Lakshadweep Trip: लक्षद्वीपला जाण्याचा विचार करत आहात का? तर जाणून घ्या किती खर्च येईल

Lakshadweep Trip : लक्षद्वीपमधील अनेक ठिकाणचे सौंदर्य तुमचे मन जिंकू शकते. तुम्ही येथे शांत वेळ घालवू शकता. आपल्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत तुम्ही लक्षद्वीपला येण्याचा प्लान करा. येथील बेट खूपच सुंदर आहेत. येथे समुद्रातील ताजी हवा आणि निसर्गाचे सौंदर्य जवळून अनुभवता येते.

Lakshadweep Trip: लक्षद्वीपला जाण्याचा विचार करत आहात का? तर जाणून घ्या किती खर्च येईल
Follow us
| Updated on: Jan 08, 2024 | 8:13 PM

Lakshadweep Tour : सध्या देशात नाही तर जगभरात लक्षद्वीपची चर्चा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप दौरा केल्यानंतर त्यांनी सर्व देशवासियांना लक्षद्वीपला जाण्याचा सल्ला दिला आहे. पंतप्रधानांच्या या आवाहनानंतर अनेक सेलिब्रिटी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर लक्षद्विपचे फोटो शेअर करत आहेत. येथील सौंदर्य आणि स्वच्छतेचे कौतुक करत आहेत. मोदींनी आवाहन केल्यानंतर लोकं गुगलवर लक्षद्विपबाबत सर्च करत आहेत. लोकांना देखील याबाबत जाणून घ्यायचे आहे. तुम्हाला देखील जर लक्षद्वीपला फिरण्यासाठी जायचे असेल तर किती खर्च येईल जाणून घ्या.

लक्षद्वीप ट्रिप का असेल खास?

जर तुम्ही लक्षद्वीपला जाण्याचा विचार करत असाल, तर येथे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत चांगला वेळ घालवू शकता. येथील समुद्रकिनाऱ्यांवर तुम्ही सुंदर खोऱ्यांचा आनंद घेऊ शकता. लक्षद्वीपला सहलीला जाणे तुमच्यासाठी एक अविस्मरणीय जागा असेल.

लक्षद्वीपला कसे जायचे?

तुम्ही जर विमानाने लक्षद्वीपला जायचा विचार करत असाल तर तुम्हाला कोचीच्या अगाट्टी विमानतळासाठी विमानाचे तिकीट बुक करावे लागेल. कोची ते लक्षद्वीप बेटापर्यंतचे हे एकमेव विमानतळ आहे. आगट्टी बेटावर पोहोचल्यानंतर, तुम्ही येथून बोटीने किंवा हेलिकॉप्टरने सहजपणे इतर बेटांवर जाऊ शकता. अनेक विमान कंपन्या लक्षद्वीप बेटावर थेट विमानसेवा देत आहेत. जर आपण दिल्ली ते लक्षद्वीप फ्लाइट तिकिटाचे भाडे बद्दल बोललो, तर ते फक्त 10 हजार रुपये (एकतर्फी) पासून सुरू होते.

किती खर्च येऊ शकतो?

तुम्ही जर लक्षद्वीपसाठी जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही  एक महिना अगोदर फ्लाइट तिकिट बूक करावे. आधी बुकिंग केल्यास तुम्हाला ते स्वस्तात मिळेल. प्रवास खर्च वगळता तुम्ही 25,000 ते 30,000 (प्रति व्यक्ती) रुपयात लक्षद्वीप फिरु शकता.

तुम्ही वर्षाच्या कोणत्याही ऋतूत लक्षद्वीपला भेट देण्याची योजना आखू शकता. हिवाळा लक्षद्वीपला फिरण्यासाठी जाण्याचा सर्वोत्तम वेळ मानला जातो. उन्हाळ्यातही येथे हवामान चांगले असते. त्यामुळे लक्षद्वीपला भेट देण्याठी तुम्ही कधीही येऊ शकता.

स्कूबा डायव्हिंगपर्यंत आनंद

लक्षद्वीपला तुम्ही शांत आणि स्वच्छ समुद्रकिनाऱ्यावर वेळ घालवू शकता. तुम्ही सूर्यस्नानाचा आनंद घेऊ शकता. सुंदर दृश्ये तुमचं मन जिंकतील. लक्षद्वीप अनेक साहसी उपक्रमांसाठीही ओळखले जाते. येथे तुम्ही स्नॉर्कलिंग, स्कूबा डायव्हिंगसह अनेक प्रकारच्या साहसांचा आनंद घेऊ शकता.

लक्षद्वीपच्या बेटांपैकी आगत्ती, कदमत, मिनिकॉय बेट, काल्पेनी बेट आणि कावरत्ती बेट पर्यटकांना खूप आवडतात. येथे समुद्रातील ताजी हवा आणि निसर्गाचे सौंदर्य जवळून अनुभवता येते. लक्षद्वीपला जाण्याचा विचार असेल तर किमान ५ दिवसांचा टूर प्लॅन करावा. बजेट फ्रेंडली लक्षद्वीप टूर पॅकेजसाठी तुम्ही ट्रॅव्हल एजंटचीही मदत घेऊ शकता.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.