किवी आणि काकडीचा रस अनेक रोगांवर गुणकारी, पाहा रेसिपी !
किवी आणि काकडी खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. किवीमध्ये फोलेट आणि पोटॅशियम देखील आढळतात.
मुंबई : किवी आणि काकडी खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. किवीमध्ये फोलेट आणि पोटॅशियम देखील आढळतात. किवी खाल्ल्याने पाचन शक्तीत वाढ होते. तसेच शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते. किवीमुळे सेरोटोनिन हार्मोन्स वाढतात. हे हार्मोन्स शांत झोपेसाठी खूप महत्त्वाचे मानले जातात. किवीमध्ये व्हिटॅमिन सी, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत. (Kiwi and cucumber juice is beneficial for health)
काकडी जास्तीत जास्त खाल्ली पाहिजे. कारण काकडीमध्ये 80 टक्के पाणी आढळते, ज्यामुळे काकडी खाल्ल्याने आपल्या शरीरात पुरेसे पाणी मिळते. याशिवाय काकडीमध्येही जीवनसत्त्वे आढळतात. काकडीमध्ये भरपूर कॅलरी असतात. काकडी खाल्लाने शरीरामध्ये चरबी निर्माण होत नाही. म्हणूनच काकडी खाल्ल्याने देखील नियंत्रणात राहते. दिवसातून एकदा तरी आपण काकडी खाल्ली पाहिजे. काकडीमध्ये सिलिकॉन, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचे प्रमाण भरपूर आहे. हे तीन पौष्टिक घटक त्वचेसाठी आवश्यक आहेत.
किवी आणि काकडीचा रस घेणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. 2 किवी, 1 काकडी आणि 1 चमचे धणे पावडरची यानंतर, किवी सोलून घ्या आणि चिरून घ्या. काकडी सोलून घ्यावी. यानंतर सर्व गोष्टी मिक्सरमध्ये टाका आणि पेस्ट तयार करा. आवश्यकतेनुसार या पेस्टमध्ये पाणी घाला. यानंतर 1 चमचा धणे पूड घाला आणि मिक्स करावे. अशा प्रकारे आपले किवी आणि काकडीचे पेय तयार करा. विशेष म्हणजे दररोज सकाळी हा पिल्ल्यामुळे आपण्यास अनेक फायदे होतात. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
काकडीमध्ये व्हिटॅमिन सी, बीटा कॅरोटीन सारख्या अँटी-ऑक्सिडंट असतात. ते आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करतात. काकडी, पुदिना आणि लिंबू आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. पाण्यात काकडी, लिंबू, पुदिना टाकून प्यायल्याने आपले शरीर तंदुरुस्त राहते. काकडीमध्ये बरेच पौष्टिक पदार्थ आढळतात. ज्यामुळे शरीरातील रक्तामध्ये साखरेचे पातळी नियंत्रण राहते. म्हणूनच काकडी खाल्ल्याने मधुमेहावरही नियंत्रण मिळते. म्हणून उन्हाळ्यात काकडी खाण्याचा सल्ला दिला जातो.
संबंधित बातम्या :
Health Tips : हाडे नेहमी मजबूत ठेवायचीत? मग, आहारात नक्की सामील करा ‘हे’ 5 सुपरफूड्स
Health Tips | मासिक पाळीच्या वेदनेत आराम मिळवून देतील ‘हे’ पदार्थ! अशा प्रकारे करा सेवन
Makeup Tips | वयाच्या चाळीशीतही सुंदर दिसायचंय? तर मेकअप करताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात!#MakeupTips | #skincare | #antiaging | #makeup https://t.co/RQLTJfjJT0
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 8, 2021
(Kiwi and cucumber juice is beneficial for health)