Weight loss tips | पोटॅशियमयुक्त या पदार्थांचे सेवन करा, वजन झपाट्याने कमी होईल!

पालेभाज्या खाल्ल्याने आपले आरोग्य चांगले राहते हे जवळपास सर्वांनाच माहिती आहे. विशेष करून पालक. पालकाचा आहारामध्ये समावेश करून आपण आरोग्याशी संबंधीत अनेक समस्या दूर करू शकतो. पालक खाणे आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. पालकामध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात पालकाचा समावेश केला पाहिजे.

Weight loss tips | पोटॅशियमयुक्त या पदार्थांचे सेवन करा, वजन झपाट्याने कमी होईल!
Image Credit source: istockphoto.com
Follow us
| Updated on: May 25, 2022 | 12:23 PM

मुंबई : वाढलेल्या वजनामुळे अनेकजण चिंचेमध्ये आहेत. त्यांना पौष्टिक आहारासोबतच (Nutritious diet) वजन नियंत्रणात ठेवावे लागते. अशा परिस्थितीत, पोटॅशियम हे एक चांगले पौष्टिक घटक आहे जे खूप फायदेशीर आहे. हे एक खनिज आहे जे शरीरासाठी आवश्यक आहे. पोटॅशियमची (Potassium) आपल्या शरीरात खूप महत्त्वाची भूमिका असते. ते आपल्या शरीरात इलेक्ट्रोलाइट म्हणून काम करते. यामुळे आपल्या दररोजच्या आहारामध्ये जास्तीत-जास्त पोटॅशियम घेण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही झपाट्याने वाढलेले वजन कमी (Weight loss) करायचे असेल तर पोटॅशियमयुक्त आहार घ्या. पोटॅशियम आपल्या शरीरामधील अतिरिक्त चरबी फास्ट बर्न करते. चला तर मग जाणून घेऊयात जास्त पोटॅशियम असलेल्या खाद्यपदार्थांबद्दल.

पालक

पालेभाज्या खाल्ल्याने आपले आरोग्य चांगले राहते हे जवळपास सर्वांनाच माहिती आहे. विशेष करून पालक. पालकाचा आहारामध्ये समावेश करून आपण आरोग्याशी संबंधीत अनेक समस्या दूर करू शकतो. पालक खाणे आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. पालकामध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात पालकाचा समावेश केला पाहिजे. पालकची भाजी, सूप आणि ज्यूस जर आपण आहारामध्ये घेतला तर वजन कमी होण्यास मदत होते.

हे सुद्धा वाचा

राजमा

राजमा खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. राजमाचे सेवन केल्याने बऱ्याच वेळ भूक देखील लागत नाही आणि अन्नाची लालसा देखील कमी होते. राजमामध्ये भरपूर फायबर, पोटॅशियम आणि प्रथिने असतात. ज्यामुळे आपल्याला वारंवार भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहते. राजमा प्रोबायोटिक म्हणून काम करते. म्हणजे ते खाल्ल्याने पाचन क्रिया हळू होते, जेणेकरून आपले शरीर प्रत्येक आहाराचे पोषण अॅब्जार्ज करू शकेल.

केळी

केळीमध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणात आढळते. विशेष म्हणजे हंगाम कोणतेही असो बाजारामध्ये बाराही महिने केळी हे फळ उपलब्ध असते. त्यात आढळणारे अँटी-ऑक्सिडंट्स आणि फायबरमुळे व्यक्तीला जास्त वेळ भूक लागत नाही, यामुळे शरीराचे वजन कमी करण्यास मदत करते. मात्र, बरेच लोक दूध केळी आणि साखर मिक्स करून खातात. पण ज्यांना वजन कमी करायचे आहे, अशांनी फक्त केळीचे सेवन करणेच फायदेशीर ठरते.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.