National Ice Cream Day 2022: सर्वप्रथम आईस्क्रीम कुणी आणि कधी बनवली?; इंटरेस्टींग स्टोरी
National Ice Cream Day 2022: भारतीय लग्नसमारंभांमध्ये जेवणानंतर वेगवेगळ्या फ्लेवरते आइस्क्रीम ठेवले जाते. कोणताही खास दिवस किंवा प्रसंग आईस्क्रीमशिवाय अपूर्ण वाटतो. जगात सर्वात जास्त आइस्क्रीम प्रेमी अमेरिकेत आहेत. येथे संपूर्ण जुलै महिना राष्ट्रीय आईस्क्रीम महिना म्हणून साजरा केला जातो.

लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचा आवडता पदार्थ म्हणजे आईस्क्रीम. आईस्क्रीम (Ice Cream) न आवडणारी व्यक्ती सापडणे म्हणजे दुर्मिळच. आईस्क्रीम हा असा पदार्थ आहे जो कितीही खाल्ला तरी पोट भरते पण मन मात्र काही भरत नाही. आईसक्रीम म्हणजे अनेकांचा विक पाईंट. भरपूर जेवल्यानंतर पोट कितीही भरले तरी आईस्क्रीम समोर आल्यावर त्याला कोणीही नकार देऊ शकत नाही. परदेश असो किंवा भारत (india) जगभरात सर्वत्र आइस्क्रीमप्रेमी आहेत. कोणतीही पार्टी, लग्न, बिझनेस मीटिंग अगदी छोटसं गेट टूगेदर असलं तरी स्वीटमध्ये आईस्क्रीमशिवाय अपूर्ण आहे. आज( रविवार 17 जुलै) जागतिक आईस्क्रीम दिन (National Ice Cream Day) आहे. यानिमित्ताने आईस्क्रीम चा शोध कसा लागला आईस्क्रीम जगभरात प्रसिद्ध कसं झालं ह्या सगळ्याचा आढावा घेणारा हा विशेष लेख.
भारतीय लग्नसमारंभांमध्ये जेवणानंतर वेगवेगळ्या फ्लेवरते आइस्क्रीम ठेवले जाते. कोणताही खास दिवस किंवा प्रसंग आईस्क्रीमशिवाय अपूर्ण वाटतो. जगात सर्वात जास्त आइस्क्रीम प्रेमी अमेरिकेत आहेत. येथे संपूर्ण जुलै महिना राष्ट्रीय आईस्क्रीम महिना म्हणून साजरा केला जातो. यंदा अमेरिकेत 17 जुलै रोजी राष्ट्रीय आईस्क्रीम दिवस साजरा केला जात आहे. आईस्क्रीम या पदार्थाचा शोध कधी आणि कोणी लावला याच्यामागे अतिशय इंटरेस्टींग कहानी आहे.
सर्वप्रथम अलेक्झांडरने आइस्क्रीम बनवले
सर्वप्रथम अलेक्झांडरने आइस्क्रीम बनवले होते. अडीच हजार वर्षांपूर्वी इजिप्त जिंकल्यावर त्याने भरपूर आइस्क्रीम बनवण्याची ऑर्डर दिली. अलेक्झांडरला थंड आइस्क्रीमचा आनंद लुटता यावा म्हणून सैनिकांनी डोंगरावरील गोठलेला बर्फ आणून अनेक खड्ड्यांमध्ये भरला असल्याचेही सांगीतले जाते.



डोंगरावरून बर्फ आणून बनवले आईसक्रीम
इसवी सनाच्या पहिल्या शतकात रोमचा राजा नीरो याने आपल्या सेवकांना डोंगरावरून बर्फ आणून त्यात फळांचा रस आणि मध मिसळून थंड मिठाई तयार करण्याचे आदेश दिले होते. यामुळे या राजेने पहिले आईसक्रीम बनवल्याचेही काही जण सांगतात.
पहिले आइस्क्रीम पार्लर
18व्या शतकात अमेरिका आणि ब्रिटनच्या पाककृतींमध्ये आइस्क्रीम बनवण्याची पद्धत आढळून आली आहे. ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीनुसार, आइस्क्रीम हा शब्द प्रथम 1744 मध्ये आढळतो. जगातील पहिले आइस्क्रीम पार्लर 1776 मध्ये अमेरिकेत सुरू झाले.
राष्ट्रीय आईस्क्रीम महिना कोणी सुरू केला
1984 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी जुलैला राष्ट्रीय आइस्क्रीम महिना म्हणून घोषित केले. आइस्क्रीममुळे पोषण मिळते आणि अमेरिकेतील 90 टक्के लोकांना ते खायला आवडते, असा त्यांचा विश्वास होता. थॉमस जेफरसन, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष, आइस्क्रीमचे प्रचंड चाहते होते. त्यांची हाताने लिहिलेली व्हॅनिला आइस्क्रीमची रेसिपी ग्रंथालयात ठेवण्यात आली आहे. अमेरिकेतील कोणत्याही शहरापेक्षा कॅलिफोर्नियाच्या लाँग बीचमध्ये जास्त आइस्क्रीम खाल्लं जातं. अमेरिकेत उत्पादित होणार्या दुग्धजन्य पदार्थांपैकी फक्त 10 टक्के दूध आइस्क्रीम बनवण्यासाठी वापरले जाते.
भारतामध्ये सिजनल आईसक्रीमचा ट्रेंड
भारतातही आईसक्रीम चांगलेच लोकप्रिय आहे. व्हॅनिला, चॉकलेट या नियमित फ्लेवर्ससह भारतात सिजनल आईसक्रीमचा ट्रेंड पहायला मिळतो. विशेत: वेवगेळ्या सिजनमध्ये वेगवेगळ्या फळांचे आईसक्रीम खाल्ले जातात. आंबा, सिताफळ, टेंडर कोकोनट, फणस, संत्रा अशा विविध फळांचे आईसक्रीम भारतीय मोठ्या आवडीने खातात.