मुंबई : हिवाळ्याच्या हंगामात स्वीट कॉर्न सूप (Sweet Corn Soup) पिणे खूप फायदेशीर आहे. विशेष म्हणजे तुम्ही घरच्या-घरी स्वीट कॉर्न सूप तयार करून शकतात. हे खूप चवदार आहे. हे स्वादिष्ट सूप बनवण्यासाठी तुम्हाला काही घटकांची आवश्यकता असेल. हा सूप घरी तयार करण्यासाठी काही जास्त वेळ देखील लागत नाही.
स्वीट कॉर्न सूपचे साहित्य
लोणी – 2 टीस्पून
किसलेले आले
चिरलेला कांदा – 5 चमचे
कॉर्न फ्लोअर – 1 टीस्पून
कॉर्न – 1/2 कप
किसलेला लसूण – 1 टीस्पून
किसलेले गाजर – 1/4 कप
व्हिनेगर – 1 टीस्पून
काळी मिरी – 1/4 टीस्पून
आवश्यकतेनुसार मीठ
स्वीट कॉर्न सूप तयार करण्याची पध्दत-
स्टेप – 1
एका पॅनमध्ये बटर गरम करा. त्यात चिरलेले आले, लसूण घालून एक मिनिट परतून घ्या. आता 3 चमचे बारीक चिरलेला हिरवा कांदा घालून दोन मिनिटे परतून घ्या. कॉर्न आणि गाजर घाला. थोडे मीठ घालून भाज्या 5 मिनिटे परतून घ्या.
स्टेप – 2
1 कप कॉर्न आणि 2 चमचे पाणी ब्लेंडरमध्ये टाका. जाड आणि गुळगुळीत पेस्ट तयार करण्यासाठी चांगले मिसळा. ही पेस्ट पॅनमध्ये ठेवा आणि 3-4 मिनिटे गरम होईद्या.
स्टेप – 3
आता त्यात 3 कप पाणी घालून झाकण ठेवा. 10-12 मिनिटे शिजवा. आता 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर 2 टेबलस्पून पाण्यात मिसळा. हे मिश्रण सूपमध्ये घालून चांगले मिसळा. सूप व्यवस्थित घट्ट होईपर्यंत 5-6 मिनिटे शिजवा.
स्टेप – 4
शेवटी व्हिनेगर, काळी मिरी पावडर, उरलेला हिरवा कांदा घाला आणि चवीनुसार मीठ घाला आणि गरम सर्व्ह करा.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..