Health Tips | अल्कोहोलबरोबर कधीही सेवन करू नका ‘हे’ पदार्थ, अन्यथा आरोग्याला होईल हानी!

जर आपल्याला खाण्यापिण्याची खूप आवड असेल, तर आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करणे देखील फार आवडते. या व्यतिरिक्त जेव्हा आपण मद्यपान करण्यासाठी बाहेर पडतो किंवा घरी पार्टी करतो, तेव्हा नंतरचा हँगओव्हर टाळण्यासाठी आपण बर्‍याचदा स्नॅक्सचे सेवन करतो.

Health Tips | अल्कोहोलबरोबर कधीही सेवन करू नका ‘हे’ पदार्थ, अन्यथा आरोग्याला होईल हानी!
Health Tips
Follow us
| Updated on: Jul 25, 2021 | 8:13 AM

मुंबई : जर आपल्याला खाण्यापिण्याची खूप आवड असेल, तर आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करणे देखील फार आवडते. या व्यतिरिक्त जेव्हा आपण मद्यपान करण्यासाठी बाहेर पडतो किंवा घरी पार्टी करतो, तेव्हा नंतरचा हँगओव्हर टाळण्यासाठी आपण बर्‍याचदा स्नॅक्सचे सेवन करतो. मात्र, काही खाद्य पदार्थांसह अल्कोहोल अजिबात सेवन करू नये. या गोष्टी एकत्र खाल्ल्याने, पाचक प्रणाली योग्य प्रकारे कार्य करू शकत नाही. ज्यामुळे पोटात दुखणे, छातीत जळजळ होणे, उलट्या होणे अशा अनेक समस्या उद्भवतात.

काही गोष्टी अल्कोहोल सोबत अगदी सहजपणे सेवन केल्या जाऊ शकतात. तथापि, आम्ही आपल्याला अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्या अल्कोहोलसह अजिबात खाऊ नयेत.

चॉकलेट

काही लोकांना वाटते की, वाईनसह चॉकलेट खाणे चांगले स्नॅक्स आहे. पण तसे अजिबात नाही. चॉकलेटमुळे पोटात गॅसची समस्या वाढू शकते. याशिवाय अपचन देखील होऊ शकतो.

बीन्स आणि रेड वाइन

ग्लासभर रेड वाईनसह बीन्सचे सेवन करणे एक आदर्श संयोजन मानले जाते. मात्र, तुम्ही अशी चूक करू नका. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, जेवण करण्यापूर्वी आणि ड्रिंक दरम्यान बीन्सचे सेवन करू नये. कारण बीन्स आणि डाळींमध्ये भरपूर लोह आहे. ड्रिंक दरम्यान लोह शरीरात व्यवस्थित शोषले जात नाही. यामुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात.

तळलेले आणि खारट अन्न

अनेकांना मद्यपान करताना खारट किंवा तळलेल्या चमचमीत गोष्टी खायला आवडतात. या गोष्टी खाल्ल्याने तुमचे शरीर डीहायड्रेट होते. याशिवाय शारीरिक ऊर्जा देखील कमी होते. म्हणून, पेय दरम्यान ग्रील्ड चिकन आणि भाजीपाला युक्त पदार्थ खा.

ब्रेड आणि बिअर

ब्रेड आणि बिअर एक हानिकारक कॉम्बीनेशन आहे आणि हे अजिबात विसरू नये. अल्कोहोलसोबत ब्रेड खाऊ नये. ब्रेड खाल्ल्याने पोट फुगी होते. यामुळे आपले शरीर डीहायड्रेट होते. आपण जास्त प्रमाणात बिअर आणि ब्रेड खाल्ल्यास उलट्याही होऊ शकतात.

कॉफी आणि वाईन

कॉफी आणि अल्कोहोल हे एक चांगले संयोजन आहे, असे आपल्याला वाटेल. ड्रिंक करताना कॉफी प्यायल्यास शरीर डिहायड्रेट होते. त्याच वेळी, हे संयोजन काही लोकांना सतर्क राहण्यास मदत करते. जर तुम्ही जास्त प्रमाणात मद्यपान केले असेल तर मात्र परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.

(Health Tips Never consume ‘this’ substance with alcohol, otherwise it will harm your health)

हेही वाचा :

सतत कोरड्या खोकल्याने हैराण आहात? जाणून घ्या कारण आणि या खोकल्यावरचे घरगुती उपाय

Skin Care :सुंदर त्वचेसाठी लसूण सर्वाधिक उपयोगी, ‘हे’ 5 फायदे जाणून घ्याच

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.