Mouth Cancer | कानांमधून येणाऱ्या विचित्र आवाजाकडे दुर्लक्ष करताय? असू शकतात तोंडाच्या कर्करोगाची लक्षणं!
कर्करोग शरीरातील पेशींच्या अनियंत्रित पुनरुत्पादनामुळे होतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कानांमध्ये मुंग्या येणे किंवा एखादा विचित्र आवाज येणे, हे तोंडाच्या कर्करोगाचे एक चेतावणी चिन्ह असू शकते.
मुंबई : कर्करोग शरीरातील पेशींच्या अनियंत्रित पुनरुत्पादनामुळे होतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कानांमध्ये मुंग्या येणे किंवा एखादा विचित्र आवाज येणे, हे तोंडाच्या कर्करोगाचे एक चेतावणी चिन्ह असू शकते. म्हणूनच, कानात अचानक झालेल्या अशा बदलांकडे दुर्लक्ष करू नका (Mouth Cancer pain and ringing sound in ear is the symptoms of this disease).
कानाशी संबंधित तीन लक्षणे तोंडाचा कर्करोग दर्शवू शकतात. तथापि, ही फार सामान्य लक्षणे नाहीत. ही सर्व लक्षणे टेम्पोमॅन्डिब्युलर जॉइंट (TMJ) डिसऑर्डरने ग्रस्त लोकांप्रमाणेच दिसतात. कानामध्ये होणाऱ्या वेदना हळूहळू जबडा आणि गालापर्यंत पसरतात. अशावेळी कान सुन्न झाल्यासारखे वाटणे किंवा दाब जाणवू लागतो. कानांत रीन्गिंगचा आवाज वाजणे किंवा कानात मुंग्या येणे, देखील तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे असू शकतात.
धुम्रपान मुख्य कारण!
तोंड किंवा ऑरोफेरेंगल कर्करोगाच्या कारणाबद्दल काहीही स्पष्टपणे सांगितले जाऊ शकत नाही. तथापि, त्याची वाढ होण्याची काही विशेष कारणे असू शकतात. ब्रिटनमधील लोकांवर केलेल्या एका अभ्यासानुसार, सुमारे 60 टक्के लोक धूम्रपान केल्यामुळे ऑरोफेरेंगल कर्करोगाने ग्रस्त असल्याचे दिसून आले.
कर्करोगाच्या अभ्यासामध्ये असेही आढळले आहे की, घरी किंवा कामाच्या ठिकाणी होणारी सेकंड हँड स्मोकिंग (Passive smoking) देखील लोकांमध्ये तोंड किंवा ऑरोफेरेंगल कर्करोगाचा धोका निर्माण करणारी असते. या व्यतिरिक्त, अल्कोहोलच्या सेवनाने तोंड किंवा ऑरोफेरेंगल कर्करोग देखील होऊ शकतो. अभ्यासानुसार, अल्कोहोलमुळे सुमारे 30 टक्के लोकांना तोंडाचा कर्करोग होण्याची शक्यता असते.
तोंडाच्या कर्करोगाची इतर लक्षणे :
– ओठांवरील किंवा तोंडाच्या आतील भागातील जखमा लवकर बऱ्या न होणे
– तोंडात पांढरे डाग येणे
– दात तुटणे
– तोंडात गाठ येणे
– तोंडात किंवा कानात वेदना होणे
– अन्न गिळताना त्रास होणे.
(Mouth Cancer pain and ringing sound in ear is the symptoms of this disease)
प्राथमिक अवस्थेत निदान गरजेचे
नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या (NHS) मते, जर कर्करोगाचे प्रारंभिक अवस्थेत निदान झाले, तर शस्त्रक्रियेद्वारे तो दूर केला जाऊ शकतो. यामध्ये तोंडाच्या कर्करोगाची पुनरावृत्ती होण्याची फारच कमी शक्यता आहे. एनएचएस म्हणते की, तीन आठवड्यांपर्यंत जर तोंडात विचित्र बदल दिसत राहिले, तर त्वरित दंतचिकित्सक किंवा डॉक्टरांशी संपर्क साधावा.
कर्करोगाच्या पेशी घेऊ शकतात ‘ट्युमर’चे स्वरूप
मेयो क्लिनिकच्या मते, जेव्हा ओठ किंवा तोंडातील पेशी त्यांच्या डीएनएमध्ये बदल करतात, तेव्हा त्या कर्करोगाचे रूप घेऊ शकतात. पेशींचा डीएनए कंटेनर पेशींना काय करावे ते सांगतो. हा डीएनए निरोगी पेशी मरतात, तेव्हा पेशी वाढण्यास आणि दूर राहण्यास त्यांना सूचित करतो.
तज्ज्ञ म्हणतात की, तोंडाचे असामान्य कर्करोग पेशी ट्युमरचे रूप घेऊ शकतात. दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ आपल्या तोंडात, अशा तक्रारी दिसल्यास दंतचिकित्सक किंवा डॉक्टरांशी संपर्क साधा. डॉक्टर शरीरातील लक्षणे व चिन्हे तपासून त्वरित रोगाचे निदान करतील आणि त्यावर उपचार सुरु करतील.
(Mouth Cancer pain and ringing sound in ear is the symptoms of this disease)
हेही वाचा :
Weight Loss | जपानमधील लोक ‘या’ युक्तीने करतात वजन कमी, पुन्हा कधीही येत नाही लठ्ठपणा! https://t.co/1suvOcf384 #Japan | #WeightLoss | #JapaneseWeightLoss
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 2, 2021