Long Cardigan Sweater | यंदा लाँग कार्डिगन स्वेटरची चलती, फॅशनसोबत थंडीपासूनही बचाव
गुगलच्या फॅशन ट्रेंडनुसार, अनेक मार्केटमध्ये सध्या कार्डिगन स्वेटरची चलती पाहायला मिळत आहे. (Long Cardigan Sweater For Winter Fashion)
मुंबई : हिवाळा सुरु झाला की थंडीपासून बचावासाठी स्वेटर, जॅकेट, मफलरचा सर्रास वापर केला जातो. यंदा थंडीच्या मोसमात पुन्हा लाँग कार्डिगन स्वेटर ट्रेडींगमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे. गुगलच्या फॅशन ट्रेंडनुसार, अनेक मार्केटमध्ये सध्या कार्डिगन स्वेटरची चलती पाहायला मिळत आहे. हे स्वेटर परिधान केल्यानंतर त्याचा लूक आरामदायक वाटतो. विशेष म्हणजे हे स्वेटर तुम्ही वेगवेगळ्या स्टाईलने वापरु शकता. (Long Cardigan Sweater For Winter Fashion)
लाँग कार्डिगन स्वेटर तुम्ही एखाद्या पार्टीला जाताना, मित्रांसोबत बाहेर जाताना किंवा अगदी ऑफिसमध्येही वापरु शकता. सध्या लाँग कार्डिगन स्वेटरचे पाच विविध ट्रेंड्स पाहायला मिळत आहे.
कार्डिगन स्वेटर विथ मॅचिंग ट्राऊझर
जर तुम्ही कुटुंबासोबत एखादा चित्रपट बघायला जात असाल तर तुम्ही कार्डिगन स्वेटर विथ मॅचिंग ट्राऊझर हे ट्राय करु शकता. यामुळे तुम्हाला एक वेगळा लूक मिळेल. शिवाय थंडीपासून तुमचे संरक्षणही होईल.
मोनोक्रोमेटिक आऊटफिट
सध्या मोनोक्रोमेटिक आऊटफिट फार ट्रेंडीग आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी विविध ठिकाणी मोनोक्रोम लूकमध्ये पाहायला मिळतात. मोनोक्रोम लूक म्हणजे तुम्ही एका रंगाचे किंवा त्याच रंगाच्या पॅलेटमधील आऊटफिट. मात्र जर तुम्हाला एकाच रंगाचे कपडे घालायचे नसतील तर तुम्ही रंगेबेरंगी कार्डिगनही वापरु शकता.
जिन्ससोबत कार्डिगन स्वेटर
जिन्स म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सेम टॉप, टीशर्ट किंवा एखादा कुर्ता हा लूक येतो. मात्र तुम्ही कार्डिगन स्वेटर आणि जिन्ससोबतचा लूक कधी ट्राय केलाय का? नसेल तर नक्की करुन बघा. जिन्ससोबत कार्डिगन स्वेटर परिधान केल्याने एक वेगळाच लूक पाहायला मिळतो. फ्लेयरड, बूटकेस या प्रकारच्या जिन्ससोबत तुम्ही हा लूक करु शकता.
कार्डिगन ड्रेस
फक्त जिन्स आणि टॉपवर नाही तर तुम्ही एखाद्या ड्रेसप्रमाणेही कार्डिगनचा वापर करु शकता. जर तुम्ही बटणे असलेला कार्डिगन वापरत असाल, तर तो तुम्ही ड्रेसप्रमाणे वापरु शकता. तुम्ही तुम्हाला हव्या त्या रंगाचे कार्डिगनचा वापर करुन त्यासोबत तुम्ही थाई बूट्स घालू शकता.
जर तुम्हाला फक्त कार्डिगन स्वेटर घालणे आवडत नसेल तर तुम्ही त्यासोबत एखादा बेल्टही लावू शकता. त्यामुळे तुम्हाला स्टाईलिश लूक मिळतो. (Long Cardigan Sweater For Winter Fashion)
संबंधित बातम्या :
PHOTO | पर्यटनासाठी सर्वात धोकादायक असलेले 14 देश, ‘या’ देशांमध्ये अजिबात फिरायला जावू नका