तळणीच्या तेलाचा पुन्हा-पुन्हा वापर करताय? मग, आधी जाणून घ्या याचे गंभीर दुष्परिणाम…

पावसाळा असो किंवा कोणताही सण, घरात पक्वान्न बनवण्याची प्रक्रिया सुरूच असते. अशा स्थितीत अनेक गोष्टी तळताना आपण बऱ्याचदा कढईत किंवा पातेल्यात जास्त तेल टाकतो. पदार्थ तयार केल्यानंतर, उर्वरित तेल नंतरच्या वापरासाठी ठेवतो.

तळणीच्या तेलाचा पुन्हा-पुन्हा वापर करताय? मग, आधी जाणून घ्या याचे गंभीर दुष्परिणाम...
खाद्यतेल
Follow us
| Updated on: Sep 02, 2021 | 10:57 AM

मुंबई : पावसाळा असो किंवा कोणताही सण, घरात पक्वान्न बनवण्याची प्रक्रिया सुरूच असते. अशा स्थितीत अनेक गोष्टी तळताना आपण बऱ्याचदा कढईत किंवा पातेल्यात जास्त तेल टाकतो. पदार्थ तयार केल्यानंतर, उर्वरित तेल नंतरच्या वापरासाठी ठेवतो. यानंतर हे तेल भाज्या बनवण्यासाठी, पराठे, पुरी किंवा इतर गोष्टी बनवण्यासाठी वापरले जाते. पण वापरलेल्या तेलाचा पुन्हा पुन्हा वापर करणे किती धोकादायक असू शकते याची तुम्हाला माहितीही नसेल. चला तर याबद्दल जाणून घेऊया…

पुन्हा का वापरु नये?

डॉक्टरांनी अनेक अहवालांमध्ये असे म्हटले आहे की, स्वयंपाकाचे तेल एकदा वापरले की पुन्हा कधीही वापरू नये, कारण ते खराब व्हायला सुरुवात होते आणि तेलामध्ये ट्रान्स-फॅटी अॅसिडचे प्रमाण वाढू लागते, जे आरोग्यासाठी चांगले नाही. विशेषतः थंड तेल पुन्हा गरम करणे टाळा, कारण यात स्मोकिंग पॉईंट्स खूप कमी असतात. मोहरीचे तेल, राईस ब्रान ऑइल इत्यादी पुन्हा एकदा वापरता येतात, परंतु तरीही ते टाळण्याचा सल्ला दिला जातो.

या व्यतिरिक्त, आपण पुन्हा तेलाचा वापर करताच, ते फ्री रॅडिकल्स तयार करू शकते आणि ते दीर्घकाळ वापरणे आपल्यासाठी हानिकारक आहे. हे फ्री रॅडिकल्स कार्सिनोजेनिक असू शकतात, जे आपल्या शरीरावर परिणाम करू शकतात. याशिवाय कोलेस्टेरॉल वगैरे समस्या वाढण्याची शक्यता आहे. अनेकांना घशात जळजळ, हृदयाशी संबंधित आजार देखील होतात.

  1. वापरलेल्या तेलात ट्रान्स फॅट असते, जे शरीरासाठी अत्यंत घातक मानले जाते. ते खाल्ल्याने शरीरात चांगले कोलेस्टेरॉल कमी होऊ लागते आणि वाईट कोलेस्टेरॉल वाढू लागते. यामुळे, उच्च रक्तदाब आणि हृदयरोगाचा धोका लक्षणीय वाढतो.
  2. वापरलेल्या स्वयंपाकाचे तेल अल्डेहाईड सारखे अनेक विष बाहेर टाकते, जे हृदयाला हानिकारक असतात आणि अल्झायमर, स्ट्रोक, कर्करोग, पार्किन्सन आणि यकृताच्या समस्यांचा धोका वाढवतात.
  3. जर तुम्हाला अनेकदा गॅसची समस्या येत असेल किंवा पोटात जळजळ जाणवत असेल, तर याचे कारण स्वयंपाकाचे वापरलेले तेल देखील कारणीभूत असू शकते. स्ट्रीट फूड आणि रेस्टॉरंट्समध्ये स्वयंपाकात असेच वापरलेले तेल वापरले जाते. हेच कारण आहे की, बाहेरचे अन्न खाल्ल्याने अनेकदा लोकांच्या पोटात समस्या निर्माण होतात.
  4. जर तुम्ही उच्च रक्तदाबाचे रुग्ण असाल तर तुम्ही विशेषतः अशा तळणीच्या तेलाचा स्वयंपाकात वापर करणे टाळावे. यामुळे तुमच्या समस्या आणखी वाढू शकतात. तसेच, खराब कोलेस्टेरॉलच्या वाढीमुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

या शिल्लक तेलाचं काय कराल?

एकाच वेळी जितके तेल टाकाल, तितके तेल संपवण्याचा प्रयत्न कराल. जर तेल शिल्लक असेल तर आपण ते इतर कारणांसाठी वापरू शकता. उदाहरणार्थ, याचा उपयोग घराचे दरवाजे आणि कुलूप गंजण्यापासून वाचवण्यासाठी केला जाऊ शकतो. आपण वापरलेले तेल आणि व्हिनेगरच्या मिश्रणाने लाकडी फर्निचर पॉलिश करू शकता.

अशा तळणीच्या विशेषतः रीफाइंड तेलाचा वापर टाळा. त्याऐवजी सूर्यफूल, मोहरी, सोयाबीन तेल, शेंगदाणे किंवा तिळाचे तेल तळण्यासाठी वापरा. तळण्यासाठी भाजी, तूप, खोबरेल तेल वापरणे ठीक आहे, पण ते डीपफ्रायसाठी वापरू नका.

हेही वाचा :

Spinach Soup : आजारांपासून दूर राहण्यासाठी होममेड पालक सूप प्या आणि निरोगी आयुष्य जगा!

भारतातील सर्वात लोकप्रिय पाच सांस्कृतिक ठिकाणे जी पर्यटकांना विशेष आवडतात

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.