तुम्हीही चमच्याने जेवता का ? आजच सोडा ही सवय, जाणून घ्या हाताने जेवण्याचे फायदे
चमच्याने खाण्याच्या तुलनेत स्वत:च्या हाताने जेवताना आपण हळू खातो. हाताने खाताना आपण किती अन्न खाल्लंय आणि किती बाकी आहे याचाही अंदाज येतो. हाताने जेवताना बोटं आणि हातांच्या पेशींचा व्यायामही होतो, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं.
नवी दिल्ली – आजच्या तरुण पिढीतील बऱ्याचशा लोकांमध्ये मध्ये काटा आणि चमच्याने (using spoon) खाण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. जेवण कुठलंही असो पण त्यांच्या हातात लगेच चमचा येतो. पण चमच्याने अन्न खाल्ल्याने, हाताने जेवण्याचे बरेच फायदे मिळत नाहीत. हे खरं आहे, चमच्याने खाण्यापेक्षा हाताने खाणे (eating by hand) अधिक फायदेशीर (benefits) असल्याचे सांगितले जाते. तुमची पचनशक्ती मजबूत हवी असेल तर हाताने खावे. चमच्याऐवजी हाताने अन्न खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते, असेही म्हटले जाते.
आयुर्वेदातही असे नमूद करण्यात आले आहे की, हाताने खाल्ल्याने अन्न लवकर पचते. जेव्हा तुम्ही स्वत:च्या हाताने जेवता तेव्हा पूर्ण चव लक्षात घेऊन जेवता आणि त्यामुळे जेवणाची चवही वाढते.
चमच्याऐवजी हाताने जेवण्याचे फायदे जाणून घेऊया.
– जेव्हा आपण हाताने जेवतो, तेव्हा बोटं आणि हातांच्या पेशींचा व्यायामही होतो, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं. हाताने जेवण्याची परंपरा अनेक शतकांपासून सुरू आहे, मात्र आजच पिढी हे विसरत आहे. पण आजही काही लोकं हातानेच जेवणं पसंत करतात, त्यांना त्यामुळे बरं वाटतं.
– आयुर्वेदानुसार, असे मानले जाते की बोटांच्या टोकांमध्ये असलेल्या (fingertips) मज्जातंतूचा अंतिम भाग हा पचनास प्रोत्साहन देतो. खरंतर, जेव्हा तुम्ही तुमच्या हातांनी खाता, तेव्हा अन्नाचा पोत, चव आणि सुगंध याविषयी अधिक माहिती असते.
– हाताने खाल्ल्याने रक्ताभिसरणही सुधारते. यामुळे बोटांच्या आणि हातांच्या स्नायूंचाही व्यायाम होतो, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. तुम्ही तुमच्या हातांची हालचाल जितकी अधिक सुरळीत ठेवाल तितका रक्तप्रवाह सुरळीत राहील. पोळीचा तुकडा तोडून भाजीसोबत खाणे किंवा भात, भाजी, आमटी एकत्र कालवून आपण खातो तेव्हा बोटांची हाडे आणि सांधेही व्यवस्थित काम करतात.
– एका अभ्यासानुसार, जेव्हा लोक पेपर वाचताना किंवा टीव्ही पाहताना हाताने खातात तेव्हा त्यांना स्नॅकच्या वेळी लागणारी भूक कमी लागते आणि व ते हलका नाश्ता निवडतात. संशोधकांच्या निष्कर्षानुसार, काटा-चमच्याने खाण्यापेक्षा हाताने खाल्ल्याने परिपूर्णता आणि तृप्ततेची भावना वाढते.
– एका अभ्यासानुसार, लोक चमच्याने आणि काट्याने पटापट किंवा जलद वेगाने खातात, जे शरीरातील रक्त-शर्करा असंतुलनाशी जोडलेले आहे. यामुळे टाईप-2 मधुमेह होण्याची शक्यता आणखी वाढू शकते, त्यामुळे चमच्याने खाण्याची सवय सोडा आणि हाताने खा.
– चमच्याने जेवल्यावर जेवण किती गरम आहे हे कळत नाही आणि तोंड भाजू शकते. जेव्हा तुम्ही तुमच्या हातांनी जेवता तेव्हा तुम्हाला अन्न किती गरम आहे हे समजू शकते व गरजेनुसार अन्न गार करून खाता येते.
– चमच्याने खाण्याच्या तुलनेत स्वत:च्या हाताने जेवताना आपण हळू खातो. हाताने खाताना आपण किती अन्न खाल्लंय आणि किती बाकी आहे याचाही अंदाज येतो. जास्त खाणे हे वजन वाढण्याचे सर्वात मोठे कारण आहे. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी अन्नाचे व्यवस्थापन करणे महत्वाचे ठरते.
– हात स्वच्छ धुवून जेवतो, त्यामुळे वैयक्तिक स्वच्छताही पाळली जाते.