Promise day : ‘या’ सहा वचनांनी वाढवा प्रेमातील गोडवा, मग जोडीदारासोबतचं नातं होईल आणखी घट्ट
आजचा ‘प्रॉमिस डे’ (Promise day) खास बनविण्यासाठी तुमच्या जोडीदाराला कुठले वचन द्यावे, या विचारात असाल तर या सहा वचनांनी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबतचे नाते (Relation) अधिक घट्ट बनवू शकतात.
Promise day : ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त (Valentine day) सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. रोज विविध ‘डे’ साजरे करीत असताना त्या-त्या दिवसाचे काही महत्त्व आहे. 11 फेब्रुवारी हा दिवस ‘प्रॉमिस डे’(Promise day) म्हणून साजरा केला जातो. परंतु या दिवसाला तुम्ही तुमच्या जोडीदाराला जगावेगळे वचन देणे टाळत त्याच्या मनाला भावेल असे काही वचन देणे अपेक्षित आहे. अनेकांना चंद्र, तारे आदींमध्ये रमायला आवडत नाही. प्रत्यक्षात खरे ठरेल असे वचन दिल्यास ते अधिक भावत असते. या दिवशी काही नात्यांमध्ये वचने देण्यामागचा हेतू त्यांच्यातील नात्याला घट्ट (Stronger relationship) करण्याचा असतो, तर काहीजण पहिल्यांदाच अशी वचने देतात. त्यामुळे एकमेकांवरचा विश्वास आयुष्यभर टिकतो. अशा परिस्थितीत, तुम्ही दिलेल्या वचनांमुळे तुमचे बंध मजबूत होतात शिवाय तुमच्यातील विश्वास आणखी वाढतो. नात्यातील गोडवा कायम राहावा, या पद्धतीने आज आम्ही काही वचने तुम्हाला सांगणार आहोत, याचा तुमच्या नात्यात नक्की उपयोग होइल.
1) प्रेमाबद्दल आश्वस्त करा
दोन नात्यांमध्ये प्रेमबंध हे खूप महत्त्वाचे असतात. नात्यातील गोडवा टिकून ठेवण्यासाठी प्रेमाला अत्यंत महत्त्व असते. परंतु हे प्रेम ठराविक काळापुरता मर्यादित राहिल्यास नात्यातील संबंधही कटू होत जातात. त्यामुळे प्रेमात सातत्य अत्यंत महत्त्वाचे असते. अशा वेळी तुम्ही तुमच्या जोडीदाराला प्रेमाबद्दल आश्वस्त करून हे प्रेम कायम टिकून राहिल, यात कुठलीही दरी निर्माण होणार नाही, याचे वचन देऊ शकतात.
2) नात्यातील प्रामाणिकपणा टिकवाल
नाते कुठलेही असो, त्यात प्रामाणिकपणा नसेल तर ते फारकाळ टिकत नाही. नात्यात विश्वास व प्रमाणिकपणा असला तरच ते दीर्घकाळ टिकते. आपल्या जोडीदारासोबत प्रत्येक वेळी मन मोकळे केले पाहिजे. आयुष्यातील प्रत्येक गोष्टी त्याला सांगितल्या पाहिजे. यातून संवाद वाढून एकमेकांविषयी विश्वास निर्माण होतो. जोडीदारासोबतचे नाते प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचे वचन दिले पाहिजे.
3) कठीण काळात साथ
आपल्या आयुष्यात अनेक वेळा असे प्रसंग येतात, ज्यात आपल्याला एकटेपणाची भावना निर्माण होत असते. अशा वेळी कुणी सोबत असावे, त्याच्याशी आपले मन मोकळे करावे, सुख, दुखात त्याची आपल्याला साथ असावी असे वाटत असते, अनेक मंडळी चांगल्या प्रसंगांमध्ये सोबत असता, तर वाईट प्रसंगांना पाठ फिरवतात अशा वेळी जो नेहमी सोबत असतो, त्याच्याशी आपले नाते अधिक घट्ट होत असते. त्यामुळे आपण आपल्या जोडीदाराला कुठल्याही प्रसंगी सोबत राहू, नेहमी साथ देऊ असे वचन दिले पाहिजे.
4) प्रेम आणि आदर देण्याचे वचन
कुठलीही लहान गोष्ट केल्याने नाते अधिक घट्ट होते. अशा परिस्थितीत तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता त्याच्याशी संबंधित लोक आणि कुटुंबाचा पूर्ण आदर करा, यामुळे नाते मजबूत होते, आपल्या जोडीदारासह त्याच्या कुटुंबाचाही तेवढाच आदर, सन्मान केला जाईल, असे वचन जोडीदारास दिल्यास त्याचे तुमच्याप्रती प्रेम अधिक वाढीस लागते.
5) उणिवांना दूर करण्याचे वचन
मनुष्यात अनेक गुण व दोष असतात, परंतु खरा प्रेम करणारा व्यक्ती हा आपल्या जोडीदाराचा त्याच्या गुणदोषांसह स्वीकार करीत असतो. अशा वेळी तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या उणिवांचा द्वेष न करता त्या कशा सुधारता येतील, त्यांना कसे दूर करता येइल, याचा विचार केला पाहिजे.
6) समजून घेण्याचे वचन
नात्यांमध्ये अनेकदा वाद होतात. अशा घटना घडतात ज्यामुळे दोन नात्यांमध्ये तणाव निर्माण होतो. अशा वेळी तुम्ही शांत राहून आपल्या जोडीदाराला समजून घेतले पाहिजे, राग शांत झाल्यावर संवादाच्या माध्यमातून जोडीदाराशी चर्चा करून समस्या सोडवली पाहिजे. एकमेकांना समजून घेण्याचे वचन दिले पाहिजे.
आणखी वाचा :