Hair Care | पांढरे केस लपवण्यासाठी हानिकारक रंग वापरताय? थांबा, ‘हे’ नैसर्गिक घटक वापरून पाहा!

वाढत्या वयाने केस पांढरे होणे ही सामान्य गोष्ट आहे. परंतु, वयाच्या 25व्या वर्षात जर तुमचे केस पांढरे होऊ लागले असतील, तर ही गंभीर गोष्ट आहे.

Hair Care | पांढरे केस लपवण्यासाठी हानिकारक रंग वापरताय? थांबा, ‘हे’ नैसर्गिक घटक वापरून पाहा!
हेअर कलर केल्यानंतर चुकूनही करु नका या चुका
Follow us
| Updated on: Jan 05, 2021 | 4:04 PM

मुंबई : वाढत्या वयाने केस पांढरे होणे ही सामान्य गोष्ट आहे. परंतु, वयाच्या 25व्या वर्षात जर तुमचे केस पांढरे होऊ लागले असतील, तर ही गंभीर गोष्ट आहे. केस पांढरे होण्याची अनेक कारणे असू शकतात. बर्‍याचदा योग्य पोषणाच्या कमतरतेमुळे आणि अनुवांशिक कारणांमुळे देखील केस पांढरे होऊ लागतात. परंतु, जास्त प्रमाणात तंबाखूचे सेवन, धूम्रपान आणि भावनिक ताण हे देखील केसांच्या या समस्येचे कारण ठरू शकते. पांढरे केस लपवण्यासाठी जर तुम्ही हेअर डाय किंवा कृत्रिम हेअर कलर वापरत असाल तर त्याने केसांच्या इतर समस्या वाढण्याची शक्यता निर्माण होते. म्हणूनच पांढर्‍या केसांच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत, ज्याचा आपण अवलंब करून पाहू शकता (Natural hair Colour for grey hair problem).

आवळा :

आवळा केसांचा नैसर्गिक काळा रंग टिकवून ठेवण्यात मदत करतो. यासाठी आवळा कुस्करून त्याच्या बिया काढून घ्या. कुस्करलेल्या आवळ्याची एक पेस्ट बनवून डोक्यावर लावा. तसेच याने केसांच्या मुळांवर मसाज करा. यामुळे केसांचा रंग गडद होईल.

नारळ तेल आणि लिंबाचा रस :

नारळ तेल आणि लिंबाचा रस यामुळे स्काल्पचे रक्त परिसंचरण वाढते. या तेलात बायोटिनसह इतर घटक असतात, ज्यामुळे केस पांढरे होत नाहीत. तसेच, ते मऊ होतात. यासाठी दोन भाग नारळ तेलात, एक भाग लिंबाचा रस मिसळा. या मिश्रणाने आपल्या स्काल्प आणि केसांची मसाज करा.

कढीपत्ता :

कढीपत्ता केसांच्या मुळांची ताकद वाढवतो आणि केसांना आवश्यक पोषक प्रदान करते. यासाठी कढीपत्ता नारळाच्या तेलात घाला आणि तडतडेपर्यंत गरम करा. नंतर ते तेल गळून घ्या आणि त्याने केसांची मसाज करा. सुमारे 30-45 मिनिटांनंतर केस धुवा. आठवड्यातून दोनदा या प्रक्रियेचे अनुसरण करा (Natural hair Colour for grey hair problem).

चहा किंवा कॉफी :

चहा किंवा कॉफी केसांचा नैसर्गिक रंग राखण्यात मदत करते. यासाठी चहाची पाने किंवा कॉफी पावडर पाण्यात घाला आणि 10 मिनिटे उकळवा. केसांचा रंग काळा ठेवण्यासाठी चहाच्या पानाचा वापर करा आणि तपकिरी ठेवण्यासाठी कॉफी पावडर वापरा. या पाण्याने केसांवर मसाज करा.

काळे तीळ :

पांढरे केस काळे करण्यासही काळे तीळ खूप उपयुक्त आहेत. यासाठी दररोज रिकाम्या पोटी, पाण्याबरोबर कच्चे तीळ खाणे फायद्याचे ठरेल (Natural hair Colour).

कांदा :

कांद्याची पेस्ट केसांना पोषण देते. यासाठी कांद्याची पेस्ट केसांना लावा. एक तासानंतर केस धुवा. असे केल्याने पांढरे केसही काळे होतील.

मेंदी आणि तमालपत्र :

मेंदी आणि तेजपत्ता या दोन्ही वनस्पतींनी केसांचा रंग अधिक गडद होतो. अर्धी वाटी कोरडी मेंदी आणि तमालपत्रात दोन कप पाणी मिसळून उकळा. थंड झाल्यावर ते गाळून घ्या आणि केस धुतल्यानंतर त्यांच्यावर चांगले लावा. 15-20 मिनिटांनंतर केस पुन्हा धुवा.

(टीप : कुठल्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.)

(Natural hair Colour for grey hair problem)

हेही वाचा :

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.