मुंबई : भोपळ्याच्या बिया आपल्या आरोग्यासाठी प्रचंड फायदेशीर आहेत. त्यात फॅटी अॅसिडस्, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त, अत्यावश्यक अमीनो अॅसिड आणि फिनोलिक संयुगे असतात. या बियांचे सेवन केल्याने मधुमेह, हृदयरोग, स्नायू/हाडे दुखणे, केस गळणे आणि मुरुमांवर नियंत्रण मिळवता येते. भोपळ्याच्या बियांचे आरोग्याला नेमके कोणते फायदे होतात, हे आज आपण बघणार आहोत. (Pumpkin Seeds are beneficial for health)
कर्करोगविरोधी गुणधर्म – भोपळ्याच्या बियांमध्ये अँटीऑक्सिडेंट, दाहक-विरोधी, अँटीमाइक्रोबायल, संधिवात-विरोधी आणि मधुमेह-विरोधी गुणधर्म असतात. यामुळे कर्करोग आणि यूटीआयचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते.
त्वचेसाठी फायदेशीर – भोपळ्याच्या बिया आणि त्यांचे तेल त्वचेसाठी फायदेशीर आहे. बियांमध्ये असलेले व्हिटॅमिन ए आणि सी कोलेजनचे उत्पादन वाढवतात. कोलेजन जखम भरण्यास मदत करते. हे तुमची त्वचा तरुण आणि सुरकुत्यापासून मुक्त ठेवते. तेलात ओमेगा -3 फॅटी अॅसिड आणि कॅरोटीन असते. हे पुरळ, फोड आणि त्वचेच्या तीव्र दाहांवर उपचार करू शकतात. हे स्क्रब, लोशन किंवा मालिश करताना बॅक्टेरिया आणि बुरशीजन्य संसर्गापासून देखील संरक्षण करते.
हृदयरोगास प्रतिबंध करतो – भोपळ्याच्या बियांचा आहारात समावेश केल्यास कोलेस्टेरॉल जमा होणे आणि रक्तवाहिन्या कडक होणे टाळता येते. हे हृदयाच्या विविध समस्या जसे कोरोनरी धमनी रोग, स्ट्रोक इत्यादींना प्रतिबंध करते.
केसांच्या वाढीसाठी – या बियांमध्ये ओमेगा -3 फॅटी अॅसिड चांगल्या प्रमाणात असतात. भोपळ्याच्या बियामध्ये जस्त भरपूर असते. हे टक्कल पडण्याची समस्या दूर करण्यास मदत करते. हे केस गळण्याच्या समस्येवर मात करण्यास मदत करते.
मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी – भोपळ्याच्या बियांमध्ये मधुमेह विरोधी गुणधर्म असतात. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी फक्त बियाच नाही, भोपळ्याची पाने आणि लगदा देखील आहारात समाविष्ट करता येतात.
कोलेस्टेरॉल आणि लठ्ठपणा – भोपळ्याच्या बिया निरोगी चरबी, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सचा समृद्ध स्रोत आहेत. भोपळ्याच्या बिया वजन नियंत्रित करू शकतात आणि यकृतामध्ये कोलेस्टेरॉल जमा होण्यास प्रतिबंध करू शकतात. या बियांमध्ये ओमेगा -3 फॅटी अॅसिड, फायटोस्टेरॉल, व्हिटॅमिन-ई डेरिव्हेटिव्ह्ज आणि कॅरोटीन असतात. हे लठ्ठपणा वाढण्यापासून प्रतिबंधित करते.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Winter Diet | थंडीच्या दिवसांत रिकाम्या पोटी ‘या’ पदार्थांच्या सेवनाने राहील शरीर तंदुरुस्त!https://t.co/Znr5WfzLhp#Winter #diet #Food #health
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 11, 2020
(Pumpkin Seeds are beneficial for health)