Diet Tips | एकदा पिझ्झा खाल्यामुळे 7 मिनिटं कमी होतं आयुष्य ! दीर्घायुष्य हवं असेल ‘या’ पदार्थांपासून रहा दूर

Diet Tips | एखाद्या व्यक्तीची लाईफस्टाइल कशी आहे, यावर त्याचे आयुष्य किती असे हे ठरते, असं म्हणतात. एखाद्याची लाइफस्टाइल चांगली असेल तर ती व्यक्ती बराच काळ जगते, आणि एखाद्याचे जीवनमान चांगले नसेल, तर त्याचे आयुष्यही कमी होते. त्यामुळे आहार आणि लाइफस्टाइलमध्ये बदल केल्यास आयुष्य वाढवता येऊ शकतं.

Diet Tips | एकदा पिझ्झा खाल्यामुळे 7 मिनिटं कमी होतं आयुष्य ! दीर्घायुष्य हवं असेल 'या' पदार्थांपासून रहा दूर
निरोगी आयुष्याचे रहस्यImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 4:18 PM

Diet Tips | How to live a long life : प्रत्येक व्यक्तीला वाटतं की त्याला चांगलं, मोठं आयुष्य मिळावं, भरपूर जगता यावं (Long life). वर्ल्ड लाइफ एक्सपेक्टन्सीनुसार, भारतात पुरुषांचे सरासरी आयुष्य 69.5 वर्ष तर महिलांचे सरासरी आयुष्य 72.2 वर्ष इतकं असतं. हृदयासंबंधित आजार, फुप्फुसांचा आजार, स्ट्रोक, मधुमेह यासह किमान 50 असे (health diseases) आजार आहेत, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीचा कमी वयातच मृत्यू होऊ शकतो. विज्ञानानुसार, एखादी व्यक्ती चांगल्या पदार्थांचे सेवन करत असेल तर त्याचे आयुर्मान वाढ शकते आणि कोणी अनहेल्दी (good food and bad food for health) पदार्थ खात असेल तर त्यांचे आयुष्य कमीही होऊ शकते. एखाद्याची लाइफस्टाइल चांगली असेल तर ती व्यक्ती बराच काळ जगते, आणि एखाद्याचे जीवनमान चांगले नसेल, तर त्याचे आयुष्यही कमी होते. त्यामुळे आहार आणि लाइफस्टाइलमध्ये बदल केल्यास आयुष्य वाढवता येऊ शकतं.

हे पदार्थ खाल्ल्यास आयुष्य होऊ शकते कमी

‘द टेलीग्राफ’च्या रिपोर्टनुसार, मिशीगन विद्यापीठातील तज्ज्ञांनी खाण्याचे काही पदार्थ आणि त्यांचा आरोग्यावर होणार परिणाम जाणून घेण्यासाठी संशोधन केले. त्यामध्ये काही असे पदार्थ आढळले, जे एकदा खाल्यास आयुष्य काही मिनिटांनी वाढते तर काही पदार्थांचे एकदा जरी सेवन केले तरी आयुष्य काही मिनिटांनी कमी होते. उदाहरणार्थ – जर कोणी ड्रायफ्रुट्सचे सेवन केले तर त्या व्यक्तीचे आयुष्य 26 मिनिटांनी वाढू शकते. पण एखाद्या व्यक्तीने एकदा जरी हॉट-डॉग खाल्ला तर त्याचं आयुष्य 36 मिनिटांनी कमी होऊ शकतं. त्याशिवाय पीनट बटर, जॅम सँडविच खाल्ल्यानेही एखाद्या व्यक्तीचे आयुष्य अर्ध्या तासाने वाढू शकतं.

6 हजार खाद्य पदार्थांवर झाले संशोधन

नेचर फूड जर्नलमध्ये हे संशोधन पब्लिश झाले असून, हा अभ्यास लोकांच्या चांगल्या जीवनमानावर (LIfestyle) आधारित होता. या अभ्यासात वैज्ञानिकांनी सुमारे 6 हजार वेगवेगळ्या पदार्थांचा ( नाश्ता, दुपारचे जेवण आणि ड्रिंक) अभ्याल केला. एखादी व्यक्ती प्रक्रिया केलेले मांस सेवन करत असेल त्याचे आयुष्य दररोज 48 मिनिटांनी वाढू शकते.

हे सुद्धा वाचा

हे पदार्थ खाल्ल्यास आयुष्य कमी होते

द टेलिग्राफ नुसार, खाली दिलेल्या खाद्य पदार्थांचे सेवन केल्यास आयुर्मान कमी होते.

हॉट डॉग : आयुष्यातील 36 मिनिटे कमी होतात.

चीझ बर्गर : आयुष्य 8.8 मिनिटांनी कमी होते.

सॉफ्ट ड्रिंक : आयुष्यातील 12.4 मिनिटे कमी होतात.

पिझ्झा : आयुष्य 7.8 मिनिटांनी कमी होते.

या पदार्थांचे सेवन केल्यास आयुष्य वाढते

ज्याप्रमाणे काही पदार्थांच्या सेवनामुळे आयुष्य कमी होते, त्याचप्रमाणे इतर काही पदार्थ खाल्ल्यास आयुष्य वाढते .

पीनट बटर आणि जॅम सँडविच : आयुष्यातील 33.1 मिनिटे वाढतात.

बेक्ड सॅलमन मासा : आयुष्य 13.5 मिनिटांनी वाढते.

केळं : आयुष्याची 13.5 मिनिटे वाढतात.

टोमॅटो : आयुष्य 3.8 मिनिटांनी वाढते.

ॲव्हकाडो : आयुष्यातील 1.5 मिनिटे वाढतात.

निरोगी आयुष्यसाठी आहारात बदल गरजेचा

अन्नाचा मानवी आरोग्यावर आणि पर्यावरणावर होणारा परिणाम पाहणे हा या अभ्यासाचा उद्देश होता. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, सॅलमन माश्यामध्ये पोषक तत्वे मोठ्या प्रमाणावर असतात, ज्याच्या एका सर्व्हिंगमुळे आयुष्य 13 मिनिटांनी वाढू शकते. संशोधकांच्या टीममध्ये असलेल्या प्रोफेसर ऑलिव्हिअर यांच्या सांगण्यानुसार, संशोधनातून समोर आलेल्या निष्कर्षांमुळे लोकांना आपले आरोग्य आणि पर्यावरण अधिक चांगले बनवण्यासाठी मदत मिळेल. निरोगी आयुष्य हवे असेल तर आहारात (चांगला ) बदल करणे गरजेचे आहे.

https://www.tv9marathi.com/sponsored/airtel-is-all-set-to-bring-5g-revolution-to-indian-consumers-au190-779393.html

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....