Weight Loss : लिंबू पाणी पिण्यामुळे वजन कमी कसे होते ‘हे’ जाणून घ्या!
आपण नेहमीच बोलताना ऐकले असेल की, एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू मिक्स करून पिल्याने आपले वजन झटपट कमी होण्यास मदत होते.
मुंबई : आपण नेहमीच बोलताना ऐकले असेल की, एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू मिक्स करून पिल्याने आपले वजन झटपट कमी होण्यास मदत होते. विशेष म्हणजे बरेच लोक या लिंबू पाण्यात मध मिक्स करून देखील पितात. मात्र, खरोखरच कोमट पाणी, लिंबू आणि मध घेतल्याने वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते, का? हे आज आपण बघणार आहोत. आपल्या सर्वांना हे माहित आहे की, लिंबू पाचन तंत्रामध्ये सुधार करते. क्लीन्झर सारख्या शरीरास डिटॉक्सिफाय करते आणि व्हिटॅमिन सीचा मुख्य स्रोत लिंबू आहे. (Learn how to lose weight by drinking lemon water)
लिंबू पाणी का प्यावे
तज्ञांच्या मते वजन कमी करण्यासाठी पुरेसे पाणी पिणे खूप महत्वाचे आहे. लिंबू केवळ चव वाढवत नाही तर पोटात साठलेली चरबी देखील कमी करते. लिंबूमध्ये फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी -6, पेक्टिन आणि लिंबाच्या रसामध्ये सापडणारे आम्ल असते. त्यामध्ये उपस्थित अँटी-ऑक्सीडंट्स, फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण न देता, हृदय निरोगी ठेवतात आणि इतर प्रकारच्या कर्करोगापासून देखील संरक्षण करतात.
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे?
लिंबू पाण्यात अनेक पोषक असतात. पण ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. कारण त्यात पेक्टिन आहे जे भूक नियंत्रित करण्यात मदत करते आणि जंक फूडची लालसा कमी करते. त्यामध्ये उपस्थित फ्लेव्होनॉइड्स चयापचयला चालना देतात. जे वजन कमी करण्यास मदत करतात. दररोज लिंबाचे पाणी पिण्यामुळे शरीराची जळजळ कमी होऊ शकते. लिंबामध्ये पोटॅशियम असते. जे पाण्याचे वजन कमी करून रक्तदाब नियंत्रित करते आणि शरीराला हायड्रेट ठेवते.
घरी लिंबू पाणी कसे बनवायचे
अधिक फायदे मिळविण्यासाठी दररोज सकाळी लिंबू पाणी पिणे फायदेशीर आहे. यासाठी आपण थोडेसे पाणी गरम करावे आणि त्यात एक चमचा लिंबाचा रस मिक्स करा. वजन कमी करण्यासाठी, एक चमचा जिरे पूड, लिंबाचे काही तुकडे घाला आणि पाणी चांगले उकळा आणि फिल्टर करा. यानंतर एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा मध मिक्स करून प्या.
संबंधित बातम्या :
Skin Care | चेहऱ्यावरील नको असणाऱ्या केसांमुळे त्रस्त आहात? पार्लर विसरा आणि ‘हे’ उपाय ट्राय करा!
Health | देशातील 10 टक्के महिला PCODने ग्रासित, जाणून घ्या ‘या’ आजाराबद्दल…https://t.co/j8mizk9UJ9#PCOD #health
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 17, 2020
(Learn how to lose weight by drinking lemon water)