Health Tips | मधुमेहाच्या रुग्णांनी रोज प्यावा ‘या’ 5 प्रकारचा चहा, रक्तातील साखर राहील नियंत्रणात!
मधुमेह अर्थात डायबिटीस हा एक असाध्य रोग आहे, जो आहार आणि निरोगी जीवनशैलीने नियंत्रणात ठेवता येतो. हा आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवावे लागते. पण तुम्हाला माहीत आहे का की, रोज काही हर्बल चहा प्यायल्याने तुम्ही रक्तातील साखर नियंत्रणात ठेवू शकता.
मुंबई : मधुमेह अर्थात डायबिटीस हा एक असाध्य रोग आहे, जो आहार आणि निरोगी जीवनशैलीने नियंत्रणात ठेवता येतो. हा आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवावे लागते. पण तुम्हाला माहीत आहे का की, रोज काही हर्बल चहा प्यायल्याने तुम्ही रक्तातील साखर नियंत्रणात ठेवू शकता.
होय, काही चहामध्ये असे नैसर्गिक घटक असतात, जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतात. आपण आपल्या आहार आणि व्यायामासह या रोजच्या रुटीनमध्ये चहाचा समावेश करू शकता. चला तर जाणून घेऊया अशा चहाबद्दल, जे पिऊन तुम्ही मधुमेहाला नियंत्रित करू शकता.
ग्रीन टी
ग्रीन टीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे शरीराची जळजळ कमी करतात आणि खराब झालेल्या पेशी दुरुस्त करण्यास मदत करतात. हे इन्सुलिनची पातळी देखील व्यवस्थापित करतात. अभ्यासानुसार, ग्रीन टीमध्ये एपिगॅलोक्टेचिन गॅलेट नावाचे बायोक्टिव्ह कंपाऊंड असते, जे स्नायूंमध्ये ग्लुकोजची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. या व्यतिरिक्त, हे वजन कमी करण्यास देखील मदत करते. ग्रीन टीमध्ये एक चिमूटभर जायफळ मिसळून प्यायल्याने वजन लवकर कमी होते आणि चांगली झोप येते.
हिबिस्कस टी
जर, तुम्हाला मसालेदार आणि गोड चहा पिण्याची आवड असेल, तर हिबिस्कस चहा एकदम योग्य आहे. यात अनेक प्रकारचे नैसर्गिक घटक असतात. हिबिस्कसमध्ये पॉलीफेनॉल, अँटीऑक्सिडंट्स, सेंद्रीय आम्ल आणि अँथोसायनिन असतात, जे दाह कमी करण्यास मदत करतात. या व्यतिरिक्त, हे इंसुलिन प्रतिकार सुधारून रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित राखते. तसेच रक्तदाब नियंत्रणात ठेवतात.
ब्लॅक टी
ब्लॅक टी नैसर्गिकरित्या इन्सुलिनची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतो. यात अँटी-ऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत, जे ग्लूकोजची पातळी संतुलित राखण्यास मदत करतात. अभ्यासानुसार, 2 ते 3 कप ब्लॅक टी पिण्यामुळे इन्सुलिन स्राव सुधारतो आणि नैसर्गिक गोडवा येतो. लक्षात ठेवा की, या चहामध्ये वरून कोणतीही साखर मिसळू नका.
दालचिनीयुक्त चहा
दालचिनीयुक्त चहाची चव वेगळी आहे. त्यात असलेले अँटी-ऑक्सिडंट मधुमेही लोकांसाठी खूप फायदेशीर आहेत. याशिवाय दालचिनीचे पाणी किंवा हर्बल टीमुळे लठ्ठपणा देखील कमी होतो. यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही कमी होतो.
कॅमोमाइल टी
ज्या लोकांना रात्री व्यवस्थित झोप येत नाही, अशा लोकांसाठी कॅमोमाइल चहा खूप फायदेशीर आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, हा चहा नियमित प्यायल्याने इन्सुलिनची पातळी नियंत्रित राहू शकते. यात अँटी-ऑक्सिडंट, दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. 2 ते 3 कप कॅमोमाइल चहा प्यायल्याने साखरेची पातळी नियंत्रणात राहते. हे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे होणाऱ्या समस्याही दूर करते. या व्यतिरिक्त, ते चयापचय वाढवते, आतडे निरोगी ठेवते आणि वजन कमी करण्यास मदत करते.
(टीप : सेवनापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
हेही वाचा :
डोळ्यांखालील डार्क सर्कल्सनी त्रस्त आहात, ‘हे’ घरगुती उपाय नक्की ट्राय करून पाहा
Health Tips | निरोगी राहण्यासाठी आहारासंबंधित ‘या’ 5 टिप्स नक्की पाळा, नेहमी राहाल तंदुरुस्त!
तरुणींमध्ये वाढतेय ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीची क्रेझ, वेगवेगळ्या आऊटफिट्ससोबत अशा प्रकारे करू शकता कॅरी!