Cluster Beans Benefits | शरीराच्या अनेक समस्यांवर गुणकारी ‘गवार’, वाचा या भाजीचे फायदे…
क्लस्टर बीन्स अर्थात गवारीच्या शेंगा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. त्यात अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. गवारच्या शेंगांमध्ये प्रथिने आणि फायबर समृद्ध प्रमाणात असतात.
मुंबई : क्लस्टर बीन्स अर्थात गवारीच्या शेंगा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. त्यात अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. गवारच्या शेंगांमध्ये प्रथिने आणि फायबर समृद्ध प्रमाणात असतात. याशिवाय यात व्हिटामिन सी, व्हिटामिन ए, कॅल्शियम, आयर्न आणि पोटॅशियम हे उपयुक्त घटक देखील आढळतात. आहारात गवारीच्या भाजी खाण्याने वजन नियंत्रणात राहते. तसेच, हृदयविकार देखील दूर राहतात (Know Amazing Health benefits of cluster beans).
आहारातील गवारीच्या शेंगा आपल्याला अनेक गंभीर आजारांपासून बचावते. बरेच लोक भाजी बनवून, तसेच सलाडमध्ये सामील करून गवारच्या शेंगा खातात. यामध्ये बरेच उपयोगी गुणधर्म आहेत, जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. चला तर, गवारीच्या शेंगांच्या या फायद्यांविषयी जाणून घेऊया…
पोटाच्या समस्यांपासून मिळते मुक्ती.
गवारच्या शेंगा खाल्ल्याने अपचन, बद्धकोष्ठता आणि गॅसच्या समस्या दूर होतात. आपल्याला बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास, आहारात गवारीच्या शेंगांचा समावेश करा. त्यातील फायबर आपल्याला बद्धकोष्ठतेपासून मुक्त करेल. याचे नियमित सेवन केल्याने पाचन तंत्र मजबूत होते. गवारीच्या शेंगा नियमित खाल्ल्याने पोट स्वच्छ राहते.
वजन कमी होते.
सध्याच्या काळात अनेक लोक वाढत्या वजनाच्या समस्येने त्रस्त आहेत. कित्येक तास काम करण्यामुळे आणि सतत वेगवेगळ्या गोष्टी खाल्ल्यामुळे येणारा ‘लठ्ठपणा’ हा एक गंभीर आजार बनला आहे. जर, आपल्यालाही वजन वाढण्याबद्दल काळजी वाटत असेल, तर दररोज गवारीच्या शेंगांचे सेवन करा. हे खाल्ल्याने तुमचे वजन नियंत्रणात राहते. बरेच लोक हे भाजी किंवा सलाड म्हणून खातात.
मधुमेह
जर आपल्याला मधुमेहाचा आजार असेल तर गवारीच्या शेंगा अवश्य खाव्यात. यात ग्लायको न्यूट्रिएंट असते जे शरीरात साखरेची पातळी संतुलित राखण्यास मदत करते (Know Amazing Health benefits of cluster beans).
मजबूत हाडे
वयाच्या एका टप्प्यानंतर हाडे कमकुवत होऊ लागतात. म्हणून, हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शियमचे सेवन केले पाहिजे. गवारच्या शेंगामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे हाडे निरोगी राहतात.
गर्भवती महिलांसाठी फायदेशीर
गवारीची भाजी गर्भवती महिलांसाठीही अत्यंत लाभदायक ठरते. आयर्न आणि कॅल्शिअमची कमतरता पूर्ण करण्यासाठी अनेक गर्भवती महिलांना गवार खाण्याचा सल्ला देण्यात येतो. तसेच, गवारीमधील फॉलिक अॅसिड आणि व्हिटामिन्स पोटातील बाळाच्या विकासासाठी फायदेशीर ठरतात.
त्वचेच्या समस्या दूर करण्यात लाभदायी
गवारीची भाजी त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी मदत करते. यासाठी गवारीच्या भाजीचा रस करून त्याचे सेवन केल्याने फायदा होतो.
रक्तदाब नियंत्रण
गवारीच्या भाजीमध्ये असणारे हायपोग्लायसेमिक आणि हायपोलिपिडेमिक गुणधर्म उच्च रक्तदाबाने पीडित असणाऱ्या लोकांसाठी लाभदायक ठरतात.
(टीप : सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
(Know Amazing Health benefits of cluster beans)
हेही वाचा :
रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या लोकांना कर्करोगाचा धोका, एका सर्वेक्षणात निष्पन्न
रिकाम्या पोटी केळी खाताय? मग अगोदर हे वाचा, नाहीतर गंभीर परिणामांना समोरे जावे लागेल https://t.co/MGYPwIBU82 #Food #Health #healthy #banana
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 9, 2021