दररोज कमीत कमी 30 मिनिटे व्यायाम करा आणि वाढवा रोगप्रतिकारक शक्ती !

कोरोना काळात आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आवश्यक आहे. आपल्याला कोरोनापासून दूर राहिचे असेल तर आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणे आवश्यक आहे.

दररोज कमीत कमी 30 मिनिटे व्यायाम करा आणि वाढवा रोगप्रतिकारक शक्ती !
वर्कआऊट्
Follow us
| Updated on: May 15, 2021 | 7:13 AM

मुंबई : कोरोना काळात आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आवश्यक आहे. आपल्याला कोरोनापासून दूर राहिचे असेल तर आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणे आवश्यक आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आज प्रत्येकजण प्रयत्न करताना दिसत आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अनेकांनी आपल्या आहारात देखील बदल केला आहे. मात्र, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण दररोज कमीत-कमी 30 मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे.  (Exercise for 30 minutes every day and boost the immune system)

सध्याच्या कोरोनाच्या काळात आपण व्यायाम करण्यासाठी बाहेर देखील जाऊ शकत नाहीत. देशामध्ये अनेक राज्यांमध्ये सध्या लाॅकडाऊन लावण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांनी व्यायाम करणे बंद देखील केले आहे. मात्र, या कोरोनाच्या काळातच आपल्याला अधिक व्यायाम करण्याची गरज आहे. कारण या काळात निरोगी राहून रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे महत्वाचे झाले आहे.

दोरीवरच्या उड्या मारणे हा एक सोपा व्यायाम आहे, जो हृदयाचे ठोके सुधारतो. यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोकाही कमी होतो. आपल्यापैकी अनेकजण वजन कमी करण्यासाठी विविध प्रयत्न करतात. मात्र, वजन काही कमी होत नाही. वजन कमी करण्यासाठी दोरीवरच्या उड्या खूप फायदेशीर आहेत. यामुळे आपले वजन झटपट कमी होते. दोरीवरच्या उड्या मारताना किमान तीन ते चार तास तुम्ही काही खाल्ले नसावे. अथवा तुमच्या पोटात त्रास होऊ शकतो.

हा एक कार्डिओ व्यायाम आहे. जो आपण सहजपणे घरी करू शकता. यासाठी, आपण सरळ उभे रहावे आणि डाव्या हाताच्या कोपऱ्याला स्पर्श केला पाहिजे तर उजवा पाय वरपर्यंत आणला पाहिजे. पुन्हा सुरूवातीच्या स्थितीवर या आणि आता ही प्रक्रिया डावीकडून पुन्हा करा. आपण 30 सेकंदांच्या ब्रेकवर हा व्यायाम दररोज 2 ते 3 सेटमध्ये करू शकता. जर आपल्याला पाणी आवडत असेल तर आपण तंदुरुस्तीची पातळी राखण्यासाठी पोहू करू शकता. या व्यायामामुळे रक्तदाब कमी होतो आणि साखरेची पातळी वाढते.

चालणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप फायदेशीर आहे. सोपा आणि उत्तम व्यायाम म्हणजे चालणे होय. जे लोक दररोज फिरायला जातात. त्यांना जीवघेण्या आजारांचा होण्याचा धोका कमी असतो. हा व्यायाम केल्याने तुमची रक्तातील साखर नियंत्रित होते. तर दररोज 35 ते 40 मिनिटे चाला. जर आपण सायकल चालवत असाल तर हे हृदयासाठी खूप फायदेशीर आहे. सायकलिंगमुळे हृदयाची गती वाढते आणि रक्त परिसंचरण सुधारते. असे केल्याने तुमची मांसाची स्नायू मजबूत होते आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Coconut Water | रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ‘नारळ पाणी’, वाचा याचे फायदे…

(Exercise for 30 minutes every day and boost the immune system)

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.