Hair Treatment | केस सरळ करण्याचा विचार करताय? जाणून घ्या वेगवेगळ्या ‘हेअर ट्रीटमेंट’मधले फरक…

लांबसडक, सरळ आणि सुंदर केस सगळ्यांनाच हवेहवेसे वाटतात. काहींचे केस जन्मतःच सरळ असतात तर काहींचे नसतात. पण प्रत्येकीला वाटतं की, ज्या मुली आपण जाहिरातीमध्ये पाहतो, तसं आपण दिसावं..

Hair Treatment | केस सरळ करण्याचा विचार करताय? जाणून घ्या वेगवेगळ्या ‘हेअर ट्रीटमेंट’मधले फरक...
पार्लरमध्ये जाऊन केस स्ट्रेट करण्यासाठी महिला बरेच पैसे घालतात. मात्र, आज आम्ही काही घरगुती टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे केस स्ट्रेट होतील. केस स्ट्रेट पॅक तयार करण्यासाठी आपल्याला एक कप दूध आणि एक अंड लागणार आहे. एक कप दुधात अंडी मिक्स करा आणि हा पॅक ब्रशने केसांवर लावा. अर्ध्या तासांसाठी पॅक केसांवर ठेवा आणि त्यानंतर फक्त शैम्पूने आपले केस धुवा. हा पॅक लावल्याने केस स्ट्रेट होतील.
Follow us
| Updated on: Mar 02, 2021 | 1:59 PM

मुंबई : लांबसडक, सरळ आणि सुंदर केस सगळ्यांनाच हवेहवेसे वाटतात. काहींचे केस जन्मतःच सरळ असतात तर काहींचे नसतात. पण प्रत्येकीला वाटतं की, ज्या मुली आपण जाहिरातीमध्ये पाहतो, तसं आपण दिसावं.. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही केस स्ट्रेट केस करून घेऊ शकता. पण, त्यासाठी तुम्हाला बरीच काळजी घ्यावी लागते. आणि केस स्ट्रेट केल्यावर आपण छान दिसतोच, पण स्ट्रेटनिंगसाठी तुम्ही कोणती पद्धत वापरता आणि त्याचा परिणाम तुमच्या केसांवर कसा होतो, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे (Know the details about Hair treatments hair straining smoothing for straight hair).

केस स्ट्रेट करण्यासाठी सर्वात लोकप्रिय पद्धत म्हणजे हेअर स्ट्रेटनिंग. खरंतर हेअर स्ट्रेटनिंग ही एक अशी हेअर स्टाईलिंग टेक्निक आहे, ज्याच्या वापराने तुमच्या केसांना स्ट्रेट केलं जातं. ज्यामुळे, तुमचे केस स्मूथ आणि सुंदर दिसू लागतात. बऱ्याच दिवसासाठी सरळ केस हवे असतील, तर मात्र तुम्हाला हेअर स्ट्रेटनिंग,कॅरटीन ट्रीटमेंट किंवा हेअर स्मूदनिंगशिवाय पर्याय नाही.

काय आहे हेअर स्ट्रेटनिंग? (What Is Hair Straightening)

हेअर स्ट्रेटनिंग म्हणजे केस सरळ करून घेणे. याचा वापर असे लोक करतात ज्यांचे केस कुरळे किंवा थोडे फ्रिजी असतात. या प्रकारच्या केसांना दोन प्रकारे स्ट्रेट करता येते. पहिली पद्धत म्हणजे काही वेळासाठी केसांना सरळ करणं म्हणजे टेम्पररी स्ट्रेटनिंग आणि दुसरं म्हणजे परमनंटली केसांना स्ट्रेट करणे म्हणजेच परमनंट हेअर स्ट्रेटनिंग किंवा परमनंट हेअर रिबॉडींग.

