AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ग्रीन टी आणि ब्लॅक टीमुळे वाढते रोगप्रतिकारक शक्ती, वाचा अधिक…

सध्या देशामध्ये कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे आपल्या तब्येतीची विशेष काळजी घेणे आता गरजेचे झाले आहे.

ग्रीन टी आणि ब्लॅक टीमुळे वाढते रोगप्रतिकारक शक्ती, वाचा अधिक...
ग्रीन टी
Follow us
| Updated on: Apr 10, 2021 | 12:26 PM

मुंबई : सध्या देशामध्ये कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे आपल्या तब्येतीची विशेष काळजी घेणे आता गरजेचे झाले आहे. यामुळे आपल्याला आहारात जास्तीत-जास्त प्रमाणात रोगप्रतिकारक शक्ती वाढेल असा आहार घ्यावा लागणार आहे. ग्रीन टी आणि ब्लॅक टी आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. (Drinking green tea and black tea boosts the immune system)

ग्रीन आणि ब्लॅक टी या दोन्ही गोष्टींमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फार फायदेशीर आहे. पण दिवसभरात एकदा किंवा दोनदा ग्रीन किंवा ब्लॅक टी प्या. ग्रीन टी मध्ये न्यूट्रिशन आणि अँटीऑक्सिडेंट घटक असतात. तर‘ब्लॅक टी’मध्ये अँटि-ऑक्सिडेंट्स आहेत. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

आपल्या शरीरात मेटाबॉलिज्म नावाचे एक घटक असतो. जो आपण काहीही खाल्ल्यानंतर किंवा प्यायल्यानंतर त्याचे रुपांतर ताकदीत करण्यासाठी शरीराला मदत करतो. ग्रीन टी मधील घटक शरीरातील मेटाबॉलिज्म घटकाला वाढवतात. त्यामुळे शरीरातील वजन कमी होते. पण वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी सोबतच नियमित व्यायामही गरजेचा असतो.

जे लोक नियमित ब्लॅक टी घेतात त्यांची हाडे ‘ब्लॅक टी’ न घेणाऱ्यांपेक्षा बळकट असतात, असे एका संशोधनातून समोर आले आहे. मात्र, जे लोक ब्लॅक टी घेत नाहीत किंवा कमी प्रमाणात घेतात त्यांना अर्थ्रायटीस होण्याची शक्यता असते. ‘ब्लॅक टी’मध्ये फायटोकेमिकल नावाचा पदार्थ असतो ज्याचा हाडांच्या बळकटीसाठी उपयोग होतो.

ग्रीन टी तयार करण्यासाठी पाण्याला खूप जास्त गरम करु नका. त्यामुळे त्यात आवश्यक जीवनसत्त्व नष्ट होतात. चांगल्या परिणामांसाठी तुम्ही पाणी गरम करुन 10 मिनीटे तसेच ठेवा. त्यानंतर ग्रीन टीचे पॅकेट कपात घेऊन त्यावर गरम पाणी टाका आणि 1 मिनीटे तसेच ठेवा. ग्रीन टी आणि पाणी एकत्रित झाल्यानंतर प्या.

पण ग्रीन टी आणि ब्लॅक टी तुम्ही अतिप्रमाणात घेतली तर ती शरीरासाठी हानिकारक ठरते. युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँडच्या मेडीकल सेंटरच्या एका अभ्यासानुसार, दिवसातून केवळ 2 वेळाच ग्रीन टी आणि ब्लॅक टी पिणे योग्य आहे. तसेच यापेक्षा जास्त ग्रीन टी आणि ब्लॅक टी पिणे आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते.

संबंधित बातम्या : 

Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(Drinking green tea and black tea boosts the immune system)

532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते....
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते.....