Food | ‘जंकफूड’प्रेमींसाठी आनंदाची बातमी! ‘हे’ नियम पाळून बिनधास्त खाऊ शकता आवडते पदार्थ…

तुम्हलाही पिझ्झा, पास्ता, फ्रेंचफ्राईज आणि बर्गर यासारखे पदार्थ खाण्यास आवडत असले, तर काळजी करण्याची गरज नाही.

Food | ‘जंकफूड’प्रेमींसाठी आनंदाची बातमी! ‘हे’ नियम पाळून बिनधास्त खाऊ शकता आवडते पदार्थ...
Follow us
| Updated on: Jan 06, 2021 | 2:48 PM

मुंबई : आरोग्याच्या दृष्टीने विचार करता, बाहेरील अन्नपदार्थ अर्थात जंकफूड हे हानिकारक असते. अनेकांच्या बाबतीत तर जंक फूड खाणे पूर्णपणे वर्ज्य आहे. ज्यांना हे पदार्थ खाण्याची आवड आहे, अनेक प्रयत्न करूनही त्यांना ही सवय मोडता येत नाही. तुम्हलाही पिझ्झा, पास्ता, फ्रेंचफ्राईज आणि बर्गर यासारखे पदार्थ खाण्यास आवडत असले, तर काळजी करण्याची गरज नाही. काही सोपे नियम पळून, खाण्याची पद्धत बदलून तुम्ही बिनधास्त जंकफूडचे सेवन करू शकता. त्यानंतर आपलयाला आरोग्याचीही चिंता राहणार नाही (Junk Food eating habits for good health).

कोल्ड ड्रिंक पिणे टाळा.

काही लोकांना नेहमीच कोल्ड ड्रिंक पिण्याची सवय असते. असे लोक जेव्हा जंकफूड खातात, तेव्हा त्यासोबत कोल्डड्रिंक, आईस टी, कोल्ड कॉफी या सारख्या कोल्ड ड्रिंक पितात. कोल्ड ड्रिंकसह जंकफूड खाल्ल्याने, त्यातील अतिरिक्त चरबी आणि कार्बोहायड्रेट आतड्यांमधे चिकटतात. यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. तर अशा वेळी जंकफूड खायला जाताना या कोल्ड्रिंकऐवजी एखादे गरमागरम सूप ऑर्डर करा. जर आपल्याला सूप आवडत नसेल, तर आपण गरम कॉफी देखील पिऊ शकता. मात्र, जंक फूडसह थंड पदार्थ खाणे किंवा पिणे टाळा (Junk Food eating habits).

जंकफूडसह सलाड खा.

जंक फूडसह सलाडचे कॉम्बिनेशन आपल्यास विचित्र वाटू शकते. परंतु, कधीकधी चांगल्या आरोग्यासाठी काही तडजोडी करणे अधिक फायद्याचे असते. म्हणून पुढच्या वेळी, जंकफूड खाताना त्याच्याबरोबर एक प्लेट सलाड नक्की खा. सलाडमधील टोमॅटो, काकडी, कांदा, बीटरूट, कोबी, ब्रोकोली, लिंबू, मिरपूड आणि मीठ हे घटक खाण्यास स्वादिष्ट आहेतच, पण जंकफूडपासून होणारे नुकसान देखील ते कमी करतातसलाडमधील फायबर आपण खाल्लेल्या जंकफूडला लवकर पचण्यास मदत करेल.

आवडते पदार्थ घरीच बनवल्यास उत्तम!

जर आपल्याला जंकफूडची तलफ येत असले, तर शक्यतो हे पदार्थ घरीच बनवण्याचा प्रयत्न करा. तसेच, त्यात अधिकाधिक भाजीपाला आणि आरोग्याच्या दृष्टीने इतर फायदेशीर गोष्टी समविष्ट करा. यामुळे जंकफूडची क्रेविंगही पूर्ण होईल आणि आरोग्याच्या दृष्टीनेही अनेक लाभ होतील.

(Junk Food eating habits for good health)

हेही वाचा :

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.