AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Care : खरबूज हे फळ खूप चवदार आणि आरोग्यासाठीही फायदेशीर, आहारात नक्की समावेश करा!

न्हाळ्याच्या हंगामात (Summer season) फळे खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यामध्येही खरबूज खाणे तर उत्तमच खरबूजमध्ये भरपूर पाणी (Water) आणि फायबर असते. उन्हाळ्यात ते शरीराला हायड्रेट ठेवण्याचे काम करते. यात 90 टक्के पाणी असते, त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.

Health Care : खरबूज हे फळ खूप चवदार आणि आरोग्यासाठीही फायदेशीर, आहारात नक्की समावेश करा!
उन्हाळ्याचा हंगामात खरबूज खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 31, 2022 | 11:22 AM

मुंबई : उन्हाळ्याच्या हंगामात (Summer season) फळे खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यामध्येही खरबूज खाणे तर उत्तमच खरबूजमध्ये भरपूर पाणी (Water) आणि फायबर असते. उन्हाळ्यात ते शरीराला हायड्रेट ठेवण्याचे काम करते. यात 90 टक्के पाणी असते, त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. उन्हाळ्यात खरबुजापासून (Melon) बनवलेल्या रसाचे सेवनही करू शकता. ते तयार करणे खूप सोपे आहे. खरबूज खाण्याचे नेमके कोणते फायदे आहेत, याबद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

उन्हाळ्याच्या हंगामात खरबूज खाण्याचे आरोग्य फायदे वाचा!

रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत

खरबूजमध्ये बीटा कॅरोटीन असते. बीटा कॅरोटीन व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित होते. हे शरीर मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून रक्षण करते. त्याचप्रमाणे खरबूजमध्ये व्हिटॅमिन सी देखील मोठ्या प्रमाणात असते, यामध्ये आपल्या शरीरामधील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

कर्करोगाचा धोका कमी होतो

खरबूज खाल्ल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो. खरबूज फोलेटचा चांगला स्रोत आहे. त्याला व्हिटॅमिन बी-9 असेही म्हणतात. यामुळे काही कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो.

हायड्रेटेड राहण्यास मदत करते

खरबुजात 90 टक्के पाणी असते. खरबूज खाल्ल्याने तुम्हाला दिवसभर हायड्रेट राहण्यास मदत होते. निर्जलीकरणामुळे किडनी स्टोन, चक्कर येणे, डोकेदुखी, बद्धकोष्ठता आणि कोरडी त्वचा होऊ शकते. यामुळे उन्हाळ्याच्या हंगामात खरबूज खाणे अधिक फायदेशीर मानले जाते.

खरबूजचा रस अधिक फायदेशीर

आपण कच्चे खरबूज किंवा खरबूजचा रस देखील आपल्या आहारामध्ये घेऊ शकता. मात्र, खरबूजचा रस तयार करताना नेहमीच लक्षात ठेवा की, त्यामध्ये साखर अजिबात टाकू नका. शिवाय रसामध्ये दुधाचा देखील समावेश करा. खरबूजचा रस नेहमीच ताजा प्या.

संबंधित बातम्या : 

पोटाच्या विकारांपासून राहा दूर… आहारात ‘या’ सुपरफूडचा समावेश करा

Weight Loss: पोटाची नको असलेली चरबी बर्न करण्यासाठी हे 3 चहा अत्यंत फायदेशीर!

'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत
'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत.
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'.
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली.
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्....
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?.
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.