भिजवलेले खजूर आरोग्यासाठी गुणकारी, जाणून घ्या फायदे
भिजवलेल्या खजुराचे सेवन करणे हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. भिजवलेले खजूर खाल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या टाळण्यास मदत होते.
नवी दिल्ली – सुका मेवा किंवा ड्रायफ्रुटस (dry fruits) यांचे सेवन करणे हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. ते पोषक तत्वांनी (lots of nutrition) युक्त असतात. तुम्ही खजुराचे (dates) सेवनही करू शकता. खजूर भिजवून त्याचे सेवन केल्यास तो खूप गुणकारी ठरतो. रात्रभर पाण्यात खजूर भिजवून ठेवावा आणि सकाळी उठल्यावर त्याचे सेवन करावे. त्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन, प्रोटीन्स आणि कॅल्शिअम हे मुबलक प्रमाणात असते. भिजवलेले खजूर खाण्याचे फायदे जाणून घेऊया.
ब्लड शुगर नियंत्रित राहते
मधुमेहाचा त्रास असलेल्या लोकांसाठी खजुराचे सेवन खूप फायदेशीर ठरते. त्यामध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो. आहे. भिजवलेल्या खजुराचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.
स्मरणशक्ती वाढते
भिजवलेल्या खजुराचे सेवन करणे हे आपल्या मेंदूसाठी खूप फायदेशीर आहे. याचे सेवन केल्याने बुद्धी तीक्ष्ण होण्यास मदत होते. त्यामुळे तुमची कार्यक्षमताही वाढते. खजुरामध्ये व्हिटॅमिन बी असते. त्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर
रोज सकाळी भिजवलेले खजूर खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते. खजुराच्या सेवनाने वजनही नियंत्रणात राहते. तसेच खजूर खाल्याने हृदयाशी संबंधित आजारांपासून दूर ठेवण्यास मदत होते.
त्वचेसाठी गुणकारी
खजूरामध्ये अनेक जीवनसत्त्वे असतात, ज्यामुळे त्वचेचे सखोल पोषण होते. खजूर खाल्याने ते त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. खजुराच्या नियमित सेवनाने डाग दूर होण्यास मदत होते. हे त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरतात.
बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते
तुम्हाला जर बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर खजूर भिजवून त्याचे सेवन करावे. खजूरामध्ये भरपूर फायबर असते. याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो. तसेच पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर ठेवण्यास मदत होते. त्यामुळे रोज सकाळी भिजवलेले खजूर खावे.
हाडं मजबूत होतात
भिजवलेल्या खजूरमध्ये मॅंगनीज, तांबे, सेलेनिअम आणि मॅग्नेशिअम यासारखे अनेक पोषक घटक असतात. ते हाडे मजबूत करण्यास मदत करतात. तसेच सांधेदुखीपासूनही आराम मिळतो. यामुळे हाडांशी संबंधित असलेल्या आरोग्य समस्या दूर होतात.
उत्साही राहतो
भिजवलेले खजूर खाल्ल्याने तुम्ही दिवसभर ऊर्जावान राहता. त्यामुळे थकवा आणि अशक्तपणा दूर होण्यास मदत होते. यामुळे शरीर उत्साही राहते.