AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात काकडी खाणे चांगलं की वाईट? तज्ज्ञांचे मत काय?

अनेक प्रकारच्या पोषक तत्वांनी समृद्ध असलेली काकडी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. काकडीला उन्हाळी सुपरफूड असेही म्हणता येईल. लोकं वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या आहारात याचा समावेश करतात. काकडी खाणे आरोग्यासाठी कसे फायदेशीर ठरू शकते, याबद्दल तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.

उन्हाळ्यात काकडी खाणे चांगलं की वाईट? तज्ज्ञांचे मत काय?
cucumber health benefits
| Edited By: | Updated on: Mar 26, 2025 | 1:43 PM
Share

उन्हाळ्‌यात काकडीचे सेवन करणे हे शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. शरीरातील पाण्याची कमतरता दूर करण्यापासून ते अनेक पोषक तत्वांची प्राप्तता होण्यासाठी काकडी खाणे लाभदायक ठरते. उन्हाळ्यात ताजेतवाने राहण्यासाठी हा एक पदार्थ आहे, जो खाल्ल्याने शरीर थंड होते. त्यामूळे बहुतेक लोकं उन्हाळ्यात काकडीचे सेवन जास्त प्रमाणात करतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्रत्येकजण आपल्या आहारात काकडीचा वेगवेगळ्या प्रकारे समावेश करतो. जसे सॅलडच्या स्वरूपात, काकडीचे सँडविच बनवून खाणे किंवा ज्यूस, स्मूदी बनवून याचे सेवन करत असतात. याशिवाय अनेकजण काकडी ताक किंवा दह्यामध्ये मिक्स करून देखील खाल्ले जाते. तसेच या उन्हाळ्यातील सुपरफूड काकडीत कोणते जीवनसत्त्वे आढळतात आणि ते आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे याबद्दल तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.

तज्ज्ञ काय म्हणतात?

आयुर्वेद तज्ज्ञ किरण गुप्ता यांनी सांगितले की, काकडीत 90% पाणी असते. शिवाय, त्यात पोटॅशियम भरपूर असते. त्यात व्हिटॅमिन सी आणि के आढळते. त्यामुळे काकडीचे सेवन केल्याने संधिवात, हृदयाच्या आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील चांगले आहे. तसेच याचे सेवन पोटासाठी देखील फायदेशीर आहे. यामुळे बद्धकोष्ठता दूर होते आणि पोट स्वच्छ राहते. काकडी, पुदिना आणि लिंबाचे तुकडे रात्रभर पाण्यात ठेवा. त्यानंतर हे तयार झालेले डिटॉक्स वॉटर तयार होते. हे डिटॉक्स वॉटर आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यातच काकडी त्वचेसाठीही फायदेशीर आहे.

पचनासाठी फायदेशीर

उन्हाळ्यात आपल्यापैकी अनेकांना पोटाच्या समस्या निर्माण होतात. यासाठी या दिवसांमध्ये काकडीचे सेवन केल्यास तुमची पचनक्रिया चांगली राहते. तसेच आतड्यांच्या आरोग्यासाठी काकडी सेवन देखील खुप. फायदेशीर आहे आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करते. कधीकधी जर काकडी मसालेदार पदार्थांसोबत खाल्ली तर तीही चांगली असते. तज्ज्ञांनी सांगितले की जर काकडी आणि पुदिना ताकात मिसळून सेवन केले तर ते खूप चांगले असते. यामुळे शरीर थंड राहते.

हायड्रेशनमध्ये मदत करते

काकडीमध्ये भरपूर पाणी असते आणि ते शरीरात हायड्रेशन राखण्यास मदत करते. विशेषतः उन्हाळ्यात, जेव्हा शरीराला खूप घाम येतो, तेव्हा काकडी खाल्ल्याने शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. हे शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास मदत करते.

त्वचा आणि केस

काकडी हे त्वचा आणि केसांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. काकडी त्वचेच्या टोनिंगसाठी, त्याचबरोबर त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी खुप फायदेशीर मानली जाते. यामुळे तुमच्या आहारात काकडीचे सेवन केल्याने त्वचेवरील चमक टिकून राहण्यास मदत होते. बरेच लोकं काकडीचे तुकडे डोळ्यांवर ठेवतात, ज्यामुळे डोळ्यांना आराम मिळतो. तसेच सूज, जळजळ आणि काळी वर्तुळे कमी करण्यास देखील मदत करते.

लहान मुलांसाठी फायदेशीर

तज्ज्ञांच्या मते जर लहान मुले चॉकलेटसारख्या गोष्टी खातात. जर तो दिवसातून एक किंवा दोन काकडी खातो तर त्याचे पचन व्यवस्थित राहते. तुम्ही त्यात मीठ, जिरे किंवा लिंबू घालून देखील खाऊ शकता. तसेच शरीर हायड्रेटेड ठेवण्यास मदत होते. जी मुले कमी हिरव्या भाज्या खातात, त्यांच्यासाठी काकडी खाणे खूप चांगले आहे.

या गोष्टी लक्षात ठेवा

पण जर तुम्ही जास्त प्रमाणात काहीही खाल्ले तर ते शरीराला हानी पोहोचवू शकते. तसेच ज्या लोकांना संधिवात, आम्लपित्त समस्या, जास्त ढेकर येणे यासारख्या समस्या आहेत त्यांनी काकडी रिकाम्या पोटी खाऊ नये. अनेकांना काकडीची अ‍ॅलर्जी असते, म्हणून त्यांनी ती खाणे टाळावे. तसेच, जर कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असेल, तर त्यानंतरही काकडी खायला दिली जात नाही.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.