AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Migraine Neck Pain । मानेपर्यंत पोहोचू शकतात मायग्रेनच्या वेदना, या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

Migraine Neck Pain । मानेपर्यंत पोहोचू शकतात मायग्रेनच्या वेदना, या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष (Migraine pain can reach the neck, do not ignore these symptoms)

Migraine Neck Pain । मानेपर्यंत पोहोचू शकतात मायग्रेनच्या वेदना, या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष
कानाच्या या पॉईंटवर फक्त 1 मिनिट करा मालिश, डोक्यापासून पायापर्यंत मिळेल आराम
| Updated on: Feb 20, 2021 | 3:03 PM
Share

मुंबई : मायग्रेनमुळे डोक्याच्या एका बाजूला तीव्र वेदना होतात ज्या सहन करणे फार कठिण असते. मायग्रेन केवळ डोकेदुखीपर्यंत मर्यादीत नाही. या वेदना 4 ते 72 तासांत शरीरीच्या काही भागात जाणवू लागतात. मायग्रेनमुळे काही लोकांना मळमळ व उलट्या होतात. काही लोकांना मायग्रेनच्या वेदना असल्यास आवाज आणि उच्च प्रकाशाचा त्रास होतो. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये मायग्रेनची समस्या अधिक असते. अमेरिकेतील एका सर्व्हेक्षणानुसार मायग्रेनचा त्रास असणाऱ्या 69 टक्के लोकांना डोकेदुखीसह मानेतही तीव्र वेदना होतात. मानेतील वेदना मायग्रेनचे लक्षण असू शकतात, असे एका संशोधनात निष्पन्न झाले आहे. (Migraine pain can reach the neck, do not ignore these symptoms)

मायग्रेनची कारणे

मायग्रेनमुळे मानेत वेदना होण्याची अनेक कारणे सांगण्यात आली आहेत. यापैकी एक कारण आहे मायग्रेन ट्रायजेमिनोसर्विकल कॉम्प्लेक्सवर परिणाम करते. हा मेंदूचा एक भाग आहे ज्यामध्ये चेहरा आणि मानेच्या वरच्या भागांमध्ये नसा जोडलेल्या असतात. काही संशोधकांचे म्हणणे आहे की, चुकीच्या आसन पद्धतीमुळे किंवा सांधेदुखीच्या आजारामुळे मानेच्या वरच्या नसांमध्ये ताण निर्माण होतो, ज्यामुळे मायग्रेनची वेदना वाढते.

वेदना कमी करण्यास काय करावे?

मायग्रेनच्या रुग्णांनी वेदना वाढवण्यास कारणीभूत ठरतील असे पदार्थ टाळले पाहिजेत. जसे आंबट फळं, दारु, प्रोसेस्ड फूड आणि नायट्रेट्सवाले पदार्थ आदि गोष्टी टाळल्या पाहिजेत. डाएटमध्ये मॅग्नेशिअमयुक्त पदार्थांचा अधिक समावेश केला पाहिजे. तीव्र सुगंध किंवा प्रकाश यामुळे मायग्रेनची वेदना वाढू शकते. मायग्रेन आणि मान दुखणे यांच्यातील संबंधांबद्दल कोणतीही अचूक माहिती नाही. मात्र मानेच्या वेदनेवर इलाज केल्यास मायग्रेनची समस्या दूर होऊ शकते. मायग्रेनच्या वेदना वाढू देऊ नका. जर तुम्हाला मायग्रेनची समस्या असेल तर डॉक्टरांशी संपर्क करा आणि योग्य उपचार घ्या. आपली औषधे नेहमी सोबत ठेवा आणि वेदना जाणवू लागल्यास तात्काळ घ्या.

घरगुती उपाय

काही घरगुती उपचारांनी मायग्रेन आणि मानेच्या वेदनेपासून सुटका मिळवू शकता. वेदना सुरु झाल्यानंतर तात्काळ कानाच्या वरच्या बाजूला लव्हेंडर ऑईल लावा. लव्हेंडर आईल 15 मिनिटे सूंघल्यासही आपल्याला आराम मिळतो. अॅक्यूप्रेशर, अॅक्यूपंक्चर, सुंठ घातलेला चहा, मसाज, योगा आणि स्ट्रेचिंग आदिमुळे मायग्रेन आणि मानेच्या वेदना दूर होतील.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्याल?

जर तुम्हाला नियमित वेदना होत असतील तर दुर्लक्ष करु नका. डोक्याला मार लागला, बोलताना त्रास जाणवू लागला, अधुक दिसू लागले आणि मान आखडल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा. (Migraine pain can reach the neck, do not ignore these symptoms)

संबंधित बातम्या

पायरीयामुळे त्रस्त आहात, करा हे घरगुती उपाय हिरड्यांची समस्या होईल दूर

Life without Organs : ‘या’ अवयवांशिवायही जगू शकतो मनुष्य, जाणून घ्या या मागचे रहस्य…

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.