Skin Benefits | निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी सेवन करा ‘केळ्याची स्मूदी’, अशाप्रकारे करा तयार…
उन्हाळ्याच्या हंगामात, बर्याच लोकांना सनबर्नची समस्या उद्भवते, ही स्मुदी त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जे शरीराच्या विषाक्त पदार्थांना बाहेर टाकण्याचे काम करतात.
मुंबई : केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर, निरोगी आहार त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. असे बरेच खाद्य पदार्थ आहेत, ज्यात भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटि-ऑक्सिडेंट असतात, जे आपली त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यास मदत करतात. त्वचेही काळजी घेण्यासाठी केवळ महागडी आणि नैसर्गिक उत्पादनेच नव्हे तर, निरोगी अन्न खाणे देखील फार महत्वाचे आहे (Skin Benefits of healthy Banana smoothie).
त्वचेला चमकदार आणि हायड्रेट ठेवण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात पाणी प्यावे. याशिवाय हेल्दी ड्रिंक देखील सेवन करायला हवेत. आज आम्ही तुम्हाला केळीच्या स्मूदीबद्दल सांगणार आहोत, ज्याचे नियमित सेवन केल्यास निरोगी आणि चमकदार त्वचा मिळते. यासाठी, आपल्याला आळशीच्या बिया, पीनट बटरसह इतर गोष्टी समाविष्ट कराव्या लागतील. चला तर, जाणून घेऊया केळ्याची हेल्दी स्मूदी रेसिपी आणि त्याचे फायदे…
साहित्य :
एक वाटी कापलेली केळी
एक चमचा बटर किंवा पीनट बटर
एक चमचा आळशीच्या बिया
एक कप बदाम दूध किंवा दही
एक चमचा मध
कृती :
ही स्मूदी तयार करण्यासाठी, सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरच्या मदतीने बारीक वाटून घ्या. एका ग्लासात ओतून वरून ड्रायफ्रुट टाकून सजवा. ही रेसिपी जाणून घेतल्यावरही आपल्याला वाटेल की, स्मूदी ही केवळ मिल्क शेक आहे. पण, तसे नाही. यामध्ये उपस्थित आळशी बियाणे आपल्या चेहर्यावरील लालसरपणा कमी करून त्वचेला चमकदार ठेवण्यास मदत करतात. आपण इच्छित असल्यास, ही स्मूदी दररोज पिऊ शकता. स्मूदीमध्ये असलेले पीनट बटर आणि मध त्वचेला चमकदार राहण्यास, तसेच काळ्या डागांपासून मुक्त होण्यास मदत करतात (Skin Benefits of healthy Banana smoothie).
हेल्दी स्मूदीचे फायदे
उन्हाळ्याच्या हंगामात, बर्याच लोकांना सनबर्नची समस्या उद्भवते, ही स्मुदी त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जे शरीराच्या विषाक्त पदार्थांना बाहेर टाकण्याचे काम करतात. मात्र, थंड स्मूदीचे सेवन करू नये. यामुळे आपली पाचक प्रणाली खराब होऊ शकते.
यामध्ये उपस्थित आळशी बियाणे आपल्या चेहर्यावरील लालसरपणा कमी करून त्वचेला चमकदार ठेवण्यास मदत करतात. दररोज या स्मूदीचे सेवन केल्यास चेहऱ्यावरील धागेही दूर होऊ शकतात. तसेच, ही स्मूदी त्वचेला मॉइश्चराइझ ठेवते.
बदाम समाविष्ट करणे आवश्यक!
जर आपण स्मूदीमध्ये बदामाचे दूध घालू इच्छित नसाल, तर किमान बदाम नक्कीच घाला. बदामांमध्ये ओमेगा -3 फॅटी आम्ल असतात, जे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. एवढेच नव्हे तर, बदाम त्वचेच्या मृत पेशी काढून, चेहऱ्याचा ओलावा टिकवून ठेवतात. जर, तुमची त्वचा कोरडी असेल तर बदामांचे सेवन करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.
(Skin Benefits of healthy Banana smoothie)
हेही वाचा :
रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या लोकांना कर्करोगाचा धोका, एका सर्वेक्षणात निष्पन्न
Weight Loss | वजन कमी करण्यासाठी दूध पिताय? मग जाणून घ्या स्किम्ड की डबल टोन्ड दूध ठरेल फायदेशीर…#weightloss | #Milk | #TonedMilk | #SkimmedMilkhttps://t.co/2fF6nOmAzb
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 9, 2021