Tour Package | IRCTCचे स्वस्तात ‘शिर्डी’ दर्शन, विमानातून सफर आणि प्रवासाठी एसी गाड्याही मिळतील!

जर आपण बरेच दिवस साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीला जाण्याचा विचार करत असाल, तर ही आपल्यासाठी चांगली संधी आहे.

Tour Package | IRCTCचे स्वस्तात ‘शिर्डी’ दर्शन, विमानातून सफर आणि प्रवासाठी एसी गाड्याही मिळतील!
साई बाबा, शिर्डी
Follow us
| Updated on: Feb 15, 2021 | 3:53 PM

मुंबई : जर आपण बरेच दिवस साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीला जाण्याचा विचार करत असाल, तर ही आपल्यासाठी चांगली संधी आहे. वास्तविक, IRCTCने शिर्डी दर्शनासाठी एक पॅकेज सुरू केले आहे, ज्यामध्ये लोकांना विमानाने शिर्डी येथे नेले जाईल आणि तेथेही फिरवले देखील जाईल. विशेष म्हणजे या सहलीचे दर खूपच कमी आहेत आणि आयआरसीटीसीतर्फे हॉटेलपासून खाण्यापिण्याच्या सगळ्या सोयीसुविधा देखील मिळतील. आपल्याला फक्त एकदाच पैसे जमा करावे लागतील आणि त्यानंतर संपूर्ण सुविधा आयआरसीटीसीकडून दिल्या जातील. याशिवाय शहरात फिरण्यासाठी एसी कार देखील उपलब्ध असेल (Know details about IRCTC Shirdi sai baba tour package).

IRCTCचे हे पॅकेज दिल्लीपासून सुरू होईल आणि सर्व प्रवाशांना पुन्हा दिल्लीतच सोडले जातील. या पॅकेजमध्ये हॉटेलमध्ये राहण्याच्या व्यवस्थेचाही समावेश आहे आणि आयआरसीटीसीने त्या हॉटेलची माहिती आपल्या अधिकृत वेबसाईटवर दिली आहे. तुम्हालाही या पॅकेजद्वारे शिर्डीला जायचे असेल, तर या पॅकेजशी संबंधित खास गोष्टी जाणून घ्या…

प्रवास कधी सुरू होईल?

शिर्डी दर्शनाचा हा प्रवास 13 मार्च 2021 रोजी सुरू होईल आणि संपूर्ण प्रवास कम्फर्ट क्लासमध्ये म्हणजेच आरामात केला जाईल.

काय-काय पाहायला मिळेल?

या पॅकेजमध्ये प्रवाशांना दिल्लीहून शिर्डीला नेले जाईल व तेथून परत दिल्लीला आणले जाईल. यात एसी वाहनाने शिर्डीत फिरण्याची व्यवस्था केली जाणार आहे. या पॅकेजमध्ये हॉटेल, एक वेळचा नाश्ता, 1 लंच आणि 1 डिनर, फिरण्यासाठी ट्रेन, फ्लाईट तिकिटांची व्यवस्था केली जाईल. तुमचे तिकिटही आयआरसीटीद्वारेच बुक केले जाईल. यात पहिल्याच दिवशी तुम्हाला दिल्लीहून शिर्डीला नेले जाईल आणि दुसर्‍या दिवशी शनि शिंगणापूरला नेण्यात येईल. हा पूर्ण दोन दिवसांचा दौरा असेल, जो विमानाने केला जाईल (Know details about IRCTC Shirdi sai baba tour package).

त्याचबरोबर शिर्डीच्या मंदिरात प्रवेश केवळ कोरोना विषाणूच्या नियमांच्या आधारे दिला जाईल, ज्यामध्ये दररोजचे प्रवासी निश्चित आहेत. त्याच वेळी, लोकांना कोरोना विषाणूची चाचणीसुद्धा करावी लागेल, त्यानंतरच ते मंदिरात प्रवेश करू शकतील. तसेच, 65 वर्षांपेक्षा जास्त व 10 वर्षाखालील लोकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.

काय आहेत दर?

जर, तुम्ही एकट्यासाठी सहल बुक करत आहात, तर तुम्हाला 15295 रुपये मोजावे लागतील, तर दोन जणांच्या बुकिंगवर प्रत्येकी 13625 रुपये द्यावे लागतील. तीन लोक सहलीत सामील होत असल्यास हा दर प्रति व्यक्ती 13350 रुपये इतका असेल. मुलांचे भाडे त्यांच्या वयाच्या आधारे ठरवले जाईल.

पॅकेजमध्ये काय समाविष्ट नाही?

कोणत्याही मंदिरात किंवा इमारतीत जाण्यासाठी आवश्यक असलेले तिकिट शुल्क केवळ प्रवाशालाच द्यावे लागेल. याशिवाय प्रवाशाला हॉटेलची टीप, मिनरल वॉटर, टेलिफोन चार्ज, कपडे धुण्यासाठी व इतर कामांसाठी पैसे द्यावे लागतील.

(Know details about IRCTC Shirdi sai baba tour package)

हेही वाचा :

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.