Health | सावधान! नखांचे तुटणे ‘या’ गंभीर आजारांचे लक्षण, वेळीच काळजी घेण्याची गरज…

बर्‍याच वेळा, काही लोकांची नखे इतकी मऊ असतात, की त्यांची वाढ झाल्याबरोबर स्वत:च त्यांचे तुकडे पडू लागतात.

Health | सावधान! नखांचे तुटणे ‘या’ गंभीर आजारांचे लक्षण, वेळीच काळजी घेण्याची गरज...
Follow us
| Updated on: Dec 16, 2020 | 12:22 PM

मुंबई : बर्‍याच वेळा, काही लोकांची नखे इतकी मऊ असतात, की त्यांची वाढ झाल्याबरोबर स्वत:च त्यांचे तुकडे पडू लागतात. त्याच वेळी काही लोकांना अगदी सतत दातांनी नखे तोडण्याची सवय असते. त्यांना नखं कापण्यासाठी नेलकटरची देखील आवश्यकता नाही. आपल्या बाबतीतही असेच काही घडत असेल तर, त्याकडे सामान्य समस्या म्हणून दुर्लक्ष करू नका. नखांचे तुटणे काही गंभीर आजारांचे लक्षण देखील असू शकते (Nails breaking can be indication of bad health).

अशक्तपणा (अॅनेमिया)

बहुतेक स्त्रियांमध्ये अशक्तपणा अर्थात अॅनेमियाची समस्या आढळते. शरीरात रक्ताची कमतरता असल्यास ही समस्या निर्माण होते. अशक्तपणा दरम्यान बर्‍याच वेळा नखे ​​कमकुवत होतात आणि ती मोडतात.

यकृतच्या समस्या

नखांचा रंग बदलणे हे सहसा यकृतच्या समस्येशी संबंधित असते. पण अशा समस्यांमध्ये नखे तुटत असल्याच्या बऱ्याच घटना घडल्या आहेत. जर आपली नखे देखील स्वतःच तुटत असतील तर या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्या (Nails breaking can be indication of bad health).

मज्जासंस्थेसंबंधी समस्या

कधीकधी नखे तुटण्याची समस्या आपल्या पेशी आणि मज्जासंस्थेमध्ये बिघाड झाल्याचे देखील दर्शवते. वास्तविक, पेशी तयार करण्यासाठी आणि मज्जातंतू निरोगी ठेवण्यासाठी शरीराला ‘व्हिटामिन बी12’ची आवश्यकता असते. या व्हिटामिनच्या अभावामुळे नखे तुटण्याची समस्या देखील उद्भवते.

प्रथिने आणि कॅल्शियमची कमतरता

प्रथिने आणि कॅल्शियमची कमतरता असल्यासही बर्‍याच वेळा नखे ​​तुटण्याची समस्या उद्भवते. जर आपल्याला ही समस्या वेळेत समजली नाही तर हाडे, स्नायू आणि त्वचेशी संबंधित सर्व समस्यांचा धोका असतो (Nails breaking can be indication of bad health).

या समस्येवर उपाय..

– प्रथिनेची कमतरता दूर होण्यासाठी मोड आलेली मूग डाळ व हरभरा खा.

– शरीरातील लोहाची कमतरता दूर करण्यासाठी डाळिंब, बीट, पालक, केळी, मेथी, अंजीर या घटकांचा आहारात समावेश करा.

– ‘व्हिटामिन बी12’साठी, डॉक्टरांच्या निर्देशानुसार डाएट अथवा सप्लीमेंट घ्या. त्याच वेळी कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी आहारात दूध, दही, चीज या दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा.

नखांवर तेलाने मालिश करा.

कोरडी पडल्यामुळे देखील बर्‍याच वेळा नखे मोडतात. अशा वेळी ऑलिव्ह किंवा एरंडेल तेलाने नखांचा नियमित मसाज करा. तसेच भरपूर पाणी प्या.

(Nails breaking can be indication of bad health)

(टीप : वरील लेख हा सामान्य माहितीवर आधारित आहे. उपचारांपूर्वी आपण सौंदर्यतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.