Weekend Marriage : हम बने, तुम बने, इस वीकेंड के लिए… वाढतोय वीकेंड मॅरेजचा ट्रेंड, लग्न करूनही राहू शकता सिंगल..

जपानमधील लोकांचा असा विश्वास आहे की लग्न केल्यानंतर त्यांना पर्सनल स्पेस मिळत नाही. त्यामुळे वीकेंड मॅरेजचा ट्रेंड सुरू झाला. त्यामुळे दोन्ही जोडीदार आनंदी राहतात आणि त्यांच्यामधील प्रेमही वाढते.

Weekend Marriage : हम बने, तुम बने, इस वीकेंड के लिए... वाढतोय वीकेंड मॅरेजचा ट्रेंड, लग्न करूनही राहू शकता सिंगल..
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Mar 16, 2023 | 2:11 PM

टोकियो : लग्न (marriage) हे सात जन्मांचं बंधन असतं असं आपल्याकडे मानलं जातं. सप्तपदी घेतल्यानंतर त्या व्यक्ती सात जन्मांसाठी एकमेकांच्या होतात. एकत्र राहणं, खाणेपिणं, हिंडणे अशा सर्व गोष्टी एकमेकांच्या साथीनेच केल्या जातात. पण जपानमध्ये सध्या लग्नाचा असा ट्रेंड (new trend) सुरू आहे, ज्यामध्ये केवळ वीकेंडपुरतं (Weekend Marriage) हे लग्नाचं बंधन असतं. तेथे लग्नाचं बंधन फक्त शनिवार आणि रविवार पुरतं असतं. त्यानंतर आठवडाभर पती-पत्नी एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे राहून आपलं-आपलं आयुष्य जगतात. सध्या हा ट्रेंड जपानमध्ये खूप लोकप्रिय होत आहे. या पद्धतीचा अवलंब करून जोडप्यांना सिंगल लाईफचाही आनंद घेता येतो.

वीकेंड मॅरेज म्हणजे नक्की काय ?

वीकेंड मॅरेज हे असं लग्न आहे, जे केवळ वीकेंडपर्यंत वैध असतो. यामध्ये लग्न झालेली ही जोडपी वीकेंडला एकमेकांसोबत राहतात आणि आठवड्याचे उरलेले दिवस ते एकमेकांपासून दूर राहतात, जसे ते लग्नापूर्वी राहत होते. लग्नानंतर पर्सनल स्पेस मिळत नाही, असा बऱ्याच लोकांचा समज आहे, याच पार्श्वभूमीवर वीकेंड मॅरेजचा ट्रेंड सुरू झाला. त्यामुळे दोन्ही जोडीदार आनंदी राहतात आणि जोडीदारांमध्ये प्रेमही वाढल्याचे दिसून येते.

ज्या लोकांचे जॉब प्रोफाइल एकमेकांपेक्षा वेगळे आहेत त्यांच्यासाठी वीकेंड मॅरेज हा एक चांगला पर्याय आहे. बहुतेकांचे कामाचे तास देखील एकमेकांसारखे नसतात आणि नोकरीचे ठिकाण देखील एकमेकांपासून दूर किंवा दुसर्‍या शहरात असते. अशी जोडपी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी एकत्र राहून क्वॉलिटी टाईम स्पेंड करू शकतात.

वीकेंड मॅरेजचा फायदा काय ?

अनेकदा असे घडते की अनेक व्यक्तींची अथवा जोडप्यांची जीवनशैली एकमेकांपेक्षा खूप वेगळी असते. अशा परिस्थितीत जेव्हा दोघेही वेगवेगळे राहतात तेव्हा ते स्वतःच्या अटींवर आयुष्य जगू शकतात. याशिवाय वेगळे राहिल्याने भांडण होण्याची शक्यताही बऱ्याच अंशी कमी होते. कारण अनेकदा जोडपी एकत्र राहतात तेव्हा दोघेही एकमेकांचे दोष खूप जवळून पाहतात. अशा परिस्थितीत भांडणे आणि वाद सुरू होतात. परंतु वीकेंड मॅरेज या सर्व समस्या दूर करू शकते.

जपानमधील लोकांचा असा विश्वास आहे की वीकेंड मॅरेजमुळे ते त्यांच्या करिअरवर अधिक लक्ष केंद्रित करू शकतात आणि आठवड्याच्या शेवटी कौटुंबिक वेळ घालवून ते आठवड्याभरातील तणाव कमी करतात. याचा महिलांना अधिक फायदा होतो. महिला स्वतःसाठी वेळ काढू शकतात. घरचे टेन्शन टाळून नवऱ्याची काळजी घेऊन त्या स्वत:लाही वेळ देऊ शकतात.

लोकांचा असाही विश्वास आहे की जेव्हा तुम्ही बराच काळ दूर राहता आणि आठवड्यातून एकदा जवळ येता तेव्हा तुमच्याकडे एकमेकांना सांगण्यासाठी खूप काही असते. चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी शेअर करण्यास तुम्ही सक्षम असता. अशा प्रकारे राहिल्याने एकमेकांसोबत क्वॉलिटी टाईम एकत्र घालवता येतो. तसेच अशा प्रकारे एकमेकांची जवळीक अनुभवायला मिळते. नात्यात गोडवा वाढतो आणि बाँडिंगही मजबूत होते.

आजच्या युगात लोक खूप मुक्त विचारांचे आहेत. त्यामुळे घटस्फोटाच्या घटनांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अनेक वेळा पती-पत्नीला एकमेकांची संगत आणि एकमेकांचा हस्तक्षेप आवडत नाही. अशा परिस्थितीत जपानचे लोक लग्न दीर्घकाळ टिकवण्यासाठी वीकेंड मॅरेजचा फंडा अवलंबत आहेत.

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.