परमनंट हेअर स्ट्रेटनिंग / रिबॉन्डिंगमध्ये केस स्ट्रेट आणि स्मूथ करण्यासाठी केमिकल्सचा वापर केला जातो. ही पद्धत केसांना परमनंटली स्ट्रेट करण्याचा दावा करते. पण वास्तविक हे केसांना तोपर्यंत सेमी-परमनंटच ठेवतं, जोपर्यंत केसांची पुन्हा वाढ होत नाही. या पद्धतीत वापरण्यात येणाऱ्या केमिकलमुळे तुमचे केस कमकुवत होऊ शकतात. ज्यामुळे ते तुटून गळू देखील शकतात. जर परमनंट स्ट्रेटनिंगनंतर तुम्ही केसांची व्यवस्थित काळजी घेतली नाहीतर तुमच्या केसांची नैसर्गिक चमक जाऊन, ते निस्तेज होऊ शकतात.

फायदा (Pros)

– जर तुमचे केस स्ट्रेट केले तर त्यावर कोणतीही स्टाईल करण्याची गरज भासत नाही.

– फ्रिजी केसांपासून सुटका होते.

नुकसान (Cons)

– तुमचे केस स्ट्रेट दिसतील पण पाहताच कळेल की, तुम्ही स्ट्रेटनिंग केलं आहे. म्हणजेच ते नैसर्गिकरित्या स्ट्रेट होणार नाहीत.

– तुम्हाला तुमच्या केसांची अति काळजी घ्यावी लागेल.

– स्ट्रेटनिंग करण्यासाठी तुमच्या केसांच्या लांबीनुसार तब्बल 4 ते 6 तास इतका वेळ लागू शकतो.

(Know the details about Hair treatments hair straining smoothing for straight hair)

हेअर स्मूदनिंग 

हेअर स्मूदनिंग तुमच्या केसांना नैसर्गिक लूक तर देतंच, पण त्यासोबतच त्यांना सिल्की आणि स्मूथ बनवतं. याशिवाय स्मूदनिंग केल्यावर तुम्हाला तुमचे केस मॅनेज करणंही सोपं होतं. हे केसांना फ्रिजी, डल आणि स्प्लीट एंड होऊ देत नाही. खरंतर या पद्धतीतही केमिकल्सचा वापर होतोच, पण तरीही रिबॉन्डींगपेक्षा खूप चांगलं आहे. केसांना स्मूथ केल्यानंतर, कशा प्रकारे त्यांची निगा राखली जाते, हे त्यावर अवलंबून असतं. कारण आपण केस वारंवार धूत असतो. पण तरीही 6 ते 8 महीन्यापर्यंत हेअर स्मूदनिंग आपल्या केसांवर टिकून राहतं.

कॅरटीन ट्रीटमेंट (Keratin Treatment)

कॅरटीन एक प्रकारचं प्रोटीन असतं, जे नैसर्गिकरित्या केस, नख आणि दातांमध्ये असतं आणि त्यांना मजबूत करतं. पण, केस जेव्हा बाहेरील प्रदूषण, धूळ-माती, ऊन आणि हवेच्या संपर्कात येतात, तेव्हा हळूहळू त्यातील कॅरटीनची मात्रा कमी होऊ लागते आणि केस निर्जीव व फ्रिजी होतात. कॅरटीन ट्रीटमेंटमध्ये केसांची गेलेली चमक परत येते. ज्यामुळे केस मुलायम, चमकदार आणि सुंदर होतात. ही ट्रीटमेंट फक्त तुमच्या केसांना स्ट्रेट लूक देत नाही, पण केसांकडे बघितल्यावर असं वाटेल की, जसं आत्ताच पार्लरमध्ये जाऊन ब्लो ड्राय केलंय. पण याचा प्रभाव फार कमी वेळ राहतो. जास्तीत जास्त 6 महिन्यापर्यंत याचा प्रभाव टीकतो आणि प्रत्येक वेळ केस धुतल्यावर याचा प्रभाव कमी होत जातो. कॅरटीन ट्रीटमेंट केल्यावर तुम्हाला पार्लरमधून सुचवण्यात आलेले वेगळे हेअर प्रोडक्ट्स जसं, शँपू आणि कंडीशनर यांचा वापर करावा लागेल. ही ट्रीटमेंट तुमच्या केसांची गळती थांबवते.

फायदे (Pros)

– हे फ्रिजी केसांना स्मूथ बनवतं.

– केसांची आरामात कोणतीही हेअरस्टाईल करू शकता.

– हे प्रत्येक प्रकारच्या केसांसाठी सुरक्षित आहे.

– रिबॉडींगला सर्वेात्तम पर्याय आहे.

– तुमच्या केसांना अधिक नैसर्गिकरित्या स्ट्रेट लुक मिळतो.

नुकसान (Cons)

– ही ट्रीटमेंट करताना केमिकल्सचा वापर केला जातो. ज्यामुळे तुमच्या स्कीनला अॅलर्जी आणि डोळ्यांची जळजळ होऊ शकते.

– ही ट्रीटमेंट महाग असते आणि या ट्रीटमेंटनंतर देण्यात येणारे शँपू आणि कंडीशनरही स्वस्त नसतात.

(Know the details about Hair treatments hair straining smoothing for straight hair)

ब्राझीलियन हेअर ट्रीटमेंट (Brazilian Hair Treatment)

ब्राझीलियन हेअर ट्रीटमेंट खासकरून ड्राय आणि वेव्ही केसांवर केलं जातं. या ट्रीटमेंटमध्ये कोणत्याही हार्श केमिकल्सचा वापर केला जात नाही. ज्याचा केसांवर वाईट परिणाम होत नाही. याची पूर्ण प्रोसेस नैसर्गिक घटक म्हणजेच प्राकृतिक सामग्री, प्रोटीन्स आणि अँटीऑक्सीडंट्सचा वापर केला जातो. ज्यामुळे केसांचं टेक्श्चर सुधारण्यास मदत होते.

फायदा (Pros)

– हे केसांना सिल्की व स्मूथ बनवतं.

– यामध्ये हार्श केमिकल्सचा वापर केला जात नाही.

– हे केसांच्या मुळांपर्यंत जाऊन त्यांचं पोषण करून त्यांना मॉईश्चराईज करतं.

नुकसान (Cons)

– ही ट्रीटमेंट केसांवर फक्त 12 ते 14 आठवड्यांपर्यंतच टीकते.

– ब्राझीलियन हेअर ट्रीटमेंट खूपच महाग असते.

जर तुम्ही केसांसाठी नैसर्गिक उपाय वापरू इच्छित असाल, तर काही असे घरगुती उपाय आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही घरच्याघरी कुरळे किंवा फ्रिजी केस स्ट्रेट करू शकता. –

– मध, दूध आणि स्ट्रॉबेरी हे प्राकृतिक स्ट्रेटनरच्या रूपात वापरले जातात. यासाठी तुम्हाला एक कप दूध, दोन मोठे चमचे मथ आणि थोडी मॅश केलेली स्ट्रॉबेरी एकत्र मिक्स करून घ्या. ही पेस्ट तुमच्या केसांना कमीत कमी 2 तास लावून ठेवा. मग शँपूने केस स्वच्छ धुवा.

– नारळाचे दूध आणि लिंबाचा रस एका वाटीत चांगला मिक्स करून घ्या आणि काही तास फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्या. थंड झाल्यावर केसांना हेअर मास्क म्हणून लावा. काही वेळाने केसांना 15 मिनिटं स्टीम द्या. मग शँपूने केस धुवा. हिवाळ्याच्या काळात हा उपाय करू नका.

– बेसन, मुलतानी माती आणि मोहरीच्या तेलाच्या मदतीने तुम्ही नैसर्गिकरित्या सरळ केस मिळवू शकता. यासाठी 4 मोठे चमचे बेसन आणि तेवढ्याच प्रमाणात मुलतानी माती लागेल. हे दोन्ही घटक एकत्र मिक्स करून घ्या आणि त्यात मोहरीचं तेल घालून पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट केसांना 10 ते 15 मिनिटं लावून ठेवा आणि मग केस शँपूने चांगले धूवून घ्या.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Know the details about Hair treatments hair straining smoothing for straight hair)

हेही वाचा :

Oily Skin | उन्हाळ्यात चेहरा तेलकट होतोय? ‘या’ गोष्टींचा वापर केल्यास सर्व समस्या होतील दूर!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.