Life without Organs : ‘या’ अवयवांशिवायही जगू शकतो मनुष्य, जाणून घ्या या मागचे रहस्य…

मानवी शरीर एक प्रकारचे मशीन आहे, ज्यामध्ये प्रत्येक अवयव एखाद्या मशीन पार्टप्रमाणे कार्य करतो. मानवी शरीरात 600 पेक्षा जास्त स्नायू आणि सुमारे 206 हाडे आणि हजारो शिरा असतात, ज्या व्यक्तीला जिवंत ठेवतात.

Life without Organs : ‘या’ अवयवांशिवायही जगू शकतो मनुष्य, जाणून घ्या या मागचे रहस्य...
मानवी शरीर
Follow us
| Updated on: Feb 20, 2021 | 9:29 AM

मुंबई : मानवी शरीर एक प्रकारचे मशीन आहे, ज्यामध्ये प्रत्येक अवयव एखाद्या मशीन पार्टप्रमाणे कार्य करतो. मानवी शरीरात 600 पेक्षा जास्त स्नायू आणि सुमारे 206 हाडे आणि हजारो शिरा असतात, ज्या व्यक्तीला जिवंत ठेवतात. या सर्व गोष्टींचे मुख्य भाग शरीराचे अवयव असतात. शरीरातील प्रत्येक अवयवाचे स्वतःचे असे वेगवेगळे कार्य असते. परंतु, आपणास माहित आहे का की, आपल्या शरीरात असेही काही भाग आहेत, जे नसले तरी, आपले जीवन जगणे शक्य आहे…(Know how Human can live their life without these organs)

पित्ताशय

आपल्या पाचन संस्थेमध्ये पित्ताशय मुख्य भूमिका निभावते. बहुतेकदा, जेव्हा मुतखड्याची समस्या उद्भवते, तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीरातून पित्ताशय काढून टाकले जाते. असे असूनही, असे लोक त्यांचे जीवन सामान्यपणे जगू शकतात. तथापि, पित्ताशय काढून टाकल्यानंतर, रुग्णाला जास्त चरबीयुक्त आहार न खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे शरीराची जास्त हानी होत नाही, केवळ पचनासंबंधित थोडीशी समस्या उद्भवू शकते.

प्लीहा

प्लीहा हा शरीराचा एक विशेष भाग आहे. शरीरातील प्लीहाचे मुख्य कार्य म्हणजे रक्त तयार करणे आणि गर्भामध्ये असलेल्या बाळाच्या पेशींचे संरक्षण करणे. जेव्हा बाळाचा जन्म होतो, तेव्हा प्लीहा रक्त प्लेटलेट्स साठवण्यास, अँटीबॉडीज तयार करण्यास आणि रक्तातील असामान्य पेशी नष्ट करण्यास सुरुवात करतो. कधीकधी हे शरीरात वेगाने वाढू लागते आणि अंतर्गत रक्तस्त्रावाच्या भीतीने डॉक्टर शस्त्रक्रिया करतात (Know how Human can live their life without these organs).

फुफ्फुस

शरीरातील प्रत्येक पेशी जिवंत ठेवण्यात फुफ्फुसांची महत्वाची भूमिका असते. त्याचे मुख्य कार्य वायुमार्गातून रक्तप्रवाहात ऑक्सिजन आणणे आहे. या व्यतिरिक्त ते अनावश्यक कार्बनडाय ऑक्साईड शरीराबाहेर फेकतात. संपूर्ण फुफ्फुसातील कार्य करण्यासाठी दोन्ही फुफ्फुस एकाच प्रकारे कार्य करतात. तर, आपण एका फुफ्फुसावरही जिवंत राहू शकता. जगभरात बरेच लोक असे जगत आहेत. व्हॅटिकन सिटीचे पोप फ्रान्सिस लहानपणापासूनच केवळ एका फुफ्फुसावर जगत आहे.

मूत्राशय

आपण कधी असा विचार केला आहे का की, एखादी व्यक्ती मूत्राशयाविना जगू शकते. मूत्राशय म्हणजे मूत्रमार्गाच्या प्रक्रियेमध्ये विशेष भूमिका निभावणारा शरीराचा अवयव. कर्करोग आणि इंफ्लेमेटरी डिसऑर्डरच्या जोखमीमुळे बहुतेक वेळा मानवी शरीरातून मूत्राशय काढून टाकले जाते. मेयो क्लिनिकने दिलेल्या वृत्तानुसार, मूत्राशय काढून टाकल्यानंतर, त्या व्यक्तीच्या पोटात एक विशेष पिशवी लटकवली जाते, ज्यामध्ये मूत्र जमा होत राहते. या प्रक्रियेस युरोस्टोमी म्हणतात.

मूत्रपिंड

आपल्या मूत्र प्रणालीत दोन मूत्रपिंड असतात. ते शरीरातून ट़क्सिक घटक बाहेर काढण्यासाठी रक्ताचे फिल्टरिंग करण्याचे काम करतात आणि रक्तदाब नियमित करणारे हार्मोन्स बनवतात. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, एखाद्या व्यक्तीचे एक मूत्रपिंड खराब झाले, तर ते दुसर्‍यावर जगू शकते. जर दोन्ही मूत्रपिंड खराब झाले, तर मात्र परिस्थिती गंभीर होऊ शकते. परंतु, अशा व्यक्तीला डायलिसिसद्वारे जिवंत ठेवता येते.

जठर

जठर हा अन्ननलिका आणि लहान आतड्यांमधील पोटाचा एक भाग आहे. कर्करोग आणि जेनेटिक डिसऑर्डरमुळे बर्‍याच वेळा जठर काढून टाकले जाते. एखादी व्यक्ती जठर काढल्यानंतरही नीट जगू शकते.

(Know how Human can live their life without these organs)

हेही वाचा :

'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.