सकाळी उशिरा केलेला नाश्ता या गंभीर आजाराला ठरेल आमंत्रण, जाणून घ्या योग्य वेळ कोणती?

जे लोक सकाळी उशीरा नाश्ता करतात त्यांना टाईप-2 मधुमेहाचा धोका असतो. अमेरिकेत झालेल्या अभ्यासानुसार तज्ज्ञांनी हा अहवाल तयार केला आहे. (Late breakfast in the morning will be an invitation to this serious illness)

सकाळी उशिरा केलेला नाश्ता या गंभीर आजाराला ठरेल आमंत्रण, जाणून घ्या योग्य वेळ कोणती?
सकाळचा नाश्ता
Follow us
| Updated on: Mar 24, 2021 | 7:14 AM

मुंबई : शरीराला निरोगी ठेवण्यासाठी, खाण्यापिण्याच्या पौष्टिक मूल्यांकडे विशेष लक्ष देणे योग्य आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सकाळचा नाश्ता पौष्टिक आणि पोटभर असावा. मात्र वेळेत खाल्ले नाही तर ते आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक ठरू शकते. नुकत्याच आलेल्या अहवालातही याकडे लक्ष वेधले आहे. इंडोक्रिन सोसायटीने एन्डो 2021 या व्हर्च्युअल कॉन्फरन्समध्ये सादर केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की जे लोक सकाळी उशीरा नाश्ता करतात त्यांना टाईप-2 मधुमेहाचा धोका असतो. अमेरिकेत झालेल्या अभ्यासानुसार तज्ज्ञांनी हा अहवाल तयार केला आहे. (Late breakfast in the morning will be an invitation to this serious illness)

शिकागोमधील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी या अभ्यासादरम्यान 10574 लोकांच्या आरोग्याची आणि आहारातील सवयींची तपासणी केली. यावेळी, तज्ज्ञ जेवणाच्या वेळी रक्तातील साखरेच्या प्रमाणात काय परिणाम करतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होते. तज्ज्ञांना असे आढळले की जे लोक सकाळी लवकर नाश्ता करतात त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यासोबतच इन्सुलिनची रजिस्टेंसही कमी होते.

नाश्ता करण्याची योग्य वेळ कोणती?

अभ्यासादरम्यान, तज्ज्ञांना असे आढळले की जे लोक सकाळी 8:30 च्या आधी नाश्ता करतात त्यांच्यात इन्सुलिन रेजिस्टेंसची मात्रा कमी असते. त्यामुळे या लोकांना मधुमेहाचा धोका कमी असतो. यातून हे ही समजते की, जे लोक उपवास करतात, ते इन्सुलिनबाबत कमी संवेदनशील असतात.

सकाळचा नाश्ता का जरुरी?

तज्ज्ञांच्या मते सकाळचा नाश्ता अधिक पौष्टिक असावा. यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यासोबत शरीराला पर्याप्त प्रमाणात ऊर्जा मिळते. याव्यतिरिक्त, सकाळी लवकर न्याहारी केल्याने चयापचय संबंधित फायदे होतात.

नाश्ता कसा असावा?

– ऋतुनुसार नाश्त्यात बदल करावा – सकाळी खूप तेलकट व तिखट न्याहारीत बदल करावा – न्याहारीत प्रथिने, कार्बोदके व साखर यांचे प्रमाण संतुलित असावे – फळे, भाज्या यांचा आहारात शक्यतो समावेश करावा – आहारात नैसर्गिक भाजीपाला, फळे, धान्य यांचा वापर करावा – सकाळी एक चमचा गायीचे तूप व एक कप गायीचे दूध घेणे गरजेचे आहे. कफ प्रकृतीच्या व्यक्तीने दूध घेताना त्यात चिमूटभर हळद व सुंठ पावडर टाकावी (Late breakfast in the morning will be an invitation to this serious illness)

इतर बातम्या

धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्यांनी चाचणी करुन घेण्याचं आवाहन

मोठी बातमी ! मुंबई पोलीस दलात मोठे बदल, गुन्हे शाखेच्या तब्बल 65 अधिकाऱ्यांच्या बदल्या

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.