Energy drink | उन्हाळ्यात दिवसभर उत्साही राहायचे असेल तर हे खास एनर्जी ड्रिंक्स प्या!
सध्याच्या उन्हामुळे जीव लाहीलाही होत आहे. घामामुळे डिहायड्रेशनची (Dehydration) समस्या देखील निर्माण होताना दिसते आहे. अशा स्थितीत भरपूर पाणी असलेले पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही अनेक प्रकारचे हेल्दी ड्रिंक (Healthy drink) देखील घेऊ शकता. त्यात नारळ पाणी, जलजीरा आणि उसाचा रस इत्यादींचा समावेश आहे.
मुंबई : सध्याच्या उन्हामुळे जीव लाहीलाही होत आहे. घामामुळे डिहायड्रेशनची (Dehydration) समस्या देखील निर्माण होताना दिसते आहे. अशा स्थितीत भरपूर पाणी असलेले पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही अनेक प्रकारचे हेल्दी ड्रिंक (Healthy drink) देखील घेऊ शकता. त्यात नारळ पाणी, जलजीरा, ताक आणि उसाचा रस इत्यादींचा समावेश आहे. ते तुम्हाला उत्साही ठेवण्यास मदत करतात, ते तुमच्या शरीराला थंड ठेवण्यासाठी आरोग्यदायी पेय म्हणून काम करतात. ते थकवा आणि आळस दूर करतात. हे पेय तुमची रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) वाढवतात. ते आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर करतात. यामुळे सध्याच्या हंगामामध्ये निरोगी राहण्यासाठी काही खास पेयांचा आपल्या दररोजच्या आहारामध्ये नक्कीच समावेश करा.
या निरोगी पेयांचा आहारामध्ये समावेश करा
- नारळ पाणी- नारळाच्या पाण्यात ऊर्जा वाढवणारे खनिजे असतात. ते उन्हाळ्यात तुम्हाला हायड्रेट ठेवण्याचे काम करतात. नारळ पाणी आपल्याला उन्हाळ्यात ऊर्जा देते, थकवा आणि आळस दूर करते. यामुळेच सध्याच्या हंगामामध्ये दिवसभरातून किमान एक नारळ पाणी तरी आपल्या आहारामध्ये घेतले पाहिजे.
- सत्तूचा रस- सत्तूमध्ये भरपूर लोह, मॅंगनीज आणि मॅग्नेशियम असते. त्यात सोडियमचे प्रमाण कमी असते, ते तुमच्या शरीराला थंड ठेवण्याचे काम करते. उन्हाळ्यात हे लोकप्रिय पेय आहे. सत्तू शरीरातील ऊर्जा वाढवण्याचे सर्वात महत्वाचे काम करते. यामुळे या हंगामामध्ये सत्तूचा आहारात समावेश करा.
- जलजिरा- जलजिरा पिण्यासाठी जवळपास सर्वांनाच आवडतो. त्यात जिरे, हिंग, पुदिना इत्यादी असतात. या मसाल्यांमध्ये अनेक पोषक तत्व असतात, त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो, पचनक्रिया चांगली राहते, हे पेय तुम्ही घरी सहज बनवू शकता. लहान मुलांच्या देखील आहारामध्ये जलजिराच्या समावेश करावा.
- ऊसाचा रस- ऊसाच्या रसाचे नाव काढले तरीही अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. ऊसाच्या रसामध्ये प्रोटीन, आयरन, पोटॅशियम आणि इतर अनेक पोषक घटक असतात. हे एक उत्तम एनर्जी ड्रिंक आहे. उन्हाळ्यात तुम्ही या रसाचे सेवन करू शकता. विशेष म्हणजे ऊसाचा रस आपल्याला सहज उपलब्ध देखील होतो.
- ताक- उन्हाळ्यामध्ये निरोगी राहण्यासाठी आपल्या आहारामध्ये ताकाचा समावेश देखील करा. यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. तसेच आपले शरीर थंड राहते. दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही ताक घेऊ शकता. जर आपल्याला ताक आवडत नसेल तर आपण दही किंवा लस्सीचा देखील आहारामध्ये समावेश करू शकता.
संबंधित बातम्या :
Weight loss Tips : हा डाएट प्लॅन फाॅलो करा आणि झटपट कमी करा!
Non Stop LIVE Update