेसची घोषणा केली आहे.

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा काळ सुरु होत आहे. मुलांच्या परीक्षा संपताच अनेकांना गावी जाण्याचे वेध लागतात. तर काही जण मुंबईतील उ्ष्णतेला कंटाळून थंड हवेच्या ठिकाणी जात असतात. आता भारतीय रेल्वेच्या आयआरसीटीसीने मुंबईतून उन्हाळी सहलींचे विमान प्रवासासह नवीन पॅकेज जारी केले आहे. या सहलीत हिमाचल, गंगटोक आणि दार्जिलिंगचे शांत निसर्गरम्य सौंदर्य आणि काश्मीर आणि लडाखचा येथील बर्फाची पसरलेली पांढरी शुभ्र चादर अनुभववयाची असल्यास किंवा चारधामचा आध्यात्मिक अनुभव घ्यायचा असल्यास आयआरसीटीसीने प्रत्येक प्रवाशाच्या आवडीनुसार एक आदर्श सुट्टी एन्जॉय करण्याचे पॅकेज जाहीर केले आहे.
आयआरसीटीसीने मुंबईहून उन्हाळी विशेष देशांतर्गत हवाई दौऱ्याचे पॅकेजेस सादर केली आहेत. आयआरसीटीसीने हे मुंबईकरांसाठी उन्हाळ्याच्या सुट्टीचे विशेष घरगुती हवाई पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेजमध्ये तुम्हाला तुमच्या विमान प्रवासाचा खर्चासह इतर रेल्वे, बस भाड्याचा खर्च एकत्र द्यायचा आहे. आणि निर्धास्त होत कुटुंबासह किंवा ग्रुपसह किंवा एकट्याने सहलीचे बुकींग करीत आनंद लुटता येणार असल्याचे पश्चिम विभागाचे समुह महाव्यवस्थापक गौरव झा यांनी म्हटले आहे.
या तारखांना सहली
आईआरसीटीसीने सर्व समावेशक काश्मीर (20.04.25/ 03.05.25/ 07.05.25/ 18.05.25/ 25.05.25 आणि 01.06.25), लद्दाख (05.05.25/ 10.05.25/ 18.05.25/ 24.05.25), गंगटोक आणि दार्जिलिंग (19.04.25/ 03.05.25 आणि 18.05.25), हिमाचल (28.04.25 आणि 19.05.25), चारधाम (24.05.25) अशा सहली लाँच केल्या आहेत. हे पॅकेज खुपच चांगले असून प्रवाशांची काळजी घेत डिझाईन केल्या आहेत. यात विमानाची रिटर्न तिकीटांसह सर्व खर्चाचा समावेश आहे.




बुकींग कसे करायचे ?
सर्व स्थानांतर प्रवास, प्रक्षेनीय स्थळ, जेवण, प्रवेश शुल्क, निवास व्यवस्था, टुर गाईड आणि प्रवास विमा आणि जीएसटीचा समावेश आहे. आयआरसीटीसी उन्हाळी विशेष देशांतर्गत हवाई पॅकेजेससाठी बुकिंग आता खुले झाले आहे. उपलब्ध पॅकेजेस, किंमत आणि बुकिंगबद्दल अधिक माहितीसाठी ग्राहक आयआरसीटीसी वेबसाइट www.irctctourism.com ला भेट देऊ शकतात किंवा पश्चिम विभाग मुंबई कार्यालय 8287931886 (व्हॉट्सएप किंवा एसएमएस) वर संपर्क साधू शकतात.