वेळेचा आणि AM-PM या लॅटिन शब्दांचा संबंध काय? त्याचा नेमका अर्थ काय? वाचा सर्व प्रश्नांची उत्तरं

वेळ सांगताना 12 ताशी घड्याळात AM आणि PM असं नेहमीच लिहिलं जातं. मात्र, वेळेसोबत या शब्दांचा काय संबंध आणि त्याचा नेमका अर्थ काय हे अनेकांना माहिती नसते.

वेळेचा आणि AM-PM या लॅटिन शब्दांचा संबंध काय? त्याचा नेमका अर्थ काय? वाचा सर्व प्रश्नांची उत्तरं
Follow us
| Updated on: Apr 12, 2021 | 10:52 PM

वॉशिंग्टन : वेळ सांगताना 12 ताशी घड्याळात AM आणि PM असं नेहमीच लिहिलं जातं. मात्र, वेळेसोबत या शब्दांचा काय संबंध आणि त्याचा नेमका अर्थ काय हे अनेकांना माहिती नसते. हे दोन्ही शब्द मूळचे लॅटिन भाषेतील असून नंतर त्यांनी इंग्रजी भाषेत जागा मिळवली आहे. आता या शब्दांचा सर्रास वापर केला जातो. AM आणि PM हे दिवसाच्या वेळा दर्शवणारे शब्द सुरुवातीला आले तेव्हा त्यांनी लोकांचा गोंधळ उडवला (Know all about AM and PM with time meaning and why it is used).

मध्य रात्रीची वेळ आणि दुपारची वेळ कशी ठरवायची असा लोकांना प्रश्न पडत असे. तुम्ही तुमच्या डिजीटल घड्याळाची वेळ सेट करताना किंवा अलार्म लावताना AM आणि PM चा विचार करता. जर रात्रीच्या बारानंतरची वेळ असेल तर आपण त्याला AM म्हणतो आणि दुपारी बारानंतरची वेळ असेल तर आपण त्याला PM म्हणतो. या लॅटीन भाषेतील शब्दांचा वापर आपण रोज करतो पण AM आणि PM या शब्दांचा नेमका अर्थ काय आहे हे अनेकांना माहिती आहे का? आज समजून घेऊया या शब्दांचा नेमका अर्थ काय आहे.

AM आणि PM हे दोन्ही संक्षिप्त शब्द आहेत जे लॅटीन भाषेतून आले आहेत. अमेरिकेसह जिथे इंग्रजी भाषा बोलली जाते त्या तमाम देशांमध्ये या शब्दांचा वापर केला जातो. AM म्हणजे Ante Meridiem (आंते मेरीदीयम) म्हणजेच मध्यरात्रीनंतरची वेळ. PM म्हणजे Post Meridiem (पोस्‍ट मेरीदीयम) म्हणजे दुपारी 12 नंतरची वेळ. दुपारी बारानंतर PM वापरले जाते. म्हणूनच घड्याळात 12 तासांची पद्धत आहे.

सैन्यातील वेळेचे प्रयोग

लॅटिन भाषेतील शब्दांनी इंग्रजी भाषेत जागा मिळवली आहे आणि त्याचा सर्रास वापर केला जातो. AM आणि PM हे दिवसाच्या वेळा दर्शवणारे शब्द सुरुवातीला आले तेव्हा लोकांचा गोंधळ मिलेट्रीची वेळ असे ठरवण्यात आले होते. तांत्रिकदृष्या रात्रीचे 12 म्हणजे दिवसाचा पुर्वार्ध मानला जातो. दुसऱ्या दिवशी दुपारी 12 च्या आतील वेळेला एक दिवस तर दुपारी 12 नंतर दुसरा दिवस असे मानले जाते. म्हणून याला आधीचा दिवस अथवा नंतरचा दिवस असे सांगितले तर थोडं वेडेपणाचं वाटू शकतं. ज्या देशांमध्ये इंग्रजी बोललं जातं तेथे आर्धी रात्र सांगण्यासाठी AM वापरतात. कारण रात्री 12 पासून दुसरा दिवस सुरू होतो असे मानले जाते.

कोणत्या देशांमध्ये 12 तासी घड्याळ?

जगभरात वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळी वेळ सांगण्याची पद्धत आहे. अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया अशा काही देशांमध्ये 12 तासी घड्याळाचा उपयोग केला जातो. दुसरीकडे दिवसात 24 तासाच्या वेळ प्रकाराला इजिप्तच्या लोकांना जबाबदार धरलं जातं. असं सांगितलं जातं की इजिप्तचे लोक बोटांवर मोजायचे. त्यात अंगठ्याला मोजलं जायचं नाही. तेथूनच जगात 24 तासी वेळ सांगण्याची पद्धत पुढे आल्याचं बोललं जातं.

हेही वाचा :

VIDEO | प्रबळ इच्छाशक्तीपुढे दिव्यांगत्वही हरलं, व्हिडीओ पाहून अरविंद केजरीवाल म्हणाले…

5 सेकंदात चितपट ! शिंगावर उचलताच सिंहाला पळता भूई थोडी, व्हिडीओ पाहाच

Photo : ‘ब्लू डुन्स ऑन रेड प्लॅनेट’, नासाकडून मंगळ ग्रहाचे नवे फोटो शेअर

व्हिडीओ पाहा :

Know all about AM and PM with time meaning and why it is used

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.