Health : काकडी आणि कोथिंबीरच्या स्मूदीचे सेवन करणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या सविस्तर!
उन्हाळ्यात (Summer) निरोगी राहण्यासाठी बहुतेक लोक काकडीचे सेवन करतात. असे म्हटले जाते की त्यात 90 टक्के पाणी असते. उन्हाळ्यात बहुतेक लोक आपल्या आहारात काकडीचा वापर करतात. काकडीत (Cucumber) व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, लोह इत्यादीसारखे अनेक महत्त्वाचे पोषक घटक असतात.
मुंबई : उन्हाळ्यात (Summer) निरोगी राहण्यासाठी बहुतेक लोक काकडीचे सेवन करतात. असे म्हटले जाते की त्यात 90 टक्के पाणी असते. उन्हाळ्यात बहुतेक लोक आपल्या आहारात काकडीचा वापर करतात. काकडीत (Cucumber) व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, लोह इत्यादीसारखे अनेक महत्त्वाचे पोषक घटक असतात. लोक काकडी अनेक प्रकारे खातात, त्यापैकी एक म्हणजे स्मूदी बनवून त्याचे सेवन करणे. काकडीत कोथिंबीर मिसळून स्मूदी बनवू शकता. या स्मूदीचे वैशिष्ट्य म्हणजे जर तुम्हाला वजन कमी (Weight loss) करायचे असेल तर ही अत्यंत फायदेशीर आहे. उन्हाळ्याच्या हंगामामध्ये तर दररोजच्या आहारामध्ये या स्मूदीचा समावेश करा.
पाण्याची कमतरता दूर होते
काकडी आणि कोथिंबीरपासून बनवलेल्या स्मूदीचे सेवन सकाळी किंवा दुपारी करावे. उन्हाळ्यात लोक कामाच्या निमित्ताने घराबाहेर पडतात आणि या काळात जास्त ऊर्जा खर्च होते. अशा परिस्थितीत शरीराला आतून हायड्रेटेड राहणे खूप गरजेचे असते. तज्ज्ञांच्या मते सकाळी किंवा दुपारी काकडी आणि कोथिंबीर स्मूदीचे सेवन केल्याने शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते.
वजन कमी करण्यास फायदेशीर
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर या उन्हाळ्यात काकडी आणि कोथिंबीरपासून बनवलेल्या स्मूदीचे नियमित सेवन करा. याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते खाल्ल्याने शरीरात पोषक तत्वांची कमतरता भासणार नाही. वजन कमी करताना बऱ्याच वेळा शरीरात पोषक तत्वांची कमतरता भासते, मग अशावेळी ही स्मूदी फायदेशीर ठरते. चक्कर येणे किंवा कमी रक्तदाब यांसारख्या समस्या देखील दूर होण्यास मदत होते.
उन्हाळ्यात तजेलदार त्वचा मिळवा
त्वचा तजेलदार आणि निरोगी बनवण्यासाठी ब्युटी रुटीनसोबतच योग्य आहार घेणे महत्वाचे आहे. उन्हाळ्यात त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी अशा भाज्या आणि फळांचे सेवन करणे चांगले आहे, ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. काकडीमध्ये पाण्याने भरलेले असते आणि या कारणास्तव त्याचे सेवन त्वचेसाठी फायदेशीर आहे. काकडी आणि कोथिंबीर स्मूदीचे दररोज सेवन करणेही आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
संबंधित बातम्या :
Spices : उन्हाळ्यात या मसाल्यांचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक, वाचा हे नेमके कोणते मसाले?