मुंबई : आपल्या घराच्या परिसरामध्ये बेलाचे (Bel) झाड असेल बेलाच्या झाडाला या हंगामामध्ये फळे देखील लागतात. मात्र, आपल्याकडे बेलाच्या पानांचा उपयोग पुजेसाठी वगैरे केला जातो. मात्र, बेलाच्या फळाकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते. परंतू बेलाचे हे फळ (Fruit) आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. ते शरीराला उष्णतेच्या प्रभावापासून वाचवण्याचे काम करते. विशेष म्हणजे सध्याच्या उन्हाळ्याच्या हंगामामध्ये आपण आपल्या आहारामध्ये बेलाच्या ज्यूसचा समावेश करायला हवा. कॅल्शियम, फॉस्फरस, फायबर, प्रथिने आणि लोह यांसारख्या पोषक तत्वांनी भरपूर असलेले बेल पोटासाठी खूप फायदेशीर (Beneficial) मानले जाते. उन्हाळ्यात याचा ज्यूस प्यायल्याने अनेक समस्या दूर होतात.
जर तुम्हाला खूप गॅस होत असेल, बद्धकोष्ठतेची समस्या असेल, पोटात जडपणा असेल तर तुम्ही बेलच्या ज्यूसचे नक्कीच करायला हवे. बेल पोटाची उष्णता शांत करते आणि या समस्यांपासून आराम देते. उन्हाळ्यात डिहायड्रेशनमुळे अनेक समस्या उद्भवतात. याशिवाय उष्माघात होण्याची भीती असते. अशा वेळी बेलचा ज्यस प्यायल्याने खूप आराम मिळतो.
तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असले तरी, बेल सिरप तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. बेलमध्ये भरपूर फायबर असते. हे प्यायल्यानंतर तुम्हाला खूप आराम मिळतो आणि तुमचे पोट बराच काळ भरलेले राहते. यामुळे तुम्हाला वारंवार भूक लागत नाही. यामुळे ज्यांना आपले वाढलेले वजन कमी करायचे आहे अशांनी आपल्या आहारामध्ये बेलाच्या ज्यूसचा समावेश करायला हवा.
हाय बीपी किंवा कोलेस्टेरॉल जास्त असलेल्या लोकांसाठी बेल सिरप देखील खूप फायदेशीर आहे. त्यात लिपिड प्रोफाइल आणि ट्रायग्लिसराइड्स नियंत्रित करण्याची क्षमता आहे. यामुळे बीपी असलेल्यांनी आपल्या आहारामध्ये बेलाच्या ज्यूसचा समावेश करायला हवा. विशेष म्हणजे जर आपण हा ज्यूस नाश्त्यामध्ये घेतला तर ते अधिक फायदेशीर ठरेल.
बेल सिरप मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर मानले जाते. यामध्ये रेचक असतात, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. पण त्यांनी त्याच्या पाकात साखर वापरू नये. मधुमेही रुग्णही ज्यूसऐवजी थेट बेलचे सेवन करू शकतात.
(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)
संबंधित बातम्या :
Skin care उन्हाळ्यात त्वचा चमकदार ठेवण्यासाठी हे फ्रूट मास्क अत्यंत फायदेशीर, वाचा अधिक !
Health : तोंड उघडे ठेवून झोपण्याची सवय आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक, वाचा महत्वाचे!