Cucumber for Cholesterol: काकडी खाल्याने कोलेस्ट्रॉल खरंच कमी होते का ?
हाय कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर डॉक्टर आहाराकडे विशेष लक्ष द्यायला सांगतात.
भारतात जेवणाची चव वाढावी म्हणून सोबतील सॅलॅड खाल्ले जाते, त्यामध्ये काकडीचा (cucumber) हमखास समावेश असतो. किंवा बरेच लोक आपले डाएट (diet) पाळण्यासाठी, वजन जलदरित्या कमी करण्यासाठी तसेच शरीर डिटॉक्स करण्यासाठीही काकडीचे सेवन करतात. काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते, तिचे सेवन केल्याने शरीरातील पाण्याची पातळी कायम राहते. त्यासह काकडीचे आरोग्यासाठीही अनेक फायदे आहेत. आजकाल काकडीचे सेवन वेगाने वाढणाऱ्या हाय कोलेस्ट्रॉलच्या (cholesterol)समस्येतही फायदेशीर मानले गेले आहे. काकडी खाल्याने शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते आणि रक्तदाबही नियंत्रणात राहतो. काकडीचे सेवन केल्याने हाय कोलेस्ट्रॉलची पातळी किती संतुलित होऊ शकते हे आपण जाणून घेऊया.
हाय कोलेस्ट्रॉल लेव्हल मध्ये काकडीचे सेवन करण्याचे फायदे :
चेस्टर कंट्री डॉट ओआरजीच्या अहवालानुसार, काकडीचे नियमित सेवन केल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल (एलडीएल) ऐवजी चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी (एचडीएल) वाढते, ज्यामुळे शरीराचे कार्य योग्य प्रकारे करण्यास मदत मिळते.
1) तेलकट अन्न आणि दुग्धजन्य पदार्थां हे शरीरात (एलडीएल) खराब कोलेस्ट्रॉलचे कारण बनते. मात्र काकडीचे सेवन केल्याने चांगल्या कोलेस्ट्रॉलची (एचडीएल) पातळी राखण्यास मदत होते.
2) काकडीमध्ये मुबलक प्रमाणात पोषक तत्वे असतात, तसेच काकडी अतिशय चविष्टही असते, ज्यामुळे अनेक लोकांना ती खायला आवडते. त्यामुळे तुम्ही रोजच्या आहारात काकडीचा समावेश जरूर केला पाहिजे.
3) शरीरातील लठ्ठपणा आणि रक्तातील साखरेची पातळी वाढणे यासारख्या अनेक आजारांसाठी हाय कोलेस्ट्रॉल कारणीभूत ठरते. तर काकडीमध्ये कॅलरीज खूप कमी असतात, त्यामुळे ती खाल्ल्याने वजन वाढत नाही आणि डाएटही सांभाळले जाते.
4) काकडीमध्ये स्टेरॉल्स एलिमेंट्स असतात, जे शरीरातील 20 टक्के खराब कोलेस्ट्रॉल ( एलडीएल) कमी करण्यास प्रभावी ठरतात.
5) काकडी कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासह फॅट बर्न करण्यासही मदत करते. त्यामध्ये असलेले सॉल्युबल फायबर शरीरातील सर्व विषारी पदार्थ (टॉक्सिन्स) काढून टाकण्यास मदत करते